गिरीगव्हारे कशासाठीं – संत मुक्ताबाई अभंग

गिरीगव्हारे कशासाठीं – संत मुक्ताबाई अभंग


गिरीगव्हारे कशासाठीं।
रागें पुरवीली पाठी ॥२॥
ऐसा नसावा संन्यासी।
परमार्थाचा जो कां द्वेषी ॥३॥
घर बांधिले डोंगरी।
विषया हिंडे दारोदारीं ॥४॥
काय केला योगधर्म।
नाही अंतरी निष्काम ॥५॥
गंगाजळ हृदय करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥


माऊली आपणास या अभंगाचा अर्थ  माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

AddThis Website Tools