विठो सर्वांचा भार – संत माणकोजी बोधले अभंग
विठो सर्वांचा भार ।
हृदयी घ्या रे निरंतर ॥१॥
विठोबा हा काळाचा काळ ।
महा भलासि कृपाळ ॥२॥
सत्य वचन निर्धार ।
शरण जावे रघुवरा ॥३॥
बोधला म्हणे हे सती ।
साक्षे रखुमाईचा पती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.