sant muktabai gatha

प्रारब्ध संचित आचरण गोमटें – संत मुक्ताबाई अभंग

प्रारब्ध संचित आचरण गोमटें – संत मुक्ताबाई अभंग


प्रारब्ध संचित आचरण गोमटें ।
निवृत्तितटाकें निघालो आम्ही ॥ १ ॥
मुळींचा पदार्थ मुळींच पैं गेला ।
परतोनि अबोला संसारासी ॥ २ ॥
सत्यमिथाभाव सत्वर फळला ।
ह्रदयीं सामावला हरिराज ॥ ३ ॥
अव्यक्त आकार साकार हे स्फुर्ति ।
जीवेशिवें प्राप्ति ऐसें केलें ॥ ४ ॥
सकामनिष्कामवृत्तीचा निजफेर ।
वैकुंठाकार दाखविलें ॥ ५ ॥
मुक्तलग मुक्त मुक्ताईचें तट ।
अवघेचि वैकुंठ निघोट रया ॥ ६ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *