अविट हे न विटे हरिचे हे गुण ।
सर्व सनातन ध्यातां रूपें ॥ १ ॥
साध्य हें साधन हरिरूपें ध्यान ।
रामकृष्णकीर्तन मुक्त आम्हीं ॥ २ ॥
असंगेंचि नटु नटलों पैं साचे ।
नाहीं त्या यमाचें भय आम्हां ॥ ३ ॥
मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली ।
साधना दिधली चांगयासी ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.