वर्षाचा दिन आनंद झाला – संत माणकोजी बोधले अभंग
वर्षाचा दिन आनंद झाला ।
आनंदाचे सुख संतमेळा मिळाला ॥१॥
वर्षाचा सण आम्हा नित्य दिवाळी ।
भावे भक्त ओवाळी साधुसंत ॥२॥
सेवा मुख आम्हा नित्य ते भोजनी ।
आम्ही तुष्ट मनी जेविता सदा ॥३॥
बोधला म्हणे आम्हा जाहला निरोप ।
पंढरपूरी आहे आमुचा मायबाप ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वर्षाचा दिन आनंद झाला – संत माणकोजी बोधले अभंग