आमचा विठोबा विश्वाचा गोसावी – संत माणकोजी बोधले अभंग
आमचा विठोबा विश्वाचा गोसावी ।
कारे तुम्ही जीवी आठवाना ॥१॥
लटकियाचा तुम्ही मानाल भरवसा ।
जातिल दाही दिशा सोडुनिया ॥२॥
माता आणि पिता बंधु या बहिणी ।
अंतकाळी कोणी नव्हती बापा ॥३॥
लटकिया मायेसी धरला जीवेसी ।
जातील परदेशी टाकोनिया ॥४॥
बोधला म्हणे तुम्ही साच जीवी धरा ।
निर्वाणीचा खरा पांडुरंग ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.