सांडी कल्पना उपाधी।
तीच साधूला समाधी॥१॥
वाद घालावा कवणाला।
अवघा द्वैताचा हो घाला॥२॥
पुढे उमजेना काय ।
उडत्याचे खाली पाय ॥३॥
एक मन चेष्टा करी।
भूतें बापुंडी शेजारी ॥४॥
अवघी ईश्वराची करणी।
काय तेथें केलें कोणीं ॥५॥
पुन्हा शुद्ध मार्ग धरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.