आजि सुचिन्हे दिसती स्फुरति बाहे वो – संत माणकोजी बोधले अभंग
आजि सुचिन्हे दिसती स्फुरति बाहे वो ।
आजी भेटिला येईल कृष्ण माये वो ॥१॥
यालागि हारुष वाटतो माझे मनि वो ।
आजि भेटिला येईल आमचा धणि वो ॥ २॥
बैसोनि सांगन गुज गोष्टी वो।
उठोन आवडिने गळा घालिन मिठी वो ॥३॥
प्रीती लोळणी घालिन पाया वरी वो।
लोक म्हणती निलाज जाली पोरे वो ॥४॥
या लागि वर्ते मी लोकाचारी वो ।
तुजी पाउले धरिन अंतरी वो ॥५॥
बोधला म्हणे धन्य आम्ही सुखि जालो वो ।
विठ्ठल चरणी येवुनी विनटले वो ॥६॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आजि सुचिन्हे दिसती स्फुरति बाहे वो – संत माणकोजी बोधले अभंग