देऊळींचा देवो घरभरी भावो – संत मुक्ताबाई अभंग

देऊळींचा देवो घरभरी भावो – संत मुक्ताबाई अभंग


देऊळींचा देवो घरभरी भावो ।
कळसेवीण वावो जातु असे ॥ १ ॥
जाताती वाउगे नटनाट्यसोंगें ।
चित्तअनुरागें भजतीना ॥ २ ॥
असोनि न दिसे उगयाचि पिसें ।
घेती वायां वसे सज्जनेवीण ॥ ३ ॥
रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं ।
साकारलें आहम् न कळे तया ॥ ४ ॥
भ्रांतीचेनि भूली वायाचि घरकुली ।
माया आड ठेली अरे रया ॥ ५ ॥
मुक्ताई परेसी दुभतें चहूंसी ।
सत्रावी सर्वरसीं एका देवें ॥ ६ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.