भजनभावो देहीं नित्यनाम पेठा – संत मुक्ताबाई अभंग
भजनभावो देहीं नित्यनाम पेठा ।
नामेंचि वैकुंठा गणिका गेली ॥ १ ॥
नाममंत्र आम्हां हरिरामकृष्ण ।
दिननिशी प्रश्न मुक्तिमार्गु ॥ २ ॥
नामचि तारकु तरले भवसिंधु ।
हरिनामछंदु मंत्रसार ॥ ३ ॥
मुक्ताई चिंतनीं हरिप्रेम पोटी ।
नित्य नाम घोटी अमृत सदां ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.