प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण – संत मुक्ताबाई अभंग
प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण ।
दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥ १ ॥
देखिलेंगे माये पंढरिपाटणीं ।
पुंडलिका आंगणी विठ्ठलराज ॥ २ ॥
विज्ञानेंसी तेज सज्ञानेसी निज ।
निर्गुणेंसी चोज केलें सयें ॥ ३ ॥
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल ।
निवृत्तीनें चोखाळ दाखविलें ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.