ब्रह्म जैसें तैशा परी – संत मुक्ताबाई अभंग
ब्रह्म जैसें तैशा परी।
आम्हा वडील भूतें सारी ॥१॥
अहो क्रोधे यावें कोठे ।
अवघे आपण निघोटे ॥२॥
जीभ दातांनी चाविली।
कोणें बत्तीशी तोडीली? ॥३॥
मन मारुनी उन्मन करा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.