व्यापक हा हृषिकेशी – संत माणकोजी बोधले अभंग
व्यापक हा हृषिकेशी । आहे तुम्हा पाशी ।
विश्वास मानसी धरा थोर ॥१॥
चालविता बोलविता । सकळ त्याची सत्ता ।
त्या वाचुनी कर्ता नाही कोण्ही ॥ २॥
खास सुत्रधारी । खेळविता दोरी ।
नाचवी नानापरि । बाहुलिया ॥३॥
बोधला म्हणे मीपण सांडा जाण ।
कर्ता नारायण पांडुरंग ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.