पूर आला आनंदाचा – संत माणकोजी बोधले अभंग
पूर आला आनंदाचा ।
लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधु नामाची सांगडी ।
पोहुन जाऊ पैलथडी ॥२॥
अवघे भाविक जन भक्त ।
घाला उड्या चंद्रभागेत ॥३॥
बोधला म्हणे थोर पुण्ये ।
वोघा आली पंथे येणे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पूर आला आनंदाचा – संत माणकोजी बोधले अभंग