अबदुलखानाची भोवली ताहार। महापाषाण फोडिले खेचर । भक्त डळमळिल थोर थोर। रामकृष्ण बाहारी। तुझी वासना तुजचि वरी । अभक्तासी कष्टि करी । भक्त रक्षुनी नानापरी गा ॥१॥॥छ॥ भक्तीभाव जयाचा निर्धार । जिवे प्राणासी जे उदार। तेच उरती पैल पार गा ॥ २ ॥ सुद्ध भाव जयाचा मनी । त्यासी मारिता नाही बा कोन्ही । बळकट आहे तयाचा धणी गा ॥३॥ लोक म्हणती अबदुलखान । परि करिता नारायेण । कोण्हा न कळे तयाची खुण ॥४॥ ऐसे बहुत भेडसाविती नेणो पळाले हे किती । परि लिहिले न चुके अंती गा ॥५॥ असं भैतृत्र? (भैतृत्व) बहुत बोले जन । बोधल्याचे दृढ मन त्यांने उंची लाविले निशान गा ॥६॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.