rashtrasant tukdoji maharaj information in marathi
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा(tukdoji maharaj) जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निघुन गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.
इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेम्बर मध्ये सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा । भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”
संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचाव?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन.
ऋषीमुनींनी लोकांच्या उद्धाराचा मार्ग दाखविणारे ग्रंथ लिहिले. पण ते संस्कृत भाषेत असल्यानं सामान्य माणसांच्या भाषेत-लोकभाषेत-हे ज्ञान सांगणं आवश्यक होतं. ते कार्य संतकवींनी केलं. अशाप्रकारे मराठी भाषेत कवी परंपरा निर्माण झाली. त्यांना सा-या समाजाला चांगलं वळण आवश्यक होतं.
स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनीही आपल्या ग्रंथातून ज्ञानाचं प्रतिपादन करून समाजावर सुसंस्कार केले, पण या सर्व ग्रंथातून नेमकं घ्यायचं काय? हजारो ग्रंथ वाचले खरे, पण त्यांतून जे मिळवायचं तेच मिळालं नाही, तर त्याचा काही उपयोग आहे काय? त्याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात,
भाविक जनांसि लावावया वळण।
आकळावया सकळ ज्ञान।
संत-महंत उपकार ऋण।
केवळ तार्किक आणि पांडित्यपूर्ण ग्रंथाचा सामान्य माणसांना काय उपयोग? जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी नि उन्नतीसाठी काही सांगत असतील, ते अवश्य वाचावेत. त्यात आपण काय करावं नि काय करू नये, याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चित मिळेल. जे ग्रंथ कर्मठपणावर भर देत असतील ते वाचू नयेत. कारण कर्मठपणा हा निकोप जीवनाला बाधक ठरतो. ज्या ग्रंथात चांगले चांगले आदर्श सांगितले असतील ते वाचल्यास आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडणही चांगली होईल. आपण केवळ पढीक पांडित्य सांगणारे ग्रंथ वाचले, तर आपणच आपला घात करून घेऊ.
सामान्य माणसानं चांगलं जीवन कसं जगावं, याचं प्रतिपादन ज्या ग्रंथात केलं आहे, ते वाचावेत. फार विद्वज्जड, तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले, तरी सामान्य माणसांसाठी त्यांचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं जीवन जगतो, त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथच वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो, त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मन:शांतीही मिळते. योग्य वाचन केल्यानं असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसतं, तर सध्याचं जीवन जगण्यासाठीही आवश्यक असतं.
हे वाचा:- संत तुकडोजी समाधी मोझरी
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजनम्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली.
गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या(tukdoji maharaj) विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा, वाईटरूढी,व्यसने यांचा त्याग करा. अस्या आशयाचे थोडा वेळ भाषण केले कि, हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई. सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. व त्यांना राष्ट्र संत तुकडोजी या नावाने संबोधू लागले. ‘ ग्रांमगीता’ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले. भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्राथना करावी. सर्वांशी प्रेमाने वागाव. गोवध बंदी, व पशु संर्वधन करावे हे शिकविले.
भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज मोझरीला भेट देण्यासाठी इ.सन १९ मार्च १९५६ रोजी रविवारला गेल्यात. चीन युद्ध १९६२ व पाकीस्थान युद्ध १९६५ झाले तेव्हा सैन्यास धीर देण्या साठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गाईली, व सैन्याचे धैर्य वाढविले. ते फ़ार प्रयत्नवादि होते. तन,मन,धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. दिनांक ११ आक्टोंबर १९६८ गुरुवार रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रम्हलीन झाले. त्यांचे चरणी आपले शत: शत: प्रणाम(tukdoji maharaj)
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
View Comments
Hi