सातशे वर्षांपूवीर् सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ‘ब्र’ काढायचा विचारही केला नसता पण ही बाई थेट प्रश्न्च विचारते. देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?
देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्मला
सोवळा तो झाला कवण धर्म
सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला. आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवलं गेलं. मारही खाल्ला. सोयराबाईंच्या अभंगातून ही वेदना शब्दाशब्दांमधून ठिबकत राहते…
संत सोयराबाई
हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले
परी म्या धरिले पदरी तुमच्या
आता मोकलिता नव्हे नित बरी
थोरा साजे थोरी थोरपणे
विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं. कपड्यांची लक्तरं झाली…चामडी लोळवली. हा बहाद्दर पायरीशी उभा राहून थेट विठोबाला ‘जोहर मायबाप जोहार’ म्हणत सवाल करता झाला, सोयराबाईनेही विठ्ठलाला साकडे घातले.
आमची तो दशा विपरित झाली
कोण आम्हा घाली पोटामध्ये
आमचं पालन करील बा कोण
तुजविण जाण दुजे आता
देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी महारांचे स्थान पायरीशी. परमेश्वरही ‘बहुतांचा’ ! पायी तुडवल्या जाणाऱ्यांचं सोयरसुतक त्याला कुठे? त्याला दीनांची चाड नाही. हा राग व्यक्त करीत सोयराबाई विठोबालाच खडसावते.
कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले
आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि
घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे
ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी
सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव फार रोखठोकपणे येतं.
सुखात हजार वाटेकरी असतात दु:ख तुमचं एकट्याचं असतं, हे तिनं फार साजऱ्या शब्दांत सांगितलंय
अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप
आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि
तिच्या अभंगांमधून नाममहात्म्यही पुन्हा पुन्हा येतं. तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत.
सुखाचे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी…
हा प्रसिद्ध अभंगही तिचाच.
आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी रांधणारी, घर-संसार सांभाळणारी गृहिणी आहे
अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे
नवऱ्याची वाट पाहणारी स्त्री आहे.
साक्षात विठोबाला ती जेवायचं आवतण देते.
विदुराघरच्या कण्या आणि दौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव गावकुसाबाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री आहे.
सोयरा- चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं. अपत्यप्राप्तीच्या आसेनं कासावीस झालेली सोयराबाई अभंगात भेटते.
आमच्या कुळी नाही वो संतान
तेणे वाटे शीण माझ्या मना..
असं सांगताना उदास असलेली सोयराबाई कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने इतकी फुलून आली आहे की ती बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते.
View Comments
thank you nice info
खूपच सुंदर ????संपू च नये असं वाटत होतं. संपूर्ण जीवनपट उभारलाय .धन्यवाद ???जय हरी विठ्ठल ???
,खुप सुंदर माहिती सखोल अभ्यासास ऊपयुक्त माहिती आहे.
धन्यवाद माउली??
धन्यवाद माउली??
खुप छान माहिती....पुर्वीच्या जीवन शैलीच व सद्य स्थितीचे अचुक वर्णन......जय जय राम कृष्ण हरि
विटाळी देह विटाळी जन्माला शुध्द कैसा झाला ==एक अजब सत्य ==त्रिवार नमन
खूप खूप सुंदर अशीच माहिती वारंवार मिळावी जय राम कृष्ण हरी
जातीव्यवस्थेचे माजवलेले स्तोम आणि त्याच्या बदल देवाला आणि समाजाला खडतर असा विचारलेला सवाल.
नतमस्तक तिच्या पाई
खंरच आत्ताच्या पिढीला शिकन्यासारख आहे... धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम माहिती संत सोयराबाई यांचा संघर्षमय प्रवास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा...