पूजा पूज्य वित्तें पूजक पै चित्ते – संत मुक्ताबाई अभंग
पूजा पूज्य वित्तें पूजक पै चित्ते।
घाली दंडवतें भाव शीळ ॥ १ ॥
चंपक सुमनें पूजी कातळीने ।
धूप दिप मनें मानसिक ॥ २ ॥
भावतीत भावो वोगरी अरावो ।
पाहुणा पंढरीरावो हरि माझा ॥ ३ ॥
मुक्ताई संपन्न विस्तारूनि अन्न ।
सेवी नारायण हरि माझा ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.