तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले – संत माणकोजी बोधले अभंग
तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले ।
सांग विठ्ठल माये माझे ॥१॥
साच की लटके विचारी मनासी ।
हा बोला कोणासी ठेवसील ॥ २॥
हे मृतिकेचे भांडे भुसी वोतीयेले ।
वोंकारे फोडिला टाहो तेथे ॥३॥
सकळ देहीचा चाळकु बुधी खेळवणा ।
तुची एकु, नाही बा आणिक दुजा तेथे ॥४॥
सकळ मंडण चालविता तुझी करणी गा अनंता ।
दुजा हा सर्वथा नाही कोणी ॥५॥
बोधला म्हणे हे वचन निर्धारी ।
अवघा तूची सुत्रधारी तु आमचा कैवारी पांडुरंगा ॥६॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले – संत माणकोजी बोधले अभंग