नाम मंत्रें हरि निज दासां पावे – संत मुक्ताबाई अभंग
नाम मंत्रें हरि निज दासां पावे ।
ऐकोनी घ्यावें झडकरी ॥ १ ॥
सुदर्शन करीं पावे लवकरी ।
पांडवां साहाकारी श्रीकृष्ण रया ॥ २ ॥
निजानंद दावी उघडे पै वैकुंठ ।
नामेंचि प्रगट आम्हांलागीं ॥ ३ ॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार ।
हरि पारावार केला आम्हीं ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.