नलगे जपतप करावे साधन – संत माणकोजी बोधले अभंग
नलगे जपतप करावे साधन ।
नाम हे निधान जीवि धरा ॥१॥
नामे ची तरले कोट्यांनीकोटी ।
नामेच वैकुंठी सरते केले ॥२॥
नामाची आवडी जयाच्या चित्तासी ।
धन्ये पुण्य राशी तोचि नर ॥३॥
बोधला म्हणे नाम उच्चारा हरिचे ।
भये कळिकाळाचे नाही तुम्हा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.