निर्गुणाची सैज सगुणाची बाज – संत मुक्ताबाई अभंग

निर्गुणाची सैज सगुणाची बाज – संत मुक्ताबाई अभंग


निर्गुणाची सैज सगुणाची बाज ।
तेथें केशीराज पहुडले ॥ १ ॥
कैसे याचें करणें दिवसां चांदिणे ।
सावळें उठणें एका तत्त्वें ॥ २ ॥
नाहीं या ममता अवघीच समता ।
आदि अंतु बिंबतां नलगे वेळू ॥ ३ ॥
मुक्ताई सधन सर्वत्र नारायण ।
जीव शिव संपूर्ण एकतत्त्वें ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.