विठोबा सुखाचा – संत माणकोजी बोधले अभंग
विठोबा सुखाचा विसावा ।
चला विठोबाच्या गांवा ॥१॥
सीण अवघा सांगावा ।
आपल्या जलमत्रीचा ठेवा ॥ २॥
मग तो का रे कुरवाळीला ।
कुभाविला ॥३॥
बोधला म्हणे सत्य सत्य ।
जाणाबाप पंढरीचा राणा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.