पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी – संत माणकोजी बोधले अभंग
पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी ।
ते आह्यालागुनी कळो आले ॥१॥
मी आरुस साबड माझे बोलणे बोबडे ।
परि तुज आवडले पांडुरंगा ॥ २॥
कळा गा कुसरी नये मज गाता ।
परि वो पंढरीनाथा आंगिकारले ॥३॥
बोधला म्हणे देवा वानले तुझ्या भावा ।
कळो आल्या केशवा मायबापा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.