पंढरीवाचुनी सुख कोठे नाही – संत माणकोजी बोधले अभंग
पंढरीवाचुनी सुख कोठे नाही ।
ते आहे गा पाई विठोबाचे ॥१॥
भाग्यवंत येती हे सुखे घेती ।
मागुते न येती परतोनिया ॥२॥
बोधला म्हणे धन्ये भाग्य ज्यांचे होये ।
तरीच त्या सोय सांपडली ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.