मनें मन चोरी मनोमय धरी ।
कुंडली आधारी सहस्त्रकारी ॥ १ ॥
मन हें वोगरु आदि हरिहरु ।
करी पाहुणेरु आदिरूपा ॥ २ ॥
सविया विसरू घेसील पडिभरू ।
गुरुकृपा विरु विरे सदां ॥ ३ ॥
मुक्ता मुक्तचित्तें गुरुमार्ग विते ।
पावन त्वरिते भवीं भाव ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.