मुंगी उडाली आकाशीं – संत मुक्ताबाई अभंग
मुंगी उडाली आकाशीं ।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥ १ ॥
थोर नवलाव जाहला ।
वांझे पुत्र प्रसवला ॥ २ ॥
विंचु पाताळाशी जाय ।
शेष माथां वंदी पाय ॥ ३ ॥
माशी व्याली घार झाली ।
देखोन मुक्ताई हांसली ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.