प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही – संत माणकोजी बोधले अभंग
प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही ।
काढिले लवलाही पांडुरंगे ॥१॥
बहुत जाल्या तुझ्या उपकाराच्या रासी ।
सांगा संतापासी घडी घडी ॥ २॥
ऐसे मागे बहुत ऐकत होतो कानी ।
ते तो मजलागुनी केले बापा ॥३॥
बोधला म्हणे तुझी वाखाणिता कीर्ती ।
सांगो संता प्रती तुझे गुण ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही – संत माणकोजी बोधले अभंग