मुक्तपणें सांग देवो होय देवांग – संत मुक्ताबाई अभंग

मुक्तपणें सांग देवो होय देवांग – संत मुक्ताबाई अभंग


मुक्तपणें सांग देवो होय देवांग ।
मीपणें उद्वेग नेघे रया ॥ १ ॥
वाऊगे मीपण आथिलें प्रवीण ।
एक नारायण तत्त्व खरें ॥ २ ॥
मुक्ता मुक्ती दोन्ही करी कारे शिराणी ।
द्वैताची काहाणी नाहीं तुज ॥ ३ ॥
मुक्ताई अद्वैत द्वैतीं द्वैतातीत ।
अवघाचि अनंत दिसे देहीं ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.