sant muktabai gatha

सहस्त्रदळीं दळीं हरि आत्मा हा कुसरी – संत मुक्ताबाई अभंग

सहस्त्रदळीं दळीं हरि आत्मा हा कुसरी – संत मुक्ताबाई अभंग


सहस्त्रदळीं दळीं हरि आत्मा हा कुसरी ।
नांदे देहा भीतरीं अलिप्त सदां ॥ १ ॥
रविबिंब बिंबे घटमठीं सदा ।
तें नातळे पै कदां तैसे आम्हा ॥ २ ॥
अलिप्त श्रीहरि सेवी का झडकरी ।
सेवितां झडकरी हरिच होआल ॥ ३ ॥
चंदनाच्या दृतीं वेधल्या वनस्पती ।
तैंसे आहे संगतीं या हरिपाठें ॥ ४ ॥
मुक्ताई चिंतित चिंतामणी चित्तीं ।
इच्छिलें पावती भक्ता सदां ॥ ५ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *