मुक्तजीव सदा होति पै नामपाठें ।
तेंचि रूप ईटे देखिलें आम्ही ॥ १ ॥
पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी ।
आणूनि लवकरी तारी जन ॥ २ ॥
ऐसें पुण्य केलें एका पुंडलिकेंची ।
निरसिली जनाची भ्रमभुली ॥ ३ ॥
मुक्ताई चिंतनें मुक्त पैं जाली ।
चरणीं समरसली हरिपाठें ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.