भक्ताच्या धावया धावसि तु वेगी – संत माणकोजी बोधले अभंग
भक्ताच्या धावया धावसि तु वेगी ।
विठोबा तुज मागे रखुमा देवी ॥१॥
यादवांसहित कैसा तू धावसी ।
स्वामी हृषिकेशी पांडुरंगा ॥ २॥
बोधला म्हणे हरि ब्रिदे साच करी ।
भक्त भाव मुरारी साज तुज ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.