अलिप्त संसारी हरिनामपाठें – संत मुक्ताबाई अभंग

अलिप्त संसारी हरिनामपाठें – संत मुक्ताबाई अभंग


अलिप्त संसारी हरिनामपाठें ।
जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥ १ ॥
हरिविण मुक्त न करि हो सर्वदां ।
संसारआपदा भाव तोडी ॥ २ ॥
आशेच्या निराशीं अचेतना मारी ।
चेतविला हरि आप आपरूपें ॥ ३ ॥
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदां ।
अभिन्नव भेदा भेदियेलें ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.