अवघी साधन हातवटी।
मोलें मिळत नाही हाटीं ॥१॥
शुद्ध ज्याचा भाव झाला।
दूरी नाही देव त्याला॥२॥
कोणी कोणास शिकवावें ।
सार साधुनिया घ्यावें ॥३॥
लडिवाळ मुक्ताबाई।
जीव मुदल ठायीचे ठायीं ॥४॥
तुम्ही तरुनी विश्व तारा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.