अनंत कोटी आमचे अपराध साहिले – संत माणकोजी बोधले अभंग

अनंत कोटी आमचे अपराध साहिले – संत माणकोजी बोधले अभंग

अनंत कोटी आमचे अपराध साहिले ।
तु आमची माउली पांडुरंगा ॥१॥
तुज परत जिवलग नाही त्रिभुवनी ।
तु आमची जननी पांडुरंगा ॥२॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या रासी ।
बापा हृषीकेसी पांडुरंगा ॥३॥
बोधला म्हणे तुज काये होऊ उतराई।
तू आमचा मायबाप तू पांडुरंगा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अनंत कोटी आमचे अपराध साहिले – संत माणकोजी बोधले अभंग