मुक्त पैं अखंड त्यासि पैं फावलें – संत मुक्ताबाई अभंग
मुक्त पैं अखंड त्यासि पैं फावलें ।
मुक्तचि घडलें हरिच्या पाठें ॥ १ ॥
रामकृष्णें मुक्त जाले पैं अनंत ।
तारले पतीत युगायुगीं ॥ २ ॥
कृष्णनामें जीव झाले सदा शिव ।
वैकुंठ राणिव मुक्त सदां ॥ ३ ॥
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ति कोडे ।
जालें पैं निवाडें हरिरूप ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.