विठोबाचे नाम जीवाचा – संत माणकोजी बोधले अभंग
विठोबाचे नाम जीवाचा विश्राम ।
तोडियेला प्रेम संसाराचा ॥१॥
नामाचा महिमा कळला नारायणा ।
लक्ष चौऱ्यांशी भ्रमणा चुकविल्या ॥२॥
बोधला म्हणे साक्ष आली माझे माना ।
सांगतो सज्जना एकभावे ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
विठोबाचे नाम जीवाचा – संत माणकोजी बोधले अभंग