नामबळें देहीं असोनि मुक्त – संत मुक्ताबाई अभंग

नामबळें देहीं असोनि मुक्त – संत मुक्ताबाई अभंग


नामबळें देहीं असोनि मुक्त ।
शांति क्षमा चित्त हरिभजनें ॥ १ ॥
दया धरा चित्तीं सर्वभूतीं करुणा ।
निरंतर वासना हरिरूपीं ॥ २ ॥
माधव मुकुंद हरिनाम चित्तीं ।
सर्व पैं मुक्ति नामपाठें ॥ ३ ॥
मुक्ताईचें धन हरिनामें उच्चारु ।
अवघाचि संसारु मुक्त केला ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.