परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा – संत मुक्ताबाई अभंग
परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा ।
तया नाहीं कदा गर्भवास ॥ १ ॥
उपजोनी जनीं धन्य ते योनी ।
चित्त नारायणीं मुक्तलग ॥ २ ॥
अव्यक्ती पैं व्यक्ति चित्तासि अनुभव ।
सर्व सर्वीं देव भरला दिसे ॥ ३ ॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान ।
चित्त नारायण झालें त्याचें ॥ ४ ॥
आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला ।
परतोनि अबोला प्रपंचेसी ॥ ५ ॥
मुक्ताईचें चित्त निरंतर मुक्त ।
हरि हेंचि संचित आम्हांघरीं ॥ ६ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.