काय मी करितो कशाने तरतो – संत माणकोजी बोधले अभंग
काय मी करितो कशाने तरतो ।
नाम तुझे घेतो एक भावे ॥१॥
नाम तुझे वाणी बोबडिया बोला ।
न ये मज चाली करु काय ॥ २ ॥
न ये मज गाणे न ये मज नाचणे ।
भावे आलो शरण तुझे पायी ॥३॥
बोधला म्हणे देवा तु मज बोधिले ।
आवडीने ठेविले नाम माझे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
काय मी करितो कशाने तरतो – संत माणकोजी बोधले अभंग