आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर – संत माणकोजी बोधले अभंग
आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर ।
पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥
तुझीये भेटीचे आर्त माझे चित्ती ।
रखुमाईचा पती पांडुरंग ॥२॥
तुच आमचे वित्त तूच आमचे गोत।
तू सर्व संपत्ती जोडी माझी ॥३॥
बोधला म्हणे तुजवीण अनु नेणे काही।
प्रीती तुझी पायी बसो माझी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर – संत माणकोजी बोधले अभंग