उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा – संत माणकोजी बोधले अभंग
उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा ।
फुली पहाट झाली पक्षांच्या वेळा ॥ १॥
होतो वाद्याचा गजर तुरे वाजती कहाळा ।
करी घेऊनिया आरत्या उभ्या गोपिका बाळा ॥ २॥
द्वारा उभे भक्तजन दोनी जोडुनी हात ।
तयास द्यावे दर्शन आम्हा करी सनाथ ॥३॥
नारद तुंबर उभे हरिगुण गात ।
छपन्न कोटी यादव ते ही मिळाले समस्त ॥४॥
बोधला म्हणे देवा मस्तकी ठेवा हात ।
जन्मोजन्मी द्वारी उभा हरिगुण गात ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.