दिवसा शीतळ निशीयेसी बरळ – संत मुक्ताबाई अभंग
दिवसा शीतळ निशीयेसी बरळ ।
अधऊर्ध्व केवळ निजबीज ॥ १ ॥
या आदि नाहीं अनादिही नाहीं ।
कैचा मोहप्रवाहीं दिसेचिना ॥ २ ॥
शक्तीचे संपुष्टीं मुक्ता मुक्त घट ।
अवघे वैकुंठ दिसताहे ॥ ३ ॥
मुक्ताई परिपाक अवघे रूप एक ।
देखिलें सम्यक सोहं भावें ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.