मुक्तामुक्त कोडे पाहिलें निवाडें ।
ब्रह्मांडा एवढें महत्तत्त्व ॥ १ ॥
निजतत्त्व आप अवघाचि पारपाक ।
एका रूपें दीपक लावियेला ॥ २ ॥
आदि मध्यनिज निर्गुण सहज ।
समाधि निजतेज आम्हा रामू ॥ ३ ॥
मुक्ताईचें धन आत्मराम गूण ।
देखिलें निधान ह्रदय घटीं ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.