संत सेना महाराज-जीवन चरित्र, जन्मस्थळ
संत सेनामहाराज हे वारकरी संप्रदायातील संत मेळ्यातील एक संत असून, त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले
जाते. श्रीसंत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत. जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेनाज्जींचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. (संत जनाबाई) शिखांचा धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात संत सेनाजींच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.
संत सेनारजींच्या जन्मस्थळाबाबत, जन्मकाळाबाबत, अनेक अभ्यासक, संशोधकांमध्ये एकमत नाही. आजही त्याबद्दल अनिश्चितता आहे. शिवाय ते महाराष्ट्रीय की अमहाराष्ट्रीय या बाबतीतही अनेक मतभेद आहेत. पूर्वीपासून वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमवेत त्यांचे नाव घेतले जाते. मराठी धाटणीची, वळणाची, संस्कारांची मराठी कविता (रचना) आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच उत्तर भारतातील प्रांतात विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजराथ, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे, परंतु मराठीच्या मानाने त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय स्वामी रामानंदांचे शिष्यत्व त्यांना लाभल्याने त्यांच्या जन्मठिकाणाबाबत एकमत व्यक्त करणे अवघड वाटते.
महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील अनेक संशोधक अभ्यासकांच्या मते संत सेनामहाराज हे महाराष्ट्रीय संत होते, याचा ते आवर्जून उल्लेख कतात. त्या संदर्भात काही मते पुढीलप्रमाणे आहेत.
‘उत्तर भारत की संत परंपरा’ या आपल्या ग्रंथात आचार्य परशुराम चतुर्वेदी म्हणतात की, ‘मराठी वा हिंदी या दोन्ही साहित्याच्या परिशीलनातून आपल्याला असे म्हणता येईल की, संत सेनामहाराज हे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उतर भारतामध्ये गेलेले होते, तत्पूर्वी ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते. महाराष्ट्रात राहून त्यांनी अभंगरचना केली असावी. प्रसंगानुसार ते नंतर उत्तरेकडे गले असावेत. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी. संत नामदेवांप्रमाणेच संत सेनानी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांची सेवा केलेली आहे
महाराष्ट्रातील संत नामदेव शिष्या संत जनाबाईच्या अभंगांमध्ये सेनाजींचा केवळ उल्लेखच नाही, तर त्यांच्या जीवनकथेवर एक अभंग रचला आहे. काही संशोधकांच्या मते हा अभंग प्रक्षिप्त असावा; परंतु तो प्रक्षिप्त नसेल तर संत सेना हे नामदेव समकालीन व महाराष्ट्रीय संत होते, याला पुष्टी मिळते.
श्रीसकलसंतगाथा’ संपादक जोशी (आवटेप्रत ) यात ह० भ० प० नाना- महाराज साखरे यांनी महाराष्ट्रीय नामदेवकालीन संतांमध्ये सेनाजींचा समावेश केला आहे.
डॉ अशोक कामतांनी सेनाजी हे अव्वल महाराष्ट्रीय संत होते, असे आग्रहाने सांगितले आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ ते सांगतात, “मराठी संतांच्या रचनेमध्ये सेनाजींनी अधिक अभंग लिहिले आहेत. ते आज उपलब्ध आहेत. अशा रचना करणारा संत निश्चित महाराष्ट्रीय असावा.” असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
भा० पं० बहिरट/भालेराव यांनी आपल्या ‘वारकरी संप्रदाय : उदय व विकास’ या ग्रंथात भागवत धर्ममंदिरांची द्वारे सर्व जातिजमार्तींसाठी खुली होती. असे सांगताना म्हणतात, “सर्व जमातीतून श्रेष्ठ संताची श्रेणीच निर्माण झाली. ज्ञानदेवांच्या प्रभावळीत विलसू लागली. या प्रभावळीत गोरोबा कुंभार, सांवता माळी, नरहरी सोनार, सेना न्हावी, परिसा भागवत, जनाबाई, चोखामेळा व त्यांची बायको सोयराबाई आणि मुले, वेश्या कुळातील कान्होपात्रा इत्यादी संतांची मांदियाळी आपल्या अमृतमय अभंग वाणीतून भक्तिरसाचे पाट पाझरू लागले.”
भा० पं० बहिरटांच्या वरील संदर्भावरून सेनाजी हे केवळ नामदेव समकाली नव्हते तर ते महाराष्ट्रीय होते, असे स्पष्ट मत दिसून येते. माधवराव सूर्यवंशी ‘सेना म्हणे’ या ग्रंथात म्हणतात, “सेना न्हावी यांची उपलब्ध अभंगरचना मराठीत आहे. ही वस्तुस्थिती त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाची निदर्शक नाही काय ? सेना न्हावी हे हिंदी भाषक असते, तर त्यांच्या मराठी अभंगरचनेवर हिंदीचे संस्कार अवश्य उमटले
असते. तसे संस्कार त्यांच्या मराठी अभंगावर पुसट स्वरूपात तरी आढळतात काय ? नामदेव महाराष्ट्रीय असले तरी त्यांचे शिष्य उत्तरभारतात सापडतात. तेव्हा उत्तर भारतीय अनुयायी असणे ही गोष्ट सेना न्हावी महाराष्ट्रीय असण्याला बाधक। ठरते काय?” सेना पूर्णतः महाराष्ट्रीय व मराठी भाषकच असल्याचे प्रकनि त्यांच्या अभंग रचनेवरून स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे सेनाजी मराठी भाषेशी, मराठी मातीशी इतके समरस झालेले दिसून येतात की मराठी मनामध्ये त्यांच्या बाबत परप्रांतीयत्वाची परभाषकत्वाची कसलीच शंका पुसटशी सुद्धा येत नाही. म्हणूनच त्याच्या अभंगातील गवळणींमधील शब्दरचनाही मराठमोळ्या घाटणीची असल्याचे प्रकर्षाने जाणवते. (पृ० क्र० ४२) असा प्रतिप्रक्न माधवराव सूर्यवंशींनी विचारला आहे. ते महाराष्ट्रीयच आहेत. यावर त्यांनी शिक्का मारला आहे.
प्रा० पां० ना० कुलकर्णी (‘सेना म्हणे’- प्रस्तावना) आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात, “सेनाजी मला शंभर टक्के मराठी वाटतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई यांच्या विषयीचा त्यांचा जिव्हाळा उसना वाटत नाही. प्रत्यक्ष दर्शनाचा स्मरणोत्तर ओलावाही येथे जाणवत राहतो. या भावंडांच्या समाधि- स्थानाशी त्यांच्या भावना खोलवर गुंतल्या आहेत. शिवावतार निवृत्तीनाथांना ते वारंवार आणि निरंतर नमस्कार करतात.”
सेनाजी जसे महाराष्ट्रीय संत असावेत असे मत व्यक्त करणाऱ्या सोबत ते महाराष्ट्राबाहेरील होते, या संदर्भात अनेकांनी पुराव्यांसह मते व्यक्त केली आहेत.
डॉ० शं० गो० तुळपुळे यांनी संपादन केलेल्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड : पहिला मध्ये ते म्हणतात, “एक गोष्ट स्पष्ट आहे की, संत सेना हा न्हावी जातीचा असून तो जबलपूर जवळील बांदूगड येथील राजाच्या पदरी होता. त्याची मातृभाषा हिंदी होती, त्याचे नाव ‘सेना’ असून त्याचे अनुयायी उत्तरेकडे आढळतात.”
पंजाबातील ‘न्हावी’ सेना भक्ताचे नाटक करतात, त्यातही तो उत्तरेकडील म्हणूनच दाखवितात. तो अस्सल मराठी असता, तर महाराष्ट्रात त्याचा थोडातरी संप्रदाय असावयास पाहिजे होता.” (पृ० क० ६५२)
डॉ० तुळपुळे यांचे मत अतिशय एकांगी वाटते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेनार्जींची ज्ञातिबांधवाची धर्मशाळा, मठ, मंदिरे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये न्हावी समाज ज्ञाता बांधव सेनाजींना आदराचे स्थान देतात. प्रत्येक वर्षी सेनाजींचा पवित्र स्मृती दिवस म्हणून सोहळ्याने साजरा करीत असतात.
डॉ० गिरीधर प्रसाद शर्मा यांनी एका हस्तलिखित पोथीच्या आधारे सेना महाराज हे उत्तर भारतातील कवी होते, असे म्हणले आहे.
हिंदी साहित्याच्या अवघ्या इतिहासामध्ये संत सेनाजी हे उत्तर भारतातील स्वामी रामानंदांच्या शिष्यांच्या संप्रदायामधील मानले जातात. कबीर, पन्ना, रविदास, सेनाजी यांना अध्यात्मातील अनुग्रह स्वामी रामानंदांनी दिला होता. पंधराव्या शतकातील सेनाजी जातीने न्हावी होते व ते बांधवगडच्या राजाच्या पराको असत. असा निर्देश हिंदी साहित्यामध्ये आढळतो. (धीरेंद्र वर्मा हिंदी साहित्य) तसेच संत मीराबाईने आपल्या कवितेमध्ये पूर्वकालीन संतांचा उल्लेख केला आहे.
अगवद्भक्त सेनाजी’ चे चरित्रकार भ० कृ० मोरे म्हणतात. आम्ही या गोष्टी विषयी बराच प्रवास केला. अनेक ग्रंथ व कागदपत्र पाहिले.
डॉ० रेवतीप्रसाद शर्मा यांचेही ग्रंथ पाहिले आणि आमची खातरी झाली की, भगवद्भक्त सेनाजी हे महाराष्ट्रात प्रवासी म्हणून आले असावेत आणि त्यांनी महाराष्ट्रीय साधूसंतांच्या गाठीभेटी घेतल्या असाव्यात. त्यापुढे जाऊन मोरे म्हणतात, ‘भगवद्भक्त सेनाजी हे राजस्थानी होते की गुजराथी होते. वा महाराष्ट्रीयन होते हा वाद महत्त्वाचा नाही. ते ज्या काळात उदयास आले त्यांनी ज्या पद्धतीने आपली आत्मोन्नती करून घेतली ती बाब महत्त्वाची गणली गेली पाहिजे.” (पृ० क्र० ५६,५७)
डॉ० अ० ना० देशपांडे यांनी (प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, पृ० क्र० १३०) म्हणले आहे की, “आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात सेनाजींनी महाराष्ट्रात वास्तव्य केले असावे, ते वारकरी संप्रदायात सामील झाले असावेत आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ते उत्तर भारतात गेले असावेत. तेथे त्यांना स्वामी रामानंदांचा सहवास घडला असावा. ”
शं० पू० जोशी (पंजाबातील नामदेव) आपल्या ग्रंथात म्हणतात, “सैनभक्त” हा दाक्षिणात्य असला, तर त्याचा महाराष्ट्रात थोडातरी संप्रदाय अस्तित्वात असायला पाहिजे होता. दक्षिणेतील न्हाव्यांना सेनाभक्ताचे नावही माहीत नाही. तर राजपुतांना, पंजाब या प्रांतातील अबालवृद्ध न्हावी स्त्री-पुरुष रात्रंदिवस या भक्ताचे भजन-पूजन करण्यात दंग होऊन गेलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे.
रावबहादूर चिंतामणी वैद्य ग्वाल्हेर यांनी संत सेनाजींच्या संदर्भात अनेक कागदपत्रांच्या आधारे व्यापक संशोधन केले आहे. त्यांच्या मते “भगवद्भक्त सेनार्जींची अनेक अस्सल व बनावट कागदपत्रातून चरित्रे पाहिली. त्यांच्या निरीक्षणावरून संत सेनाजी महाराष्ट्रात विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रवास करीत करीत महाराष्ट्रात आले; त्यांनी वारकरी संप्रदायातील समकालीन अनेक संतांच्या भेटी घेतलेल्या असाव्यात.”
ह० भ० प० बाबामहाराज सातारकर आपल्या आशीर्वादामध्ये म्हणतात, मनुष्य जन्माला कुठे आला ? त्यापेक्षा जन्माला येऊन तो काय करतो, याला महत्त्व । आहे. म्हणूनच श्रीसंत सेनामहाराज यांचे जीवनचरित्र व सार्थ अभंगगाथा सर्व थरातील लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. (संत सेनामहाराज अभंगगाथा, गुळवणे-शिंदे, पृ० क्र० ६)
संत सेनाजी महाराष्ट्रातील की महाराष्ट्राबाहेरील या संदर्भात अनेकांनी आपापली मते वरीलप्रमाणे मांडलेली आहेत. सेनाजी महाराष्ट्रीय होते. याला एकमेव कारण, म्हणजे त्यांची अभंगरचना, ती सुद्धा अस्सल मराठी संस्काराची आहे. मराठी प्रांतातील माय मराठीतील बोलीभाषेमध्ये रूढ असणारे अनेक वाक्प्रचार सेनांच्या कवितेत पहावयास मिळतात. अस्सल मराठीपण अभंगा- अभंगामधून दिसते. अमराठी भाषिकाला अशा स्वरूपाचे शब्द वापरता येणे कठीण असते.
सेनाजीही नामदेवांप्रमाणे, महाराष्ट्राबाहेर प्रवासाच्या निमित्ताने गेलेले असावेत. राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेशामध्ये जाऊन संबंधित भाषेशी संबंध त्यांचा आला असावा. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या रचना आणि पदे त्यांनी रचलेली असावीत.
जन्मकाळ
भगवद्भक्त सेनाजींचा जन्म बुंदेलखंडात रेवा संस्थानची राजधानी बांधवगड येथे इसवी सन १२७८ साली झाला. (भगवद्भक्त सेनाजी चरित्र भ० कृ० मोरे) ‘श्री क्षीरसैन बंशप्रकाश’ या ग्रंथाच्या आधारे त्यांनी मिती वैशाख वद्य १२ रविवार विक्रम संवत् १३५७ हा जन्मकाळ निश्चित केला आहे. संत सेनाजीचा काळ हा शके १२०० ते १२८० (इसवी सन १२७२ ते १३५८) असा असावा असे. पां० ना० कुलकर्णी (प्रस्तावना ‘सेना म्हणे’) यांचे स्पष्ट मत आहे. तसेच ते म्हणतात, “सेनाजी हे पूर्णाशाने मराठी संत असून त्यांचे वास्तव्य मुख्यतः महाराष्ट्रात होते. अशी माझी भूमिका आहे.” (पृ० क्र० २ व ३) सेनाजींच्या वडिलांचे नाव देविदास व आईचे नाव प्रेमकुंवरबाई, याशिवाय अजून दोन नावाचा उल्लेख काही चरित्रकारांनी केलेला दिसतो.
जन्मस्थळाच्या संदर्भात अनेक मते आहेत. महाराष्ट्राबाहेर पंजाब प्रांत अमृतसर येथे (सोहलठटही) चौदाव्या शतकात जन्म झाला. ‘श्रीसेन प्रकाश’ या हस्तलिखित बाडामध्ये त्यांचा जन्म राजपुतान्यात झाला, असा उल्लेख आहे. ‘कल्याण मासिक गोरखपुर यामध्ये १३ व्या शतकात बोधगड राज्यात सेनाजीचा जन्म झाला असा उल्लेख आहे
वरीलप्रमाणे आपआपल्या पद्धतीने संशोधक, अभ्यासक, लेखकांनी ग्रंथाच्या हस्तलिखितांच्या, संशोधनाच्या आधारे पंजाब, मध्यप्रदेश, गुजराथ, राजपुताना यासारख्या ठिकाणी जन्माची ठिकाणे सांगितली आहेत. संत सेना महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांचे जन्म स्थळ व काळ या बाबतीत
कोठेही एकमत दिसत नाही, अनेकदा या बाबी एखाद्या धूसर कथेसारख्या व अस्पष्ट जाणवतांना दिसतात. परंतु त्याच्या जीवनचरित्र कथेच्या बाबतीत मात्र एकाच प्रसंगाभोवती संपूर्णतः सर्व जण गुंतलेले दिसतात. अर्थात या कथेला किती आधार आहे, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, परंतु ही कथा अनेक जुन्या संस्कृत भक्तमालामधून, भक्तविजयकार (३४व्या अध्यायात) महिपतीबुवा ताहराबादकर, जीमेन प्रकश ओवीबद्ध राजपुतान्यातील हस्तलिखित, गोरखपूरचे कल्याण मासिक, ग्वाल्हेरचे रा० ब० चिंतामणराव वैद्य, यांनी लिहिलेले चरित्र. श्री सेना सागर ग्रंथ, भगवद्भक्त सेनाजी चरित्र – भ० कृ० मोरे, श्रीक्षेमराज. श्री ध्रुवदास लिखित-भक्त नामावली ग्रंथ, संत सेनामहाराज – अभंगगाथा, संपादक श्रीधर गुळवणे, शिंदे रामचंद्र, पुणे, श्री संत सेनामहाराज चरित्र व काव्य, अहिरराव सुमन (प्रबंधिका) यांसारख्या सर्व संदर्भ ग्रंथातून जी जीवन चरित्राची माहिती मिळते. त्या आधारावरून त्यांचे जीवनचरित्र खालीलप्रमाणे मांडलेले आहे.
१३ व्या शतकात रेवा संस्थानामधील वाघेला रजपूत वंशाचे राजे राज्य करीत होते. आज जो मध्यप्रदेश म्हणून ओळखला जाणारा प्रांत आहे. यामध्ये रेवा संस्थानचा समावेश होतो. या संस्थानात ‘बांधवगड’ नावाचा एक मजबूत बांधणीचा किल्ला आहे. तो कैमूरच्या डोंगरावर बांधला होता. आज तो पडक्या अवस्थेत आहे. हा किल्ला म्हणजे रेवा संस्थानची राजधानी, वाघेला वंशातील महाराजा रामराजा(रामसिंह) राज्य करीत होता.
या राजाच्या पदरी देविदास नावाचा एक न्हावी होता. तो राजाच्या सेवेत राहून केस-दाढी करणे, अंगमर्दन करणे यांसारखी कामे राजसेवा म्हणून करीत होता. तो ईश्वराची भक्ती करीत असे. तो स्वभावाने धार्मिक व सात्त्विक होता. राजांचे नित्यकर्म करताना, उरकताना राजांसमवेत धार्मिक विषयांवर त्यांची सखोल चर्चा होत असे. त्यामुळे राजाच्या मनात देविदासाविषयी अतिशय अभिमान होता. देविदास व त्याची पत्नी घरी आलेल्या प्रत्येक साधुसंतांचे आदरातिथ्य करीत असत. स्वामी रामानंद हे देविदासाचे गुरू होते. स्वामींच्या आशीर्वादाने या दापत्याच्या पोटी इसवी सन १२७८ (इसवी सन १३०१) मध्ये सेनाज्जींचा जन्म झाला.
बालपण
सेनार्जींचे आईवडील मूळात धार्मिकवृत्तीचे असल्याने सेनार्जींचे संपूर्ण कुटुंब धार्मिक वातावरणात एकरूप झालेले असे. त्यामुळे सेनार्जींना बालपणापासून भगवद्भक्तीची गोडी लागू लागली. वडिलांबरोबर रोज ते मंदिरात कथा-कीर्तनास व भजनास जात असत. घरी आलेल्या भक्तांसमवेत वडिल सतत धार्मिक चर्चा करीत, ही चर्चा सेनाजी लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांना बालपणापासून संतसंगतीने ईश्वराच्या भक्तीचा ओढा लागलेला होता.
‘सेना म्हणे या ग्रंथाच्या संपादनामध्ये माधवराव सूर्यवंशी सेनाजींच्या बालपणातील वैशिष्ट्यांबाबत संदर्भ देतात, “श्री चंद्रदत्तविरचित ‘संस्कृत भक्त माला’ यामध्ये त्या संदर्भामध्ये खालीलप्रमाणे उल्लेख सापडतो.
“स तु बाल्यं समारभ्य साधुसेवापरायणः। सेनो लब्ध्वा धनं सर्व दीनेभ्यश्च ददौरूद्रा॥”
सेनामहाराज बालपणापासूनच ईश्वरभक्तीमध्ये आकर्षित झालेले होते व साधुजनांची सेवा करण्यात रमलेले होते. शिवाय मिळालेला पैसा दीनदुबळ्यांना वाटून टाकण्यात ते सदैव तत्पर असत.
तसेच दमल्या भागलेल्या लोकांचे पाय चेपणे, गोरगरिबांची हजामत करणे, त्यांचे अंग रगडून चोळणे इत्यादी प्रकारची सेवा ते विनामोबदला करीत असत. या सारख्या सेवेचे संस्कार त्यांना वडिलांकडून मिळाले.
याशिवाय त्यांना चौफेर ज्ञानसाधना, चिंतन, बहुश्रुतपणा आल्याने त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची चमक लोकांना प्रभावित करत असे. तसेच निकटवर्तीयांना एक सोज्वळ, विनम्र म्हणून सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे आकर्षित होत असे.
रामानंदांचा अनुग्रह
सेनार्जींचे वडील देविदास स्वामी रामानंदाचे शिष्य होते. एकदा देविदास राजा रामसिंहाची सेवा करण्यासाठी राजवाड्याकडे निघाले होते. त्याच वेळी त्यांचे गुरू स्वामी रामानंद देविदासांचे घरी आले होते. अशा वेळी देविदासांनी आपला पूत्व सेनाजी यास गुरू रामानंदांचे आदरातिथ्य करण्याची सेवा सांगून दरबारी निधून गेले. “देविदास राजाची सेवा आटोपून घरी आले. तर स्वामीजी सेना समवेत धार्मिक विषयांवर चर्चा करताना दिसले. इतकेच नव्हे. तर त्यांची यथास्थित सेवा करून चर्चेला बसले होते. हा प्रसंग पाहून देविदासांनी रामानंदांस विनंती केली की, आपणा सेनास अनुग्रह द्यावा. या वेळी स्वामी रामानंदांनी अतिशय प्रसन्न
मनाने सेनाजींना अनुग्रह दिला” ‘भगवद्भक्त सेनाजी’ ग्रंथामध्ये भ० कृ० मोरे यांनी नमूद केले आहे. (पृ० क्र० १५, १६) ते पुढे म्हणतात, “रामानंद स्वामींचा उपदेश, ‘ईश्वर मातापिता यांची सेवा करण्यामध्ये
साधुवृत्ती प्रतीत होते. नीटनेटका प्रपंच करून इतरांचे अकल्याण न चिंतिता
न्यायनीतीस अनुसरून वागणे, यात जीवाचे रहस्य आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यातील कर्तव्य पार पाडण्यातही ईश्वरी सेवेचा मोबदला हाती लागतो. अशी त्यांची श्रद्धा होती.” (पृ० क्र० १७) जानदेव त्यांची भावंडे, त्यांचे वडील विठ्ठलपंत हे स्वामी रामानंदांचे शिष्य होते. म्हणून विठ्ठलपंत हे सेनाजींचे गुरुबंधू होते. भ० कृ० मोरे भगवद्भक्त सेनाजी चरित्रामध्ये म्हणतात, “काशी हे रामानंदांचे प्रचारकार्याचे ठिकाण, रामदत्त हे त्यांचे मूळ नाव, सुशीला ही त्याची माता. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सर्व
शास्त्राध्यायन केले. राघवानंद हे रामानंदांचे गुरू. रामानंद हे अल्पायुषी होते. पण
गुरुप्रसादाने समाधी लावून त्यांनी मृत्यूपासून स्वतःची सुटका करून घेतली. इसवी सन १३०० ते १४११ त्यांचा चरित्रकाळ. खाणे-पिणे, जाती-पाती या नियमांना महत्त्व न देता, यांच्या संप्रदायामध्ये केवळ रामभक्तीला महत्त्व असे. गोपाळकृष्ण उपासनेऐवजी रामसीता उपासना ही यांच्या संप्रदायाची मुख्य ओळख
स्वामी रामानंदांचे एकूण चौदा शिष्य होते. त्यामध्ये सेनाजींचा उल्लेख सापडतो. नामादासांनी भक्तमालेत (संपादक – राधाकृष्णदास)
“श्रीरामानंद रघुनाथ ज्यो दुतिय सेतु जगतरण कियो।
अनंतानंद, कबिर, सुखा, सुरसुरा पद्मावती, नरहरी।
पीपा भवानंद रैदास धना सेना सुरसुरा की नरहरी।
औरी शिष्य प्रशिष्य एकसे एक अजागर।”
अनंतानंदा, सुरसुरानंद, सुखानंद, नरहरियानंद, योगनंद, रोहिदास, पापा, तुळशीदास, कबीर, भवानंद, सेनाजी, धना, रमादास व पद्मावती असे रामानंदांचे चौदा शिष्य होते.
अलौकिक प्रसंग
सेनाजीच्या तरुण वयानुसार देविदासांनी सेनाजींचा विवाह करून दिला. पत्नीचे नाव सुंदरबाई, पत्नी सुस्वभावी, आज्ञाधारक, वृद्धत्वामुळे देविदासांनी आपला व्यवसाय मुलाकडे सुपूर्त केला. राजदरबारातील वृत्ती मुलाकडे लावून दिली आणि हरिभजनात आपला काळ ते घालवू लागले. महाराष्ट्रात पंढरपूरला विठ्ठल
दर्शनासाठी जावयाचे ठरले, पण प्रकृती साथ देत नव्हती. शेवटी सेनाजीना वडिलांनी जवळ बोलावून सांगितले. “दक्षिणेत एकदा जाऊन माझे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण कर.” आणि थोड्याच दिवसात वडिलांनी देह ठेवला, आई प्रेमकुंवर बाईनी थोड्याच दिवसांमध्ये इहलोकीची यात्रा संपविली. देविदासांच्या निधनानंतर राजसेवेचे कार्य अत्यंत तत्परतेने व निष्ठेने सेनानी
करू लागले. इतर वेळेत भजन-पूजन, कीर्तन, संतसमागम यामध्ये ते एकरूप होत. सेना पती-पत्नी घरी आलेल्यांचे अतिथ्यशील स्वागत करीत, तोच आपला परमात्मा मानीत. महाराष्ट्रातील अनेक वारकरी, उतर भारताची तीर्थयात्रा करून बांधवगड मागनि सेनाजींच्या घरी मुक्काम करीत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे संत, वारकरी, यात्रेकरी सेनार्जीच्या घरी मुक्काम करीत. सेनार्जीना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पूर्णपणे माहिती मिळत असे. त्यामुळे पंढरीच्या वारीची सेनाजींना अनिवार इच्छा होत असे; पण राजसेवेच्या बंधनामुळे वारी करता येत नव्हती.
राजा रामसिंहाच्या मृत्यूनंतर त्यांचा पूत्र वीरसिंह राजा झाला. तरुण राजा न्यायी, कडक शिस्तीचा, भडक स्वभावाचा तसा तो आत्मस्तुतिप्रिय त्यामुळे खुशमस्करे लोकांचा पगडा त्यांच्यावर सर्व बाजूने होता. राजाचा रोजचा कारभार लोकांच्या सल्लामसलतीने चाले; परंतु राजाची एक
गोष्ट गुप्त होती, ती केवळ राणी व सेनार्जीना माहीत होती. राजाला कुष्ठरोगाची बाधा होती. हा रोग घालविण्यासाठी ते अनेक औषधोपचार करीत असत. सेनामहाराजांचा रोजचा कार्यक्रम ठरलेला असे. सकाळी पूजाअर्चा, नामचिंतन, भजन करीत. नंतर काखोटीस धोकटी घेऊन व्यवसायासाठी घराबाहेर पडत. व्यवसायातील कुशलता, स्वभावातील विनम्रता व जातिपातीचा कसलाही विचार मनात न आणता भेदभाव न मानता, सर्वांशी आदरभावाने, आस्थापूर्वक श्मश्रूकार्य सेवा म्हणून करीत. राजाच्या दरबारी वेळेप्रमाणे थोडाही उशीर न करता हजर राहून राजसेवा करीत. दाढी करून तेल लावून, उटणे चोळून स्नान घालीत. सर्व कर्म आटोपल्यावर घरी येऊन पुनःश्च स्नान करीत. सेनाजी या सद्भात सांगतात,
“एका स्वधर्म विचार। धंदा करी दोन प्रहर ।
सांगितले साचार। पुराणान्तरी ऐसे हैं ॥
करुनिया स्नान। मुखी जपे नारायण।
मागुती न जाण। शिवू नये धोकटी ॥”
अनेकदा भगवद्भक्तांचा मेळा घरी येत असे. ‘साधुसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।’ या प्रसंगाने त्यांना नेहमी अत्यानंद होत असे. संतसेवे पुढे त्यांना इतर काही सूचत नसे. अनेक वेळा अशा प्रसंगी राजाच्या सेवेस जाण्यासही सेनाजींना उशीर होत असे. या प्रसंगी राजाला क्रोध येत असे. पुन्हा उशीर झाला तर कडक शिक्षा देईन, अशी ताकीद राजा देत असे.
अनेक वारकरी घरी मुक्कामास येत असत. पंढरपूर हे धार्मिक चळवळीचे केंद्र झाले होते. सेनार्जींना नेहमी पंढरीस केव्हा एकदा जाईन, ही उत्सुकता होती. कधी न पाहिलेल्या विठ्ठलास केव्हा एकदा पाहीन, ही अनिवार इच्छा. ‘पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी। जागृती स्वप्नी पांडुरंग॥ असा सेनाजींना ध्यास लागला होता. केव्हा एकदा पांडुरंग भेटेल ?
एक दिवस असेच महाराष्ट्रातून अनेक साधुसंतांची मांदियाळी सेनाजींच्या घरी मुक्कामास आली. ईश्वरीभक्तांच्या आगमनामुळे पती-पत्नीना खुप आनंद झाला. संतांचे स्नान, पूजापाठ, भोजन, विश्रांती यांसारख्या गोष्टींच्या व्यवस्थेला. पत्नी सुंदरबाई त्वरित सेवेला लागली. तीर्थयात्रा, धर्मविचार या चर्चेमध्ये सेनाजींचा सकाळी बराच वेळ गेला आणि राजसेवेची रोजची वेळ टळून गेली. राजदरबारी राजा वीरसिंह वाट पाहून बेचैन झाला, त्याने सेनाजीला बोलवण्यासाठी घरी सेवक पाठविले. दाराशी राजाची माणसे आल्यावर सुंदरबाईने सांगितले, “साधुसंत पाहुणेमंडळी घरी आलेत. थोड्याच वेळात त्यांचे आदरातिथ्य आटोपून येतील,” सेवकांनी दरबारी येऊन राजाला अतिशयोक्ती करून सांगितले. “सेनाजी साधूसंतांची सेवा झाल्याशिवाय दरबारी येणार नाहीत. मला साधू महत्त्वाचे आहेत.”
राजा कडाडला, संतापला, दारावरच्या चार शिपायांना बोलावून सांगितले. “सेन्याला बांधून माझ्या पुढे हजर करा” राजाच्या हुजऱ्यांना आनंद वाटला. ते म्हणू लागले, “लोकांनी या सेन्याला फार डोक्यावर घेतले आहे. तो म्हणतो “मी फक्त ईश्वराचा दास आहे… बाकी कोणालाही मी किंमत देत नाही.” त्यामुळे राजा कोपिष्ट झाला, हुकूम केला, “त्वरित त्याला देहदंडाची शिक्षा द्या. शिपाई राजाञ्ञेचा हुकूम घेऊन बाहेर पडले. राजवाड्याच्या बाहेर शिपाई पडताच, काखेत धोकटी अडकवलेले सेनाजी राजासमोर उभे, राजाच्या नजरेला दिसल्याबरोबर ‘सेनाजी’ला या शिपायांनी कसे पाहिले नाही, याचे नवल वाटले.
राजा सेनाजींच्या नजरेस पडताच स्मित हास्य करून म्हणाले, “घरी अचानक संतमंडळी आली, सेवकास उशीर झाला, कसूर माफी असावी, सेवकास क्षमा करावी.” राजाने सेनाजींचे उद्गार ऐकून, सेनार्जींची प्रसन्न मुद्रा पाहून राजा
खजील होऊन थिजून गेला, राजाच्या श्मश्रूसाठी आसन मांडून सेनाजी घोक उघडून बसले, राजाने सेनाजींच्या घरी पाठविलेल्या शिपायांना परत येण्याचा निरोप धाडला. राजा वीरसिंह हजामतीसाठी सेनार्जीसमोर आसनावर बसला. सेनाजींचा राजाच्या डोक्याला हस्तस्पर्श होताच, अलौकिक अशी अनुभूती आली. राजाचे संपूर्ण शरीर उत्साहित झाले. आज वेगळाच अनुभव राजाला जाणवला, त्या राजाला काय माहीत की, एका भक्तासाठी प्रत्यक्ष परब्रह्म सेनारूपाने अवतरला आहे, भक्ताचे प्राणसंकट टाळण्यासाठी देवच आलेत. महिपतीने जी कथा सांगितली. तो मूळ अभंग सेनार्जींचा पुढीलप्रमाणे
“करिती नित्यनेम। राये बोलविले जाण।
पांडुरंगे कृपा केली। राया उपरती झाली।
मुख पाहता दर्पणी। आत दिसे चक्रपाणी।
कैसी झाली नवल परी। वाटी माजी दिसे हरी।
रखुमादेवीवर। सेना म्हणे मी पामर॥” राजाच्या समोर हे नवल वर्तले.
भगवंत हा भक्तांच्या संकटसमयी आपले ब्रीद राखण्यासाठी योग्य वेळेला. रक्षणार्थ धावून येतो. मग संत सावता असतील, जनाबाई, सजन कसाई, कबीर, चोखामेळा, भक्त दामाजी यांसारख्या अनेक संतांच्या रक्षणासाठी देव धावून येतो. याचा संदर्भ अनेक अभंगांमधून पाहावयास मिळतो. सेनारूपी परमेश्वराने राजाच्या शरीराला हात लावताच शरीर पुलकित झाले. सर्व व्याधी-रोगातून शरीर मुक्त झाल्यासारखे वाटले. राजाच्या सर्व शरीरात
नवचैतन्य जाणवू लागले. राजाला वाटू लागले की, आपण किती दुष्टबुद्धीने सेनाजीशी वागलो. याचा राजाला पश्चाताप वाटू लागला. या कथेला पुष्टी देणारा या संदर्भात संत जनाबाईंचा (श्रीसकलसंतगाया भाग १ आवटे प्रत) एक अभंग आहे. हा संपूर्ण अभंग या अलौकिक प्रसंगावर आधारित आहे. संत जनाबाई, भक्तावर बेतलेल्या संकटसमयी ईश्वर कसा मदत करतो, ते सांगतात,
“सेना न्हावी भक्त भला। तेणे देव भुलविला॥ १ ॥
नित्य जपे नामावळी। लावी विठ्ठलाची टाळी॥२॥
रूप पालटोनि गेला। सेना न्हावी विठ्ठल झालो ॥ ३॥
काखे घेऊनि धोकटी। गेला राजियाचे भेटी॥ ४॥
आपुले हात भार घाली। राजियाची सेवा केली॥ ५ ॥
विसर तो पडला रामा। काय करू मेघश्यामा ॥६॥
राजा अनियांत पाहे। चतुर्भूज उभा राहे॥ ७॥ दूत घाडोनिया नेला। राजियाने बोलविला॥ ८॥ राजा बोले प्रिती कर। रात्री सेवा केली फार॥९॥ राजसदनाप्रती न्यावे। भीतरीच घेऊनि जावे॥१०॥ आता बरा विचार नाही। सेना म्हणे करू काई ॥ ११ ॥ सेना न्हावी गौरविला। राजियाने मान दिला ॥ १२ ॥ कितीकांचा शीण गेला। जना म्हणे न्हावी झाला ॥१३॥
(संत जनाबाई अ० क्र०२७७) प्रत्येक संकटसमयी भक्तवत्सल विठ्ठल आपल्या प्रेमळ भक्तांसाठी धाव घेत असतो. ईश्वर कायमच ‘संकटविमोचक’ हे बिरुद राखत असतो. या संदर्भात संत बका महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगात या घटनेचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. संत बंका म्हणतात,
“कोण भाग्यतया सेना न्हावियाचे। नीच काम त्याचे स्वये करी॥१॥
घेऊनि धोकटी हजामत करी। आरसा दावी करी बादशहासी॥ २॥
बंका म्हणे ज्याचे पुराणी पवाडे। तो भक्त साकडे वारीतसे॥ ३॥”
संत सेनामहाराजांच्या संदर्भात बंकाच्या दृष्टीने एक अलौकिक घटना आहे. सेनाल्पी ईश्वराने राजा वीरसिंह यांची श्मश्रू केली. तेल लावून मालिश केले. ईश्वराच्या अलौकिक स्पशनि वीरसिंहाच्या अंगावरून कुष्ठरोगाचे चट्टे त्यावरील रोग क्षणार्धात नाहीसा झाला. त्याची कांती तेजःपूंज बनली. राजाने अचानक तेलाच्या वाटीकडे पाहिले. तो काय चमत्कार, शंख, गदा, चक्र, पद्म धारण करणारा चतुर्भुज ईश्वरूप दिसले. राजाला प्रथम भ्रम वाटला, पण पुन्हा पुन्हा पाहू लागला; पण आश्चर्य! तेज:पुंज तेच रूप दिसले. राजाचे लक्ष आपल्या त्वचेकडे गेले. सेनारूपी ईश्वराला राजा म्हणू लागला, सेनाजी माझा रोग बरा झाला. सेनाजींनी केवळ स्मित केले.
सेनार्जींनी राजाकडे जाण्याची आज्ञा मागितली. “राजाने अतिशय प्रसन्न मनाने ओंजळभर सुवर्णमुद्रा सेनाजींच्या धोकटीत टाकल्या. सेनाजी मोठ्या प्रेमाने राजाचा निरोप घेऊन बाहेर पडल्याबरोबर क्षणार्धात अंतर्धान पावले. पूर्ववत सेनाजींची घोकटी घरी खुंटीला गेली.
इकडे साधुसंताची सेवा उरकून त्यांना विश्रांती घ्यावयास सांगून धोकटी । घेऊन ते जलदगतीने राजवाड्यात पोहचले. सेनार्जींनी राजाला दरबारी रीती- रिवाजाप्रमाणे मुजरा करून विनयाने उशीर झाल्याबद्दल राजाची क्षमा मागितली. राजा वीरसिंह सेनार्जीकडे पाहात राहिला. “असं काय करता सेनाजी, क्षमा कसली मागता? काही वेळापूर्वी माझी हजामत करून मालिश केली. आपण पुन्हा का आलात?” तर सेनाजी नम्रपणे डोळे विस्मयाने फिरवून म्हणाले, “महाराज, आपण माझी गंमत करता की काय? आज मी आपल्यापुढे आता प्रथमच आलो. घरी संतमंडळी आल्याने थोडा उशीर झाला.” राजा वीरसिंह म्हणाला सेनाजी, “तुम्ही आलात, माझी हजामत, मालिश केली, माझ्या अंगावरचा सर्व रोग बरा झाला.” थोडक्यात राजाने घडलेली सर्व घटना सोनाजींना सांगितली, रोग बरा झाल्याने मी ओंजळभर मोहरा धोकटीत टाकल्याचे सांगितले.
सेनाजींनी त्वरीत धोकटी उघडी करून पाहिली, तर धोकटी मोहरांनी भरलेली होती. हे सारे कसे व काय घडले याचा त्वरित उलगडा सेनाजींना झाला. खरोखरच देवाने या अवघड प्रसंगी आपली लाज राखली, अन् सेनाजींच्या डोळ्यांतून अश्र वाहू लागले; आणि अतिशय सद्गदित होऊन सेनाजी राजाला म्हणाले, “महाराज तुमची ज्याने श्मश्रू व मालिश केली, तो मी नव्हतो, तुम्ही खूप भाग्यवान आहात, माझ्यासारख्या सामान्य सेन्याच्या रक्षणार्थ प्रत्यक्ष ईश्वर माझे रूप घेऊन तुमच्या सेवेला आला. त्यांच्यामुळे, तुम्हाला चमत्कार दिसले, विलक्षण अनुभूती आली. खरोखर, तुम्ही धन्य आहात महाराज, ईश्वराचा साक्षात्कार तुम्हास झाला. तुमचा जन्म सफल झाला. मी केवढा अभागी आहे, माझ्यासाठी पंढरीरायाला विनाकारण कष्टविले. देवाला केवढे हीनप्रतीचे काम करावयास लावले. मी किती पापी आहे, त्यातून मी कसा मुक्त होऊ ?” त्यांच्या डोळ्यांमधून घळघळ अश्रू वाहू लागले. सेनाजी दुःख करीत राहिले. राजाला घडलेल्या घटनेतील सत्यता लक्षात आली. ज्याला आपण आपला चाकर समजतो, त्या सेनाजीला प्रत्यक्ष देवाचे कृपाछत्र लाभले आहे. केवढा मोठा भगवद्भक्त, या प्रसंगाने राजाने सेनाजींपुढे साष्टांग दंडवत घालून त्यांचे पाय धरले. राजेपणाच्या अहंकारात सेनाजींच्या योग्यतेची जाणीव वीरसिंहाना झाली नाही. राजाने सेनाजींकडे गुरुकृपेचा वरदहस्त मागितला. सेनामहाराज देवास म्हणू लागले,
“सेना म्हणे हृषिकेशी। मजकारणे शिणलासी।
म्हणूनि लागतो चरणाशी। संसारासी त्यागिले॥”
हळूहळू प्रपंचापासून सेनाजींचे मन विरक्त झाले, प्रपंचाचे स्वरूप त्यांना समजले, सेनार्जीनी राजाला गुरुदीक्षा दिल्यावर, राजाला सांगून आपला
यात्रेला जाण्याचा निश्चय केला; पत्नी व मुलगा यांना राजाचे पदरी सोपविले. संसारत्यागाबद्दल सेनाजी म्हणू लागले,
“आवडे प्रपंच सुख वाटे मना। ईश्वर भजना अंतर तो।
माय बाप बंधू भगिनी जाया। मुले मुली माया सुख नाही।
वेळ येता व्याधी छळी, अंत होय। वाटेकरी न होय दूर राहे॥
सेना म्हणे प्रपंच भ्रमाचा भोपळा। आत कडू पोकळा, वरी चमके॥”
सेनार्जींनी यात्रेची तयारी केली. प्रपंच हा लटका आहे. आतून कडू असलेला भ्रमाचा भोपळा आहे, त्याचा त्याग करणे हिताचे आहे. वीरसिंहाबरोबर सेनार्जींचा संवाद झाला. तीर्थयात्रेला जाण्याचे कायम करून राजाला म्हणाले, मी देहत्यागापूर्वी निश्चित परत येईन आणि सेनाजी महाराष्ट्रामध्ये यात्रेसाठी निघून गेले.
चला जाऊ पंढरीसी
मध्य भारतातील तीर्थक्षेत्रे पाहात पाहात सेनाजी महाराष्ट्रातील पंढरपुरास आले. सेनाजींना पंढरपुरी आल्यावर जीवनाचे सार्थक झाले, असे वाटले. अपरिचित भक्तजन एकमेकांना उराउरी भेटून क्षेमकुशल विचारीत होते. एकमेकांना ग्रेटण्याबरोबर जेवणखाण्याचा आग्रह परोपरीने होत होता. संतमंडळीत जातिपातीचा भेदाभेदाचा लवलेशही नाही, या सख्यत्वाच्या भावनेने भेटीचा हा अपूर्व सोहळा सेनार्जीनी अनुभवला. चंद्रभागेत स्नान, पुंडलिकाचे दर्शन घेऊन विठ्ठल मंदिरात सेनाजींची पांडुरंगाबरोबर भेट झाली. त्यांना विठ्ठलाच्या नयनमनोहर मूर्तीचे दर्शन आपल्या नजरेत भरून घ्यावे असे वाटू लागले. प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याकडे पाहात आहे. नव्हे, सेनार्जींना तो एक साक्षात्कारच वाटला.
विठ्ठलाचे दर्शन झाल्याने सेनाजी त्याचे पुढीलप्रमाणे वर्णन करतात,
“विटेवरी उभा नीट देखिला गे माये।
निवाली कांती हरपला देहभाव ॥१ ॥
ते रूप पाहता मन माझे वेधले॥
नुठेचि काही केले तेथुनि गे माये॥ २॥
अवघे अवधियांचा विसर पडियेला॥
पाहता चरणाला श्रीविठोबाच्या॥ ३॥
सेना म्हणे चला जावू पंढरीसी॥
जिवलग विठ्ठलाशी भेटावया॥ ४ ॥
विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर त्याच्या संदर्भात सेनाजी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त करतात. पंढरपूर क्षेत्र सेनाजींना इतके आवडले की, त्यांना विठ्ठलाजवळच कायम वास्तव्य करावे, असे वाटले. पंढरीबद्दल भक्तिभाव व्यक्त करताना सेनाजी म्हणतात,
“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशव भेटताची॥१॥…”
ऐसा विटेवरी उभा कटेवरी करा।
ऐसा पाहता निर्धार नाही कोठे॥ ५ ॥”
सेनाजीच्या हृदयावर पंढरीने खूप मोठी मोहिनी टाकली, कारण सेनाजींनी घर संसार, प्रपंच यांचा पूर्ण त्याग केला होता; पंढरीत श्रीज्ञानदेव-नामदेवांचे वास्तव्य होते. आषाढी कार्तिकी वारीस सर्व संत परिवार विठ्ठल दर्शनासाठी येत असत. संतांचा सहवास सेनाजींसाठी खूप मोठी मिळकत होती. गोरा कुंभार, सांवताजी, नरहरी सोनार, परिसा भागवत, जनाबाई, नामदेव समकालीन सर्व संत ‘रामकृष्णहरी’चा जयघोष करून परस्परांच्या चरणी माथा टेकवित असत. कीर्तनाच्या रंगात नाचत असत. सारे पवित्र दृश्य मोठे आल्हाददायक होते. सामाजिक समतेचा एक सुंदर आविष्कार विठुच्या सहवासात जाणवत होता. सर्वच संतांचा सेनाजींशी परिचय झाला होता. संतसंग हा इतका आनंददायी होता.
“संताचे पाय मस्तकी। सरतो झालो तिही लोकी ॥ १ ॥
लोळेन चरणावरी। इच्छा फिटेल तोवरी ॥ २॥
नाही सेवा केली। मूर्ति डोळा म्या पाहिली ॥ ३॥
कृतकृत्य सेना न्हावी। ठेवी पायावरी डोई॥ ४ ॥”
नामदेव समकालीन बहुतेक संतांच्या पायीचे दर्शन सेनाजींनी घेतले होते. त्या दर्शनाने सेनार्जींचे जीवन सार्थक झाले होते. म्हणून ते पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणांवर माथा टेकवित होते. म्हणूनच की काय, संत जनाबाई सेनाजींबद्दल म्हणतात,
“सेना न्हावी भक्त भला। तेणे देव भुलविला।”
हा एक समकालीन संतांनी त्यांच्याबद्दल केलेला गौरवच आहे. संत सेनाजींचा श्रीनामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पूर्व इतिहास सांगितला. ज्ञानदेवादी भावंडांची चरित्रे सांगितली. खरे म्हणजे सेनाजींना वाटले होते की, ही सर्व भावंडे भेटतील, पण महाराष्ट्रात आल्यानंतर समजले की, ही सर्व भावंडे काही वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेऊन त्यांनी आपल्या जीवनयात्रा संपवल्या आहेत.
बांधवगडला राहणाच्या सेनाजींना हे समजले नव्हते. गुरुबंधूंच्या मुलांचे दर्शन सेनाजीना न मिळाल्याने कष्टी झाले होते; पण नामदेवाने सांगितले या चारही विभूती अमर आहेत, चिरंजीव आहेत. आजही त्र्यंबकेश्वर, आळंदी व सासवडला जा तुम्हाला त्यांना भेटल्याची प्रचीती निश्चित येईल.
मेनाजी तीनही तीर्थक्षेत्री गेले, त्या त्या समाधीजवळ जाऊन त्यांचे दर्शन शेतले. आळंदीला सेनाजींनी बराच काळ मुक्काम केला ज्ञानदेवांच्या समाधीस्थ विभूतीच्या दर्शनाने सेनाजींच्या आयुष्याचा शीण निघून गेला. ज्ञानदेवांच्या सर्व यांच्या प्रती मिळविल्या. त्याचा अभ्यास केला. केवळ गुरुबंधूंची मुले म्हणून त्यांची दृष्टी पूर्ण एकरूप होऊन गेली. श्रीज्ञानदेवांबद्दल अतिशय ऋणात्मक भावना सेनाजींनी व्यक्त केली.
“ज्ञानदेव गुरू ज्ञानदेव तारू।
उतरील पैल पारू ज्ञानदेव॥ १॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता।
तोडील भव व्यथा ज्ञानदेव॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे।
जिवलग निरधरि ज्ञानदेव॥ ३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान।
दाविली निज खूण ज्ञानदेवे ॥ ४॥
श्रीसकलसंतगाथा भाग १) ज्ञानदेवांबद्दल अत्यंतिक ऋण व्यक्त करून ज्ञानदेव हे सर्वेसर्वा आहेत. इतकेच नव्हे तर माझ्या कल्याणासाठी स्वतःची खूण दाखवून मार्गदर्शन केले आहे.
सेनामहाराज आळंदीचा मुक्काम आटोपून महाराष्ट्रातील बहुतेक तीर्थक्षेत्री गेले. त्या त्या तीर्थक्षेत्री त्यांचे कीर्तन होत असे. त्यांचे अनेक भाविक ज्ञातिबांधव कीर्तन श्रवणाचा लाभ घेत असत. “आपले आचरण शुद्ध ठेवून हरिभजनाविना वेळ घालवू नका.” असा हितोपदेश अनेक भाविकांना सेनाजी देत असत. त्यांचा मुक्काम हा निवृत्तीनाथ – त्र्यंबकेश्वर, सोपानदेव – सासवड, एदलाबाद – मुक्ताबाई, पुणतांबा- चांगदेव यांच्या समाधिस्थानांमध्ये जास्त काळ होता.
संत सेनामहाराज महाराष्ट्रभर सुमारे २० वर्षे तीर्थयात्रा करीत राहिले. आता शेवटी आळंदीत मुक्काम करावा असे वाटले; पण पंढरपुरात महाद्वाराच्या पायरी खाली संत नामदेव संजीवन समाधी घेणार आहेत, हे समजले. सेनाजी मजल दरमजल करीत आळंदीहून पंढरीस पोहोचले. ही वार्ता समजल्याने सेनाजीना आत्यंतिक वेदना झाल्या. सेनाजींनी पायरीजवळच नामदेवांच्या चरणांचे दर्शन
घेतले. नामदेवांच्या समाधीची तयारी झाली होती. विठ्ठलनामाच्या गजरात नामदेव । समाधीस्थ झाले. नामदेवांच्या समाधीनंतर संत जनाबाई व नामदेवांच्या सर्व । समकालीन परिवारातील संतांनी एका मागे एक समाधी घेतल्या. हे समाधी सोहळे संत सेनाजींनी विषण्ण मनाने डोळ्यांनी पाहिले.
या सर्व घटना त्यांच्या डोळ्यांसमोर घडत होत्या. त्यामुळे, सेनाजींच्या मनावर सतत त्याचे आघात होत गेले. संत नामदेवांच्या संदर्भात सेनाजींनी श्रीनामदेव समाधी प्रसंगी आरती लिहिलेली असावी. असे भाविकांचे मत आहे.
“भक्तामाजी अग्रगणी। तूचि एक आहे मनी। वैकुंठीच्या ध्वजा आणिल्या भूतळा लागोनि ॥ १ ॥
जयजयाजी महाराजा। जिवलगा नामया॥ आरती करीता चित्त रंगले तब पाया॥ २॥
आवंढ्या नागनाथी देऊळ फिरविले॥ मृत प्रेत गाय कीर्तनी उठविले॥ ३॥
प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानेश्वर अवतार। घ्यावया भक्ती सुखी केला जगाचा उद्घार॥४॥
काळी समाजावर फार मोठा प्रभाव होता. त्यांचा रामभक्तीचा संप्रदाय लोकांनी त्वीकारला होता. त्यांच्या चौदा शिष्यांमध्ये सेनाजींची गणना महत्त्वाची मानली जाते.
संत नामदेवांप्रमाणे महाराष्ट्राबाहेर येऊन सेनार्जींना उत्तर भारतातील हिमाचल प्रवेश, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार या राज्यात रामभक्तीचा प्रचार सुरू करून उच्चनीच जातिभाव सोडून समान पातळीवर जगण्याचा संदेश दिला. सेनार्जींनी हिंदी, मारवाडी, पंजाबी इत्यादी भाषेत भक्तीवर आधारित काही पदे लिहिली आहेत. त्यातील पंजाबी पदांचा शिखांचे ‘गुरुग्रंथ साहिब’ या धर्मग्रंथात समावेश केलेला आहे. पद ‘धूप दीप धृत साज आरती।
वारणे दा कमला पती।
संतरत्न सेनामहाराज आगळे व्यक्तिमत्त्व’ या लेखात लक्ष्मण शंकर शिंदे यांनी वारकरी संप्रदायाच्या संतांची संगत-सोबत मिळाल्याने स्वामी रामानंदांच्या पावलावर पाऊल न टाकता “महाराष्ट्रातील संतांच्या शिकवणीचा परिणाम सेनाजींच्या मनावर झाला. रामानदानी राम-सीता उपासनेची शिकवण दिली; पण सेनाजींनी गुरूंच्या पावलावर पाऊल न टाकता स्वतंत्रपणे वैष्णव धर्माचा पुरस्कार केला व मध्यभारतात प्रचार केला. सेनामहाराज महाराष्ट्रात आले. आळंदी. पंढरपूर, सासवड वगैरे तीर्थांच्या ठिकाणी ते जात. ते पंढरपूरचे एकनिष्ठ वारकरी झाले होते व नित्यनियमाने पंढरीची वारी करीत ज्ञानदेवांच्या संप्रदायातील ते एक संत कवी होत.”
उत्तर प्रदेशातील काशी येथे ‘सैन पंथ’ सेनाजर्जीच्या नावे स्थापन झालेला आहे; परंतु हा पंथ त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला असावा. त्यांच्या समाज बांधवांच्या मनामध्ये सेनार्जींबद्दल आदर असल्याने या पंथाची स्थापना झाली असावी. या पंथाच्या उत्तर भारतामध्ये शेकडो शाखा आज अस्तित्वात आहेत. सेनाजींनी ‘हरिभक्ती’ या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण उत्तर भारतामध्ये केला. या भक्तिपंयाचा प्रचार करता करता सेनार्जींची प्रकृती क्षीण होऊ लागली होती. बांधवगड सोडताना राजा वीरसिंहला दिलेला शब्द सेनाज्जीना आठवला व या उतारवयात ते आपल्या सहकारी भक्तांसमवेत बांधवगडला निघाले.
महायात्रा (समाधी)
सेनार्जीच्या अनेक चरित्रकारांनी सेनाजी हे महाराष्ट्राबाहेर जन्माला आले, महाराष्ट्रात वीस वर्षे वारकरी संप्रदायाच्या संत समुदायात राहिले, असे सांगतात. त्यामुळे त्यांची कविता मराठी मातीशी एकरूप झाली. ते पांडुरंगाच्या भक्तीत
रममाण झाले. उत्तर भारताच्या यात्रेला गेले व शेवटी मध्यप्रदेश बांधवगढ येथे त्यांची जीवनज्योत अखंड तेवत राहिली. सेनार्जींचे अखेरचे दिवस जवळ येत होते. राजा वीरसिंह त्या वेळी राजाधीश होता. सेनाजी बांधवगडात अतिशय विरक्त वृत्तीने वागून अखंड ध्यानधारणा करीत असत. सतत पंढरीच्या पांडुरंगाचे स्मरण करीत असत. त्यांची चित्तवृत्ती पूर्ण विरून गेली होती. निराकाराची समाधी लागली.
सेनाजींच्या जीवनयात्रेच्या समाप्तीच्या संदर्भात निळोबा म्हणतात
“जय जयजी विष्णुदास। भक्तिभाव तुझा कैसा॥
जन्मोती न्हावियाचे वंशी। भक्ति केली तुवा भोळी॥
प्रत्यक्ष पूर्णब्रह्म दावी। राजयासी आरसा ॥
दावियेले कौतुक। देव पूजेचिये वेळी ॥
श्रावण वद्य द्वादशी। सेना बैसे समाधीसी।
निळा शरण प्रेमभावे। विष्णुदास सोनियासी॥
सेनाजींच्या समाधीचे नेमके वर्ष उपलब्ध नाही; परंतु पां० ना० कुलकर्णी (‘सेना म्हणे’ प्रस्तावना) यांनी समाधीचे साल साधारणपणे इसवी सन १३५८
असावे, असे म्हणले आहे. श्रावण वद्य द्वादशीस त्यांचे अवतार कार्य संपले. आज सेनाजींच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्या स्मरणार्थ मठ, मंदिरे व धर्मशाळा बांधल्या आहेत. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार नाभिक संघ करीत असताना दिसतो. सेनाजींच्या मृत्यूनंतर बांधवगड येथे त्यांच्या स्मरणार्थ राजा वीरसिंहाने एक मोठे भव्य-दिव्य समाधी मंदिर बांधले होते आज बांधवगडही ढासळला आहे. मात्र सेनाजींचे समाधीस्थळ एका चबुतराच्या स्वरूपात उरलेले आहे. (संत सेना महाराज, अभंगगाथा संपादक, गुळवणे-शिंदे)
संत सेनामहाराज व वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय म्हणजेच भागवत संप्रदाय होय. या संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये धार्मिक चळवळ उभी केली; नव्हे आध्यात्मिक चळवळीचे १३व्या शतकातील ते एक केंद्रबिंदू बनले होते. मराठी मुलखात ज्या ज्या सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक चळवळी झाल्या, त्याची मध्यवर्ती विचारधारा ही वारकरी संप्रदायाचीच होती. ही चळवळ सुरू केली ती ज्ञानदेव-नामदेवांनी, सर्व समाजाला समान पातळीवर आणून अद्वैत तत्त्वज्ञानाची मूळ बैठक देऊन, भक्तितत्त्वाचा गाभा तयार करून, आध्यात्मिक लोकशाहीच त्यांनी निर्माण केली. अशा संप्रदायाशी नामदेव
परिवारातील समकालीन संत यांनी एकत्र येऊन एकजूट बांधली. अशा मक्तिपंयाशी संत सेनामहाराजांचे अतिशय मोठे भावनिक, भक्तिमय संबंध होते, मुळात संत सेनामहाराज महाराष्ट्राबाहेरील हिंदी भाषिक होते की, महाराष्ट्रातील मराठी भाषिक होते, याबाबतीत अनेक विद्वानांमध्ये संशोधक, अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यांची मते अभ्यासल्यानंतर वाटते; परंतु क्षणभर समजा सेनाजी उत्तर भारतातील होते असे समजले तरी त्यांची पंढरीच्या विठ्ठलाबद्दल असणारी ओढ त्यांच्या कवितेतून दिसते. तसेच पांडुरंगाच्या उत्कट भक्तिभावना, त्यांनी मराठी भाषेत सहज केलेली अभंगरचना, आपण वाचली तर ते मराठी भाषिक नव्हे तर महाराष्ट्रीय मातीत जन्माला आलेले संत वाटतात. त्यांच्या रचनेचे स्वरूप मराठी भाषा – बोली यांच्याशी त्यांचे असलेले भावस्पर्शी नाते, आपलेपणा प्रत्येक चरणाचरणातून व्यक्त होताना दिसते. सेनाजींचा प्रत्येक अभंग मराठी माणसाच्या मनाला भुलविणारा आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य दैवत श्रीविठ्ठल याला मध्यवर्ती ठेवून आपल्या अभंगांची निर्मिती केली आहे. अशा सेनार्जींचे संप्रदायाशी नाते अजोड होते. हे निश्चित आहे. सेनाजी महाराष्ट्रातच होते. पंढरीस वर्षातून दोन वेळा साधुसंत येत. त्यांच्या गाठीभेटी होत असत. ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।’ ही विठ्ठलाविषयीची परमभक्तीची भावना सेनाजींच्या मनात सतत रुंजी घालत होती. ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक। ऐसा वेणूनादी काला दावा।’ या भक्तीमय भावनेतून कीर्तन, भजन, पूजन पंढरीस सतत करीत. संत मेळ्यांच्या संगती-सोबती भक्तीमय वातावरणात ते एकरूप होत असे.
वारकरी संप्रदायातील अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी केवळ भेटी दिल्या नाहीत, तर ते महिनोंमहिने मुक्काम करीत, ज्ञानदेवादी भावंडे यांच्यावर सेनाजींचे खूप प्रेम होते, भक्ती होती. विशेषतः पंढरपूर, आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असलेल्या संजीवन समाधीस्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत, हे त्यांच्या तीर्थमाहात्म्य अभंगातून दिसते.
विटेवरी उभा। जैसा लावण्याचा गाभा॥
पायी ठेवूनिया माथा। अवधी वारली चिंता॥
समाधान चित्ता। डोळा श्रीमुख पाहतात।
बहुजन्मी केला त्याग। सेना देखे पांडुरंग ॥”
आराध्यदैवत विठ्ठलाविषयी निःसीम एकनिष्ठ भक्ती जन्मोजन्मी केलेल्या भक्तीचे फळ म्हणजे आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पांडुरंग पाहावयास मिळत आहे.
ज्ञानदेवादी भावंडांबद्दल अलौकिक असा कौटुंबिक वात्सल्य भाव असून या भावंडांच्या वडिलांचे म्हणजे विठ्ठलपंतांचे सेनाजी गुरुबंधू होते. ज्ञानदेव हे। अलौकिक प्रतिभावंत साहित्यिक, आध्यात्मिक क्षेत्रातील तत्त्ववेत्ते, त्यांच्याविषयी सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान। दाविली निजखुण ज्ञानदेव। आपल्या अनेक अभंगांमधून भावंडांविषयी अनन्यसाधारण भक्तिभाव व्यक्त करताना दिसतात. निवृत्तीनाथांबद्दल आदर व्यक्त करताना ते म्हणतात,
शिवाचा अवतार। स्वामी निवृत्ती दातार।
तया माझा नमस्कार। वारंवार निरंतरा ॥…
सेना घाली लोटांगण। वंदी निवृत्तीचे चरण॥”
अर्थात भावंडांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सेनाजी त्याविषयी पूज्यभाव व्यक्त करतात. सेनार्जींच्या भक्तिभावनेवर या भावंडांचा किती मोठा प्रभाव होता. हे स्पष्ट होते.
ज्ञानदेव-नामदेव समकालीन संतांच्या भक्तीचा, भाषेचा, तत्कालीन संस्कृतीचा संस्कार …
जञानदेवादी भावंडे व श्री नामदेव यांच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते, म्हणून ते महणतात, “तुमच्यामुळे माझा उद्धार झाला.” ही ऋणानुबंधाची भावना त्यांनी संतांप्रती व्यक्त केली आहे. हा खूप मोठा प्रभाव संप्रदायातील संतांच्या विचारांचा सेनाजींच्या मनावर झालेला होता. संप्रदायामध्ये पंढरीची वारी, पुंडलिकाचे दर्शन पांडुरंगाची भेट, यामध्ये सारे सुख सामावले आहे, अशी भक्तिभावना, या भावनेचे प्रत्यंतर सेनाजींना आलेले होते. वारीला आलेला संत विठ्ठलाचे दर्शन घेतो, ही भेटीची आतुरता सेनाजींनी अनुभवली असल्याने, पांडुरंगाविषयी, नाम भक्ती- विषयी, भक्तमावनेविषयी संतांच्या भेटीविषयी अनेक अभंगरचना केल्या आहेत. या अभंगांमधून संप्रदायाचे आचार, विचार, तत्त्व त्यांनी अनुभविले.
प्रा० डॉ० ना० स० गवळी यांनी ‘श्रीसंत सेनामहाराज’ या लेखामध्ये सेना महाराजांचे एकूण तीर्थक्षेत्राच्या ते महाराष्ट्रात जास्त रमलेले असावेत, असे म्हणतात. “महाराष्ट्र हीच त्यांनी कर्मभूमी मानली असल्याचे दिसते. पंढरी आणि पांडुरंगाचा महिमा त्यांच्या अनेक अभंगांमधून व्यक्त होतो. महाराष्ट्राबाहेर पंजाब प्रांतातही त्यांनी समाजप्रबोधन केले. तेथील लोकांनी त्यांना आपलेसे केल्याचे दिसते. शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरुग्रंथसाहेब’ मधघ्ये नामदेवांप्रमाणेच सेनाजींच्या पदाचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आवडत्या पंढरपूर तीर्थक्षेत्राबरोबर ते पैठण, आळंदी, त्र्यंबकेश्वर, सासवड आदी ठिकाणी तीर्थयात्रा करून आले. त्या ठिकाणच्या स्थान माहात्म्यांवर त्यांनी अभंग केले आहेत. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपानकाका या संतांच्या महतीवर त्यांनी भरभरून अभंगरचना केल्या आहेत.” (सद्गुरू श्रीसंत शेख महंमदमहाराज विशेषांक, २०१५, संपा० श्रीरंग लोखंडे,
यावरून सेनाजींचा पंढरपुरातील संतांचा व अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संतांचा प्रेमानुबंध अतिशय घट्ट होता. ते संप्रदायाचे व पांडुरंगाचे निष्ठावंत सेवकभक्त होते. ते ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीतील भक्तश्रेष्ठ होते.
सेनामहाराज – समकालीन व उत्तरकालीन संत
संत नामदेव समकालीन संत म्हणून महाराष्ट्रात संत सेनाजींचा उल्लेख केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक संतांचा सहवास, भजन कीर्तनातून संगत सोबत सेनाजींना मिळालेली होती. सेनाजींनी मुक्ताबाई, सोपान, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, संत नामदेव यांचे उल्लेख अभंगांमधून वारंवार केले आहे. त्याप्रमाणे सेनाजींच्या संदर्भात त्यांच्या समकालीन आणि अनेक उत्तरकालीन संतांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. सेनाजींच्या संदर्भात राजाच्या हजामतीच्या
प्रसंगाच्या वेळी, सेनाजींच्या रूपात विठ्ठलाने वीरसिंह राजाची सेवा केली. हा उल्लेख अनेकांच्या अभंगांमधून, ओवी, श्लोकांमधून आलेला आहे. ही कथा अतिशय अभिरुचीपूर्णपणे सांगितलेली दिसते. प्रत्यक्ष सेनाजींनी सुद्धा हा प्रसंग स्वतःच्या अभंगातून गायला. याची साक्ष खालीलप्रमाणे अशी आहे.
करिता नित्यनेम। राये बोलाविले जाण ॥ १ ॥
मुख पाहता दर्पणी। आंत दिसे चक्रपाणी ॥ ३॥
पांडुरंगे कृपा केली। राया उपरती झाली॥२॥
कैसी झाली नवलपरी। वाटी- माझी दिसे हरी॥४ ॥
रखुमादेवीवर। सेना म्हणे मी पामर॥५॥”
(श्रीसकलसंतगाथा सेनामहाराज अ० क्र० ९४) सेनार्जींच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेचा महत्त्वाचा संदर्भ त्यांनी आपल्या वरील अभंगात दिला आहे. केवळ या घटनेतून राजाला परमात्मा दर्शन होते, ही गोष्ट सेनाजींसाठी खूप मोठी कृपेची जाणीव आहे. सेनाज्जींसाठी (भक्तासाठी) प्रत्यक्ष ईश्वर कसा शिणला, हा एक साक्षात्कार आहे. या संदर्भात अनेक संतांनी त्यांचा गौरव केला आहे.
संत जनाबाईंनी तर भक्तासाठी विठ्ठल न्हावी झाला, असे म्हणले आहे. हा प्रसंग जनाबाई खालील अभंगामधून मांडून सेनार्जींचे कौतुक केले आहे.
“सेना न्हावी भक्त भला। तेगे देव भुलविले॥ १ ॥
नित्य जपे नामवली। लावी विठ्ठलाची टाळी ॥ २॥
रूप पालटोति गेली। सेना न्हावी विठ्ठल झाला॥ ३॥
काखे घेऊनि धोकटी। गेला राजियाचे भेटी ॥ ४ ॥…१२,१३
संत सेना न्हावी यांच्या चरित्रपर अभंगातून विठ्ठलाच्या साक्षात्काराचा प्रसंग सांगितला आहे. हा अभंग शं० गो० तुळपुळे यांनी प्रक्षिप्त मानला आहे. काळाचा विचार केला तर हा अभंग स्वीकृत स्वरूपाचा वाटतो.
संत सेनाजींबद्दल समकालीन संतांमध्ये सश्रद्धभाव होता. सेनाज्जींचे महत्व्व व मोठेपण सर्वज्ञात होते. सेनाजींच्या बाबतीत विठ्ठलाचे प्रेम, तो चमत्कार संत चोखामेळ्यांचा मेहुणा संत निर्मळाचे पती संत बंका यांनी आपल्या अभंगातून सांगितला आहे. अर्थात हे उल्लेख खुप महत्वाचे आहेत. असे ते म्हणतात.
“कोण भाग्य तया सेना न्हावियाचे। नीच काम त्याचे स्वये करी ॥ १ ॥
घेऊनि धोकटी हजामत करी। आरसा दावी करी बादशहासी॥२॥..
बंका म्हणे ज्याचे पवाडे। तो भक्त साकडे वारितसे॥४॥”
(श्रीसकलसंतगाथा, संत बंका, अ० क्र० ३२) वरील दोन्ही संतांनी सेनामहाराजांच्या संदर्भात गौरवलेले प्रसंग त्यांच्या काळाच्या निर्णयाच्या संदर्भात जसे मदत करणारे वाटतात, तसे सेनामहाराजांच्या संदर्भातही वाटतात. राजाची हजामत, सेवा करणे हे कमी प्रतीचे काम, तरी प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या मदतीसाठी धावून येतो, हे केवढे भाग्य सेनाजींच्या बाबतीत आहे, याचा निर्देश संत बंका करतात.
सेनाजींच्या जवळपास उत्तर काळातील महाराष्ट्राबाहेरील संत कबीर, संत मीराबाई, नरसी मेहता, नानकदेवजींनी आपल्या रचनेतून नामनिर्देश केला आहे. उदाहरणार्थ कबीर म्हणतात, “सेना भक्त को संशय भेटो। आप भये हरी नाई किंवा “सेना भगतकी चाकरी किये। आप बने नापित भाई” असा दोन वेळा कबीरांच्या रचनेतून उल्लेख झालेला आहे. संत मीराबाई सेनाजींच्या संदर्भात “सेना जातका नाई वो।” तर संत नरसी मेहतांनी “बारो विरुद्ध घेटे कैसी भाई रे। सेना नायको साचो मीठो। आप मये दूर भाई रे।” असा मजकूर दिला असल्याचे (मराठी भाषेचा व वाङ्मयाचा इतिहास खंड १, बा० अ० भिडे) सांगितले आहे.
सेना उत्तरकालीन संतांमध्ये संत एकनाथांनी आपल्या ‘दिवटा’ नामक भारुडामध्ये
“सांवता, नामा, दामाजाण।
नारा, म्हादा, गोंदा, विठा, कबीर कमाल पूर्ण।
सेना जगमित्र नरसीब्राह्मण।
दिवटे निष्ठती बया दार लाव॥”
(श्रीसंतसकलगाथा, श्रीएकनाथमहाराज अ० क्र० ३९६३, खंड २) दोन ठिकाणी संत सेनाजींचा उल्लेख केला आहे. एकनाथमहाराजांनी श्रीज्ञानदेव- नामदेव समकालीन सर्व संतांचा नामनिर्देश करून उत्तर भारतातील (हिंदी) संतांची नावे गुंफलेली आहेत. यामध्ये संत सेनाजींच्या नावाने रचना केली आहे. “सेना नानक पूजा करिता। देवने धोकटी लिया देखा॥” (चरण क्र०२६)
सतराव्या शतकातील संत तुकारामांनी श्री नामदेवकालीन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा नामोल्लेख आपल्या अभंगांमधून केला आहे.
(श्रीसंतसकलगाथा, भाग २, संत तुकाराममहाराज अ० क्र० ३२६७) यामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश। जेथे हरिचे दास जन्म घेती॥” या हरीच्या दासामध्ये तुळाधर वैशनाय, गोराकुंभार, रोहिदास चांभार, कबीर, मोमीन, लतिफ, कान्होपात्रा, दादू पिंजारी, चोखामेळा, बंका, नामयाची जनी, मैराष्ठ जनक आणि सेना न्हावी. “सेना न्हावी जाण विष्णुदास” हे सर्व विठ्ठलाचे पोवाडे गाणारे भाट होत. असे
संत तुकारामांनी स्पष्ट केले आहे. अर्थात या अभंगातून संत तुकोबांनी एक सिद्धान्त मांडला आहे की, ‘यातायाती धर्म नाही विष्णुदासा’ ज्या ठिकाणी विठ्ठलाचे भक्त जन्माला येतात तेथे कोठेही धर्माचा स्पर्श नसतो. या सर्व संतांच्या मालिकेमध्ये संत सेनाजींचा संत तुकारामांनी अतिशय
महत्त्वपूर्ण गौरव हरिभक्त म्हणून नामनिर्देश केला आहे. वारकरी संप्रदायातील परंपरेप्रमाणे संत निळोबा हे सरतेशेवटचे संत होत. यांनी आपल्या अभंगातून (अ० क्र० ५३३) पूर्वकालीन संतांमध्ये संतांच्या मांदियाळीत संत सेनाजींच्या नावाचा समावेश केला आहे.
ते आपल्या अभंगातून भक्त देवाच्या भजनी लागता लागता देव केव्हा होऊन जातात.
“देवचि झाले अंग। देव भजता अनुरागे॥१॥
शुक प्रल्हाद नारद। अंबकषी रक्मांगद॥२॥
निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान। नामा साधना आणि जाल्हण॥३॥
कुर्मा विसोबा खेचर। सांवता चांगा बटेश्वर।॥ ४ ॥
कबीर सेना सुरदास। नरसी मेहता भानुदास॥ ५॥
निळा म्हणे जनार्दन एका। देवचि होऊनि गेला तुका ॥ ६॥”
(श्रीसकलसंतगाथा, भाग २, श्रीनिळोबारायांचे अ० क्र० ५३३)
संत सेनारजींबद्दलचा संत निळोबांनी जो आदरभाव दाखविला आहे, तो केवळ उल्लेख म्हणून नव्हे, तर त्यांच्या ईश्वरभक्तीच्या नितांत व श्रेष्ठ भगवद्भक्त असा नामनिर्देश आहे. त्यांच्या समवेत अनेक ईश्वर भक्तांची नावे गुंफली आहेत. यात शुक्र, प्रल्हाद, नारद, अंबऋषी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, नामदेव, जाल्हण, कूर्मा, विसोबा खेचर, सांवता, चांगा, कबीर, सुरदास, नरसी मेहता, भानुदास, संत एकनाथ, संत तुकाराममहाराज अशा निळोबा पूर्वकालीन संतांची नामावली मोठ्या आदराने, गौरवाने निर्देशित केली आहे. संत सेनाजींनी मानवी देहाला लगडलेले सहा शत्रृंबर विजय मिळवलेला आहे. या संदर्भात सन्मणिमाला मोरोपंत (आर्याकार) सेनाजींबद्दल मोठ्या आदराने म्हणतात,
“जो भक्ति सरितपूरी षड़ींची सर्व वाहावी सेना।
रुचला मनात बहुतेचि तो। भगवद्भक्त नाहती सेना ॥”
मोरोपंतांनी सेनाजींसंदर्भात केलेला उल्लेख हा फारच गौरवपूर्ण आहे. अठराव्या शतकामध्ये जन्माला आलेल्या महिपतीबुवा ताहराबादकर यांनी भक्त लीलामृतामध्ये वारकरी संप्रदायातील संतांच्या संदर्भात रचना केली आहे. अध्याय ३१ मध्ये ते म्हणतात,
सेना न्हावी जातीचा नीच। तयासि संकट पडता साच ॥
श्रीहरिने रूप धरोनि त्याचे। दासत्व रायाचे केलेकी॥”
किंवा
“सेना न्हावी भक्त थोर। हरिभजनी अतित तत्पर॥
त्याचे चरित्र अति प्रियकर। ऐका सादर भाविकहो॥”
सेनाजींबद्दल महिपतींनी अध्याय ३४ मध्ये अखंड चरित्रवजा रचना केली आहे. सेनाजींच्या अभंग रचनेतील अनुभव ताहराबादकरांनी चरित्राच्या रूपाने मांडले आहेत.
वारकरी संप्रदायातील संत सेनार्जींबद्दल १४ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंतच्या अनेक संतांबद्दल गौरवपर उ…
आज जी अभंगरचना उपलब्ध आहे, ती वैविध्यपूर्ण अशी आहे. भक्ती आणि परमार्थ हा त्यांच्या अभंगाचा प्राण आहे. सेनाजींची अभंगसंपदा अनेक अभ्यासक संशोधक संस्था यांनी चिकित्सकपणे संपादित केल्या आहेत.
‘भगवद्भक्त सेनाजी’ या चरित्रात्मक ग्रंथामध्ये (इसवी सन १९४५) समारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी भ० कृ० मोरे या संत साहित्याच्या अभ्यासकाने सेनाजींच्या २६० अभंगरचना संपादित केल्या आहेत. श्रीसकलसंतगाथा भाग १, १९६७. त्र्यं० ह० आवटे प्रत. संपादक, का० अ० जोशी यांनी गाथेमध्ये १६७ अभंग संपादित केले आहेत.
कै० ल० रा० पांगारकर व डॉ० शं० गो० तुळपुळे यांनी सेनाजींच्या १५० अभंगरचना सांगितल्या आहेत. तर माधवराव सूर्यवंशी यांनी ‘सेना म्हणे’ (इसवी सन २०००) या ग्रंथात २५७ अभंग संपादिले आहेत. तर संत सेनामहाराज : अभंगगाथा (इसवी सन २०००) संपादक : श्रीधर गुळवणे, रामचंद्र शिंदे यांनी २६२ अभंग रचना संपादिल्या आहेत. याच ग्रंथात सैणिदास, सेना न्हावी, सैनिदासाचे या नावाने मिळून ४३ पंजाबी पदे शोधून संपादली आहेत. अशा अनेक अभ्यासकांनी त्यांच्या अभंगरचनांचा शोध घेतला आहे.
मराठी साहित्यात सेनाजींनी एक मोठी मोलाची भर अभंगरचनेच्या रूपाने घातली, असे डॉ. हेमंत वि० इनामदार सांगतात, ते म्हणतात “ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील एक उज्वल दीपस्तंभ म्हणून संत सेनामहाराज यांचे नाव घ्यावे लागेल. समाजाने उपेक्षिलेल्या जातीत त्यांचा जन्म झाला होता; पण आपल्या उत्कट भक्तीच्या बळावर त्यांनी ती कोंडी फोडली. आपल्या अमृतमय अभंग वाणीतून विठ्ठलभक्तीचा महिमा त्यांनी विशद केला. संत नामदेव तीर्थयात्रेच्या निमित्ताने उत्तर भारतात जाऊन आले आणि तेथे त्यांनी विठ्ठलभक्तीचा ध्वज फडकवित ठेवला.
‘संत सैन’ या नाममुद्रेने उत्तर भारतात माहिती असलेले सेनामहाराज तेथून महाराष्ट्रात आले आणि मराठी संतांच्या परंपरेत, त्यांनी मानाचे स्थान मिळविले. मराठीतील अभंगसंपदेत आपल्या रससंपन्न रचनेने त्यांनी मोलाची भर घातली. आजच्या ‘आंतर भारतीचा’ पहिला आविष्कार नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वात आणि कवित्वात प्राण आहे. नामदेवांचा हाच वारसा सेना महाराजांनी समर्थपणे सांभाळला आहे.” (संत सेनामहाराज अभंगगाथा : संपादक : गुळवणे-शिर्द प्रस्तावना, पृ० ८)
संत सेनाजींच्या अभंगवाणीचे उत्कट दर्शन डॉ० हे० वि० इनामवारानी वरीलप्रमाणे घडविले आहे.
अभंगांचे विषय
संत सेनामहाराज यांच्या एकूण अभंगरचनांची संख्या दोनशे सत्तावन्न इतकी असल्याचे मानले जाते. रचनेच्या दृष्टीने त्यात विविधता आहे. अभंग, ओवी, गवळणी, विराण्या, पाळणा, आरत्या आणि भारूडे या स्वरूपात रचना सेनाजींच्या नावे उपलब्ध आहेत. अंतरीचा प्रांजळ असा भक्तिभाव, संवेदनशील जिव्हाळा, मनाचा प्रांजळपणा त्यांच्या रचनांमधून ठायी ठायी प्रत्ययास येतो.
सेनाजींचे जे अभंग गाथेमध्ये उपलब्ध आहेत, त्यात विषयाची विविधता आहे. या विषयात नामविषय, विठ्ठल वर्णन, संतविषयक, उपदेशविषयी, तीर्थक्षेत्र महिमा, व्यवसाय विषय, इतर भाषेतील, आत्मपर, व्यवहारविषयक व गवळणी यांसारख्या अनेक विषयांवर अभंगरचना करून त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्या काळात केला आहे.
समाजातील व्यवहार, अंधश्रद्धा माणसाच्या ठिकाणी असलेले षड्रिपू यांचा निर्देश केला आहे. सेनाजी एक प्रकारे समाजप्रबोधनाचे, प्रपंचातील उद्बोधनाचे काम करीत आहेत. समाजजागृती निर्माण करण्याचे महत्कार्य त्यांच्या अभंगातून दिसून येते. संत सेनाजींच्या अभंगगाथेमधून सांसारिक माणसांना फार मोठे अमृत मिळाले आहे.
याबद्दल ह० भ० प० बाळासाहेब भारदे आशीर्वादात अभंगांबद्दल बोलतात, “उद्योगातही योगस्थिती अनुभवणाऱ्या संत मालिकेत सेनामहाराज यांना मानाचे स्थान आहे.
“आम्ही वारिक वारिक। करू हजामत बारिक।
विवेकदर्पण आयना दावू। वैराग्य चिमटा हालवू॥”
अशा अभंगातून या अलौकिक उद्योगयोगाची साक्ष पटते.
डोक्यावरील केस काढताना डोक्याच्या आत असणारी मायामोहाची जळमटे काढण्याचे कामही या संताने केले. केश कर्तनाच्या कौशल्याबरोबरच सद्वर्तनाच्या व हरिकीर्तनाच्या मांगल्याची प्रचीती या संताने जनता जनार्दनास दिली. अशा संत पुरुषाची अभंगगाथा म्हणजे सामान्य सांसारिक जिवांना संजीवनच वाटेल यात शंका नाही.” (संत सेनामहाराज अभंगगाथा, थोरांचे आशीर्वाद, पृ० ५)
सेनाजींच्या एकूण अभंगाकडे दृष्टिक्षेप टाकला तर ते सतत कर्मकांडावर व अंधश्रद्धेवर प्रहार करतात. बारकाईने पाहिले तर मध्ययुगीन कालखंडातील ते एक घोर सामाजिक प्रबोधनकार असल्याचे जाणवते. सेनाजींच्या वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या रचनांचे पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे.
नाममहिमाविषयी अभंग
संत सेनामहाराजांनी नाममहिमाविषयी अनेक अभंग रचले आहेत. भक्ताला प्रपंचातील मायामोहापासून सुटका करून घेण्यासाठी परमात्म्याचे नामस्मरण हा एक त्यावर उतारा आहे. प्रपंचसुखासाठी माणूस अनेक लटपटी-खटपटी करतो व आपला जन्म वाया घालवितो. त्याऐवजी त्याने परमेश्वराचे नामस्मरण करावे, विठ्ठलाच्या नामात एवढी शक्ती आहे की, सेनाजी म्हणतात,
“नाम घेता विठोबाचे। भय नाही कळिकाळाचे ॥
सांगितले संतजनी। बोले वेदशास्त्र वाणी ॥”
किंवा
“घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ॥
ऐसा नामाचा महिमा। वेद शिणला झाली सीमा ॥
नामे तारिले अपार। महापापी दुराचार॥
वाल्हा कोळी ब्रह्महत्यारी। नामे तारिली निर्धारी॥”
(संत सेना अ० क्र० ५२) विठ्ठलाचे मुखाने नाम घेतल्यास पापांचे प्रचंड मोठे पर्वत जळून खाक होतात. या संदर्भातील त्यांनी आपल्या अभंगातून पुराणकथांमधील व्यक्ती नामाचे संदर्भ दिले आहेत. त्यामध्ये दुष्ट ब्रह्महत्याची वाल्या कोळी, पिंगला नामक गणिका, पूतना राक्षसी, शिवभवानीचे गुप्त मंत्र की ज्या मंत्रापुढे कोणत्याही मंत्राचा टिकाव लागत नाही. ईश्वराच्या नामस्मरणाने मुक्ती मिळते. असे अनेक नाममहिमाचे संदर्भ सेनाजींनी दिले आहेत. योग, याग, जप-तप ही भक्तिमार्गातील साधने अवघड असल्याने त्याचा खटाटोप न करता, नाम हे सहज सुलभ असून ते घेता येते.
“नाम साधनाचे सार। भवसिंधू उतारी पार॥
तिन्ही लोक श्रेष्ठ। नाम वरिष्ठ सेवी हे॥”
वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्या रचनांमधून नामाचा महिमा सर्व भाविकांसाठी, भक्तांकरिता भक्ती हे सुलभ साधन आहे, हे सर्वांसाठी खुले आहे, हे स्पष्ट केले आहे. सेनामहाराजांनी नामभक्ती ही सर्वांसाठी सहजसाध्य असल्याने आपल्या अभंगामधून सांगितले आहे.
विठ्ठलाविषयी अभंग
वारकरी संप्रदायातील ज्ञानदेव-नामदेवकालीन संत व उत्तरकालीन सर्वच संतांनी श्रीविठ्ठलाविषयीचे माहात्म्य आपल्या अभंगांमधून व्यक्त केले आहे.
पंढरीचा विठ्ठल हेच मूलतः वारकऱ्यांचे आद्य दैवत आहे. त्याला ज्ञानदेवांनी ‘कानडा विठ्ठलू’ म्हणून गौरविले. तर संत नामदेवांनी “विटेवरी उभा दिनांचा वैवारी” असे संबोधून त्याला अवघ्या सामान्यांचा कैवारी म्हणले आहे. श्री संत नामदेव समकालीन संतांमध्ये सर्वांनीच विठ्ठलाचे महत्व त्याची भक्ती विशद केली आहे. ज्ञानदेवांपासून निळोबारायांपर्यंत भक्तांच्या श्रेणीमधील सर्वांना विठ्ठल जावडणारा, भावणारा विठ्ठल म्हणजे ‘संतांचे माहेर’ असाच अंतरीचा भाव, संत सेनाजी तर विठ्ठलाचे निःसीम भक्त, त्यांनी विठ्ठलाविषयी अनेक अभंग लिहिलेले आहेत. विठ्ठलाचे रूप वर्णन, महिमा, जिवीचा विसावा, विठ्ठलाचे स्वरूप, पंढरीचा राणा, पंढरीचा सखा लावण्याचा गाभा, पंढरीबाप सखा पांडुरंग यांसारख्या समर्पक शब्दांमधून पंढरीनाथाच्या, विठ्ठलमूर्तीच्या, रूपाचे वर्णन आपल्या अभंगरचनेतून केले आहे.
सावळ्या सुंदर अशा पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवल्यास संपूर्ण काळजी, विवंचना नाहीशी होते, याचा प्रत्यय सेनाजीना आलेला आहे. म्हणून ते म्हणतात,
“विटेवर उभा जैसा लावण्याचा गाभा।
पायी ठेऊनिया माथा। अवधी वारिली चिंता ॥।
समाधान चिंता। डोळा श्रीमुख पाहता॥
बहुजन्मी केला लाग। सेना देखे पांडुरंग॥”
(संत सेना अ० क्र० ०६) असे सहजसुंदर विठ्ठलाचे वर्णन करताना म्हणतात, विटेवर उभा राहून मताची सदैव वाट पाहणारा कसा दिसतो, याचे अतिशय मनोहारी वर्णन सेनाजींनी केले आहे. रत्नांचा मुकुट, कानी कुंडल, मोत्याचा तुरा, पायातील पैंजण सुवर्णकांती पीतांबर अशा बहु अलंकृत असलेल्या ‘विटेवरी उभा नीट देखिला गे माये’ त्यामुळे मनातील दाह शांत होतो. अशा विठ्ठलाचे पवित्र चरण नजरेस पढताच मला सर्व गोष्टींचा विसर पडतो. मनातील मी-तूपणाची भावनाच नष्ट होते.
माझे संपूर्ण देहभान हरपून जाते.
सेनामहाराज विठ्ठलाला शरण जाताना म्हणतात
“आम्हा हेचि अलंकार। कंठी हार तुळशीचे ।
नाम घेऊ विठोबाचे। म्हणवू डिग तयाचे।
चित्ती चाड नाही। न धरू आणिकांची काही।
सकल सुख त्याचे पायी। मिळे बैसलिया ठायी।
सेना म्हणे याविण काही मोक्ष मुक्ती चाड नाही ॥”
किंवा
“बुडतो भवसागरी। मज काढी बा मुरारी।॥
आता न मानी भार काही। माझी पाही माउली।
करी जतन ब्रिदावली। वागविशी ते सांभाळी॥
मी महादोषी चांडाळ। सेना म्हणे तू दयाळ॥”
(संत सेना अ० क्र० ६७) अशा या विठ्ठलाकडून असामान्य सुखाची प्राप्ती होती. या मिळणाऱ्या सुखापुढे मला मोक्षमुक्ती इतर कशाचीही पर्वा नाही. इतका मी विठोबाचा दास आहे. तसेच सेनाजी भवसागरातून वर काढण्याची विनंती विठ्ठलाला करतात. आयुष्यात विठ्ठलच महत्त्वाचा आहे. कारण या देहाचा कोणालाच भरवसा नाही. ‘धनसंपत्ती पाही। हि तो राहील ठायी।
माणसाच्या जीवनाचे सार्थक करावयाचे असेल तर पांडुरंगाला शरण जा. जे जे भक्त पांडुरंगास शरण गेले, त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले, ज्यांनी पुराणांचा वेदांचा अभ्यास केला, त्यांचा अभ्यास वाया गेला, त्यांचे जीवन निरर्थक गेले, ज्यांनी विठ्ठलाचे चिंतन केले. त्यांचे जीवन सार्थकी लागले.
“उपमन्य आधि धरू। स्मरणे तरले निर्धारू।
प्रल्हाद तरला। स्मरता नरहरी पावला॥”
ध्रुव बाळ, उपमन्यू, भक्त प्रल्हाद, भक्त पुंडलिक यांनी ईश्वराचे संकटसमयी नामस्मरण केले. भक्तावर ईश्वराची कृपादृष्टी झाली. ते भक्त संकटमुक्त झाले, अशी प्रेमळ भक्ती सेनाजींनी पुराणकथांच्या माध्यमातून व्यक्त केली. विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरीपंथातील कोणाही भक्तास ध्यास लागतो. तो भक्त खूप सुखावतो. विठ्ठलाच्या दर्शनास गेला की,
गेलो गेलो पंढरपुरा। ऐकला नामाचा गजर ॥
स्नान केले चंद्रभागा। दर्शन केले पांडुरंगा॥”
पंढरीनगरीजवळ गेलो की, नामाचा गजर ऐकणे, चंद्रभागेत स्नान करणे, भक्त पुंडलिकाचे दर्शन घेणे आणि पांडुरंगाच्या चरणी माथा टेकविणे, हा पूर्वीपासूनचा प्रघात व भक्तिपरंपरा आहे, असे सेनाजी सांगताना म्हणतात, “संतांना शरण जाऊन त्यांना उराउरी भेटणे. विठोबा हे संतांचे गुरुमाउली, सतत त्याचे नामस्मरण करून सेवा करणे.
विठ्ठलाच्या भेटीसाठी मुखाने जयजयकार करीत,
“पाहिला पंढरी महिमा। दिंडी पताका नाही सीमा ॥
संत नाचती वाळवंटी। टाळ मृदंगाचे आटी॥”
बारकन्यांचे विठ्ठलाप्रती असणारे वैभव, पंढरी वैभव संत डोळे भरून पाहतात. ‘हरिचे दर्शन पाहू डोळा भरूनी। मस्तक चरणी ठेवूनिया। विठ्ठलाच्या होळे मिटलेल्या अवस्थेत नेत्र तृप्त होतात, असे दर्शनसुख भक्तास मिळत राहा, अशी भक्तिभावना सेनाजी विठ्ठलाचे माहात्म्य व्यक्त करताना म्हणतात व विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन जातात. संत सेनाजींनी पंढरीचे केलेले वर्णन त्यांच्या वर्णनशैलीची आणि कवित्वशक्तीची साक्ष देणारी आहे.
आत्मपर अभंग
सेनाजींनी आत्मपर अभंगात विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकूळता व्यक्त करून स्वतःच्या चुका प्रांजळपणे कबुल करून, त्यांनी त्यांची भावस्थिती व्यक्त केली आहे. या आत्मपर अभंगांमधून घडणारा जिव्हाळ्याच्या व भक्तिभावाचा आविष्कार हा सेना महाराजांच्या अभंगांचा विशेष आहे. अशा अभंगातून सेनाजी अंतःकरणाची अवस्था, विठ्ठल दर्शनाची ओढ, उत्कटतेने व्यक्त करतात. आपल्या अंगी असलेल्या दोषांची प्रांजळता स्पष्टपणे व्यक्त करून विनम्रपणे, विनयाने विठ्ठलाजवळ शरण जातात. ‘सेना पापाचा पुतळा। तुज शरणजी दयाळा॥’ असे म्हणून विठ्ठलाला जवळ घेण्याची विनंती करतात. परमेश्वर हा दयाळू असून तो भक्तांच्या चुका हृदयात घालून त्याला आपल्याजवळ करतो. विठ्ठल हा कल्पवृक्ष आहे. वात्सल्यमूर्ती आहे. असे आत्मप्रगटीकरण सेना विठ्ठलापुढे व्यक्त करतात.
“बुडतो भवसागरी। मज काढी, बा मुरारी॥
आता न मारी भार काही। माझा पाही माऊली॥
करी जतन ब्रीदावळी। वागविशी ते सांभाळी ॥
मी महादोषी चांडाळ। सेना म्हणे तू दयाळ॥”
(संत सेना अ० क्र०६७) असे म्हणून विठ्ठलास काकुळतीला येऊन या भवसागरातून वर काढण्याची विनंती करतात. परमेश्वर आणि भक्त याचे नाते, मायलेकराचे आहे. आई आपल्या लेकराचे सर्व अपराध पोटात घालते. त्याप्रमाणे ईश्वराने माउलीप्रमाणे बाळाला जवळ घ्यावे. पुढील अभंगात
“लेकुराची आणी मायबापा पुढे।
पुरवी लाडेकोडे लळे त्याचे ॥
करावा सांभाळ सर्वस्वी गा आता।
कां हो अव्हेरिता जवळीचा॥”
असा पश्चात्तापदग्ध मनाचा, आतंतेचा व्याकुळतेचा प्रत्यय, सेनामहाराज यांच्या आत्मपर अभंगांमधून येतो. ईश्वर आणि भक्त यांच्यातील जिव्हाळ्याचे नातेसंबंध सेनाजी विविध उदाहरणांनी सांगतात-
बरोनि येती। वत्सा घेनु पान्हा देती॥
तुम्ही करावा सांभाळ। माझा अवघा सकळ ॥”
अशी सेनाजी मनोमन ईश्वराजवळ विनवणी करतात. त्यांचे सर्व आत्मपर अभंग त्यांच्या आर्तभावनांची भक्तिमय स्पंदने आहेत व भक्तिभावाचा अभंगातून ठायीठायी उत्कटपणे प्रत्यय देतात.
संतांविषयी अभंग
‘धन्य महाराज पुंडलिक मुनी। वैकुठीचा सखा आणिला भूतला लागोणी।’
अशा भक्त पुंडलिकाचे पुढे प्रथम सेनाजी नत होतात.
संत सेनाजींनी आपल्या अभंगगाथेत अनेक अभंगांमधून संत महिमा गायिलेला आहे. ज्या ज्ञानेश्वरांना अवघे संत गुरुमाऊली म्हणून आदराने पुकारतात. पण त्यांनाही ज्ञानामृत देणाऱ्या त्यांचे गुरू निवृत्तीनाथांची थोरखी सेनाजी सांगताना दिसतात.
“निवृत्ती निवृत्ती। म्हणता पाप नुरेचि।
जप करिता त्रिअक्षरी। मुक्ती लोळे चरणावरी।॥ ”
निवृत्तीनाथांचा उच्चार करताच पापाचा लवलेश राहात नाही, इतकी मोठी थोरवी निवृत्तीनाथांची सेनाजी सांगतात. आदिनाथाचा जो गुप्त मंत्र श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने श्रीज्ञानदेवांनी सर्व जगाला सहज दिला. अशा ज्ञानदेवांना वारकरी पंथामध्ये फार मोठे आदराचे स्थान आहे. “इये मराठीचिए नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। याबद्दल सर्व संतांच्या मनात आत्यंतिक মक्तिमाव आहे. सर्व संतांची ती माउली झाली. सेनाजी ज्ञानदेवांचे स्तवन करताना म्हणतात –
“विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर॥
चला जाऊ अलंकापुरी। संतजनांच्या माहेरी॥
स्नान करीता इंद्रायणी। मुक्ती लागती चरणी॥
ज्ञानेश्वरांच्या चरणी। सेना आला लोटांगणी ॥”
(संत सेना अ० क्र० १२१) भगवान विष्णूचा अवतार असणारा ज्ञानेश्वर, त्यांची अलंकापूरनगरी ही सर्व
संतांचे माहेरघर आहे. कारण ‘येऊनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर’ तेथे गेल्यावर ज्ञानेश्वरांच्या नावाचा पवित्र उच्चार करता येतो. ज्ञानदेवाचे नाव । घेताच, ‘या ज्ञानदेवांचे नित्य नाम घेती वाचे । उद्धरती त्यांची सकळ कुछे। अवघ्या कुळाचा उद्धार होतो, असे सेनाजी सांगतात.
“धन्य धन्य तो ज्ञानराजा। निवृत्ती तो मान माझा।
सोपान मुक्ताबाई अधोक्षजा। नमन केले साष्टांग।”
जानराजा धन्य असून निवृत्तीनाथ हा माझा मानदंड. तर सोपान मुक्ताबाईस लासह साष्टांग नमस्कार करतो. असा संतांबद्दल सेनाजी आदर व्यक्त करतात. संत ज्ञानदेवांची थोरवी गाताना सेनाजी म्हणतात, ज्ञानदेव गुरू असून तेच सारणहार आहेत. तेच माझे मातापिता, सगेसोयरे, जिवाचे जिवलग तर दैवत आत्मखूण आहे.
श्रीनिवृत्तीनाथांनी भक्तिमार्गाचा पंथ दाखविला व वारकरी संप्रदायाचा पूर्ण अधिकारी ज्ञानदेवांच्या हाती त्यांनी सुपूर्त केला. ‘निवृत्ती कृपेने ज्ञानदेवे प्रगट । बडता भवसागरी जया काढिले बाहेरी।’ गुरूंच्या कृपाप्रसादाने ज्ञानदेवांनी सर्वांसाठी ज्ञान सर्वांसाठी खुले केले.
श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानकाका, मुक्ताई ही चाराही भावंडे वारकरी पंथातील भक्तांसाठी (आदराची) श्रद्धास्थाने आहेत. संत सेनामहाराजांनी या सर्व संतांना वेगवेगळ्या देव-देवतांची नावे देऊन त्यांचा आदराने महिमा वर्णन केला आहे. शिव, विष्णू, ब्रह्म, आदिमाया या सर्वांचा आळंदीला निवास आहे. येथे पंढरीच्या पांडुरंगाने संपूर्ण जगाला तारण्यासाठी येथे तीर्थक्षेत्र निर्माण केले आहे.
सेनाजींनी योगी चांगदेवांचा उल्लेख केवळ मुक्ताबाईंच्या संदर्भात केलेला विसतो. स्वतंत्र असा संदर्भ चांगदेवांचा दिसत नाही. संत नामदेवांबद्दल त्यांनी एकच पद लिहिले आहे; परंतु नामदेवांच्या समकालीन संतांमध्ये गोरा कुंभार, जनाबाई, चोखामेळा यांचा कोठेही अभंगात उल्लेख दिसत नाही. तसेच उत्तर भारतीय संतांचा सुद्धा त्यांच्या मराठी अभंगरचनेत नामनिर्देश केलेला आढळत नाही.
संत सेनाजींना संतांच्या कृपेमुळे श्रवण, कीर्तन, भजन, पूजन यासारखी भक्तीमार्गाची साधने प्राप्त होतात, त्यामुळे ते अतिशय आनंदी राहतात. संतांच्या सहवासाने काय प्राप्त होते ?
“संताचा समाज करी नामघोष। श्रवणांनी दोन जातील गा ॥” किंवा
“संत जे बोलती अमृतवचन। शुद्ध अंतःकरण होईल गा॥”
किंवा
“संत जगी आहे थोर। अज्ञानी उद्धरली फार॥” किंवा
“स्वप्नामाजी झाली संतभेट। केली कृपादृष्टी पामरासी॥”
किंवा
पाहिला संताचा दरबार। दिंड्या पताकाचा भार।”
किंवा
“संत दर्शनाचा लाभ हा मानसी। उल्हासचित्तास होत राहे”
किंवा
“श्री संतदर्शने आनंदले मन। घाली लोटांगण चरणावरी॥” यांसारख्या अनेक अभंगरचनांमधून संतांची थोरवी, महत्त्व, आदर, मोठेपण व दर्शन झाल्याने सेनाजींना आत्मसुखाची प्राप्ती झाली आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत व वारकरी सदैव विठ्ठलाच्या नामाचा जयघोष
करीत असतात. शुद्ध अंतःकरणाने अमृतासमान नामघोष करीत राहा, असा संदेश
संत सेनाजी देताना म्हणतात,
ऐशीया साधनी घ्या संतभेटी। मुखी जगजेठी उच्चारा गा॥
सेना म्हणे सत्य ठेवा विश्वास। विनंती सर्वांस सांगतो गा॥
ते जे बोलती अमृतवचना। शुद्ध अंतःकरण होईल गा॥”
संतांचे मुखी सतत अमृतवचनच येईल असा विश्वास ठेवा, अशी विनंती सेनाजी सर्व समाजाला करतात.
उपदेशाविषयी अभंग
वारकरी पंथातील बहुतेक संतांनी बहुविध विषयांवर अभंगरचना केल्या आहेत. अभंगरचनेमागील हेतू संतांना वाटते म्हणून स्वतःच्या सुखासाठी किंवा लोकोद्धारासाठी अभंग रचना करतात. संत हे अंतर्मुख म्हणजेच आत्मपर, आत्म समाधानापोटी लिहिलेले अभंग किंवा जगकल्याणार्थ लिहिलेले आहेत. जसे जल हे स्वतः शीतल थंड राहते. तसे अग्नी विझवण्यास त्याचा उपयोग होत असतो. स्वतः तसे ब्रह्मरस स्वतः सेवन करणारे व इतरांनाही त्याचे वाटप करणारे आहेत. हेच संत निरामयवृत्तीने, उदार मनाने व श्रेष्ठ कारुण्यभाव जपणारे असतात, हेच पुढे निर्मळवृत्तीने भक्तीच्या पवित्र वाटा दाखविण्याचे आत्मबुद्धीने व्यापक असे कार्य करीत असतात. ईश्वराची भक्ती करता करता त्यांच्या मनामध्ये समाजाबद्दल कारुण्यभाव, कळवळा तयार होतो. हळूहळू त्यांच्या मनात उपदेशवाणी तयार होते. आपल्या आसपास असणाऱ्या साधकांना मार्गदर्शन, उपदेश करण्याचे काम सवा म्हणून करीत असतात.
संत सेनामहाराजांनी तेच केले. ते अपवाद नाहीत. त्यांच्या अभंगातील उपदेश हाही त्यांच्या कवितेचा विशेष आहे. स्वतःच्या आत्मोच्धाराची व जनसामान्य
विषयीची तळमळ त्यांच्या कवितानिर्मितीमागे आहे. त्यांच्या मते जीवनाचे सार्थक करावपाचे असेल किंवा आत्मसुखाची प्राप्ती करावयाची असेल तर परमेश्वराची महत्वाची आहे. सेनाजी म्हणतात,
“हित व्हावे मनासी। दवडा दंभ मनासी॥
अलभ्या लाभ येईल हाता। शरण जावे पंढरीनाथा॥
चित्तशुद्धी करा। न देई दुजियासी थारा॥
हेचि शस्त्र निर्वाणीचे। सेना म्हणे धरा साचे ॥”
पवित्र अंतःकरणाने विठ्ठलाची भक्ती करणे, हेच अंतिम शस्त्र आहे. सेनाजींनी उपदेश करताना काही पौराणिक दाखले दिले आहेत. ईश्वर प्राप्तीसाठी जप, तप, लौघाटन काही कामाचे नाही, अनेकदा खूप श्रम घेऊन प्रवास केला असता तो प्रवास वाया जातो. त्या प्रवासाचे धन रानात चोरांकडून लुटले जावे, तसे आहे. जसे विभांडक, शृंगी यासारखे अनेक ऋषीमुनी अरण्यात जाऊन तपश्चर्येला बसले, पण रंभा नामक अप्सरेकडून ते नागवले गेले आणि त्यांचा तपोभंग झाला. त्यांना देव तर भेटला नाहीच, तुम्ही स्वतः त्याचे वाटेकरी असता, पण तपश्चर्या निष्फळ ठरली.
समाजाला उद्देशून सेनाजी म्हणतात, ‘तुमच्या आयुष्यात तुम्ही आंधळेपणाने धनदौलती मागे लागता. बायका, मुले, भाऊ यांचा पाप-पुण्याच्या वाटणीत काही संबंध नसतो. म्हणून लौकिक जीवनात विठ्ठलाशिवाय तुम्हाला कोणी वाली नाही. माणून सेनाजी सर्वांना विचारतात,
“धन कोणा कामा आले। पण विचारून भरले॥
ऐसे सकल जाणती। कळोनिया आंधळे होती॥”
हा आध्यात्मातील वैश्विक विचार अतिशय स्पष्टपणे मांडून सेनाजी तुम्हा- जोम्हांचे डोळे खडखडीत उघडवितात. लौकिक जीवनातील, प्रपंचातील धनसंपदा, नाती-गोती काहीच कामात राहात नाही. प्रपंच सुख हे क्षणैक आहे. परमात्मसुख मात्र शाश्वत आहे. हे वरील अभंगातून अधोरेखित करतात.
सेनाजी सांगतात, संतसंगती व नामचिंतन हीच हा भवसिंधू पार करण्याची महत्त्वाची साधने आहेत. मनाला ईश्वर चिंतनाची गोडी लावणे, विठ्ठलाला सतत चित्तात धरून राहावे. तरच पापाचे डोंगर सहज नाहीसे होतील, स्वतःला मिळालेला सुखाचा मार्ग इतरांना सांगा.
“स्वहित सांगावे भले। जैसे आपणासी कळे ॥ १ ॥
त्यचाया पुण्या नाही पार। होय अगणित उपकार॥२॥
मोहपाशे बांधिला। होता तोहि मुक्त केला ॥ ३॥
जेणे वाट दाखविली। सेना म्हणे कृपा केली॥ ४ ॥
(संत सेना अ० क्रo २६) मुळातच मायामोहाने मनुष्याच्या भोवती पाश आवळले जातात, सेनाजी भोवतीसुद्धा हे पाश आहेत, अशा बांधल्या गेलेल्या सेनार्जींना विठ्ठलाच्या चिंतनाने मुक्त केले आहे. समाजामध्ये जे दुर्जन, पापी व अधम लोक आहेत, अशांना समाजात जी प्रतिष्ठा, लौकिक मिळालेला आहे. ते सहजपणे नाहीसे करा, त्यांची तोंडे बंद करून त्यांना लाथा घालून दूर लोटा. अशा त्रास देणार्यांना सेना म्हणतात,
“त्यांची संगती जयास। सेना म्हणे नरकवास।”
आपल्या घरी एखादा सद्गृहस्थ, सज्जन आला तर, त्याला जेवण द्या. नाही म्हणू नका. जो असे करणार नाही, तो दुष्ट, दुराचारी समजावा आणि तो ‘जन्मोनिया झाला भूमि भार’ समजावा.
समाजात पवित्रवृत्तीने वागण्याच्या दृष्टीने सेनाजी म्हणतात, परस्त्री ही माते समान मानण्याचे व्रत सांभाळा, चोरी, चुगली करू नये. मनुष्य संसारात गुरफटून प्रयत्नांनी सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशांच्या पदरी शेवटी मोठे दुःख येते. कारण प्रापंचिक माणसाला प्रपंच आवडतो. त्यामध्ये त्याला सुख समाधान मिळते. पण ईश्वरी चिंतनापासून तो दुरावतो.
वेळ आता व्याधी छळी अंत होय। वाटेकरी न होय दूर राहो।” त्याला एकट्यालाच ते सारे दुःख भोगावे लागते. याची जाणीव माणसाला दुःख, पीडा, दारिद्र्य आल्यानंतर होते.
प्रपंच आणि परमार्थ संदर्भात सेनाजींनी अभंगातून काही स्पष्टपणे प्रबोधन केलेले आहे, त्यातील काही अभंगांचे चिंतन करता येईल.
“खोटे कर्म जरी करीता वाटे गोड। पुढे अवघड होईल ते॥
संसाराचा भोवरा आणील गोत्यात। मग गणगोत कामा नये॥
अबु धन जाय निपुत्रिक होती। किलवाणी पाहती जनाकडे॥
सेना म्हणे जेचि तोचि भोगील। इतर हसतील दुःखी होय॥”
प्रत्येकाच्या संसारात आलेल्या संकटाला स्वतःलाच तोंड द्यावे लागते. ते दुःख आपणासच भोगावे लागते. इतरांच्यासाठी आपण एक चेष्टेचा विषय होऊ नये, असे उद्बोधन प्रपंचाच्या संदर्भात सेनाजी करतात.
“परकी त्या स्त्रिया मानाव्यात माता। ज्ञानबोध चित्ता सांभाळावे॥
परस्त्री नादाने डुबले कित्येक। धुळीमिळे रंक झाले पहा।
होता रोग तया इंद्रिय भंगती। आपली पत्नी दुजा पाहे॥ सेना म्हणे जसे कराल तसे फळ। नरदेह अमोल नरकी गेला॥”
हा संपूर्ण अभंग मानवजातीला विकृतीपासून दूर करणारा, नादानपणापासून जागृत करणारा आहे. नीतीबोध देणारा हा मराठीतील ‘करावे तसे भरावे’ या उक्तीप्रमाणे विचार मांडला आहे. ‘जसे कराल तसे भराल ते माणसाला फळ भोगावे लागते. सेना महाराजांच्याही काळात आजच्या काळापेक्षा फार वेगळी परिस्थिती समाजात नव्हती. नैतिकमूल्य सांगून सर्वसामान्य समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. सर्वाचे डोळे उघडावेत, अशी सेनाज्जींची अपेक्षा असावी.
समाजमनात स्वार्थवृत्ती अशी आहे, माझी संपत्ती माझी, अन् दुसऱ्याचीही माझी, इतका उतावीळपणा, स्वार्थ, मदांधवृत्ती बोकाळलेली असते. या संदर्भात सेनाजी म्हणतात,
“लबाडी करून साठविले धन। मृत्यु येता जाण घेता नये॥ १ ॥
नागवेचि येणे नागवेचि जाई। सुखे उतराई झाले पहा ॥२॥
कोणी कोणाचे एक देवावीण। म्हणा नारायण सद्बुन्धि॥ ३॥
सेना म्हणे देवावीण नाही गती। आठवा श्रीपती कामा येई॥ ४ ॥”
समाजाची फसवणूक करून संपत्ती कितीही वाढविली, माणसाच्या रामबोलो समयी त्या धनाचा काही उपयोग होत नाही. प्रत्येक मनुष्य जन्माला आला की एकटाच जन्म घेतो, काहीही न आणता, आणि मरणाच्या दारी गेला तरी अंकिचन पणाने एकटाच जात असतो. येथे केवळ आपल्यासमवेत ईश्वर असतो. त्याचे मनापासून स्मरण करा, या विश्वात परमात्म्यावाचून आपणास गती नाही. त्याचे नामस्मरण करा, अंतिम समयी तोच तुम्हाला साहाय्य करील. सेनाजी समाजाप्रती बोध करताना म्हणतात,
“प्रपंच हा वरून चमकदार दिसतो. आतून मात्र एखाद्या भ्रमाच्या भोपळ्या- सारखा भ्रामक व कडू, मनुष्य त्यात वरवर चांगला दिसत असल्याने तो नेहमी गुंतत जातो. पत्नी मुले-मुली, बंधू-भगिनी, नाती-गोती ही सुख देणारी साधने असली तरी ती अंतकाळी व्याधिग्रस्त होतात, कोणी कामास येत नाहीत. आपल्या व्याधीसमयी वाटेकरी न होता दूरावलेली असतात. अशा समयी नारायण आठवतो. सुखाच्या समयी ईश्वरचिंतन नसते. प्रत्येक माणसाने आपला स्वधर्म पाळावा.
“नशिबामध्ये जे कर्म असेल ते आपण केले पाहिजे. त्यामध्ये प्रत्येकाचे हित आहे. आपली आई कुरूप असली तरी तिच मुलाचे खरे जीवन असते. एखाद्या सुंदर अप्सरेसारखी सुंदर स्त्री आहे, तिचा मुलाला काय उपयोग ? जसे माशाचे जीवन पाण्यातच सुखाचे होईल, तुपाच्या डोहात त्याला सोडले तर त्याचा जीव
जाईल, म्हणून प्रत्येकाने आपला धर्म कोणता, है ओळखले पाहिजे.” इतक्या सहन सोप्या शब्दांमध्ये आध्यात्मिक तत्त्वाचे उद्बोधन सेनाजी सहजपणे करतात.
सेनाजींनी संतसंगामध्ये कीर्तन महत्त्वाचे समजले आहे. कारण तत्त्व श्रवण करताना चित्ताची एकाग्रता होते; परंतु कीर्तनामध्ये गप्पा मारणारांचा, पान खाणारांचा सेनाजी धिक्कार करतात. अशा लोकांची जे संगती करतात. त्यांना सद्गती मिळत नाही, नरकात जागा मिळते. म्हणून ते म्हणतात, नामसंकीर्तन हे जिवाचे उद्धार करणारे फार मोठे साधन आहे. पौराणिक दाखल्याचा आधार घेऊन
पुढील अभंगात सेनाजी सांगतात, ऐका म्हणा रामनाम। वाल्ह्या उच्रला अघम।
विष दाह झाला तो शिवा। रामनामे शांत तेव्हा राम अक्षरे सेतुतरे।
बिभिक्षण तो राज्य करे।। सेना महणे रामभक्ता। द्रोणागिरी जो आणीत ॥
यासाठी सकाळच्या प्रहरी मुखाने रामनाम घ्यावे, रामाच्या कया ऐकून इदयी राम साठवावा, ईश्वरस्मरणाने जडजिवाचा सहस्त्र उद्धार होतो. सेनाजींनी अनेक विषयाच्या संदर्भात उपदेश करताना उदाहरणे दिली आहेत. प्रपंचात मानवाला वस्त करणारे काम क्रोधादी विकार, नात्यागोत्याची बंधने, संसारातील मोहपाश यात न गुतंता माणसाने परमार्थमार्ग स्वीकारावा. ईश्वराचे नामस्मरण, संत सहवास, भजन-कीर्तन हेच आत्मसुखाचे परमात्मसुखाचे साधन आहे. असा पारमार्थिक व प्रापंचिक उपदेश सेनामहाराज करतात.
संत हे आध्यात्मिक मार्गी असले तरी बैरागी नसतात. संसार करून अध्यात्म सोपे कसे करावे याचे, ते खरे मार्गदर्शक असतात. जसे कमळाच्या फुलाला पाण्यात राहून पाण्यापासून अलिस कसे राहता येईल, हे जसे त्याला सहज साध्य होते, हेच सुख दुःखापलीकडे परमार्थसाधना संतांना सहज साध्य होते. संसारात राहून ते वेगळे असतात.
संत स्वतःचा उद्धार करून मुक्त होत नाहीत. तर त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्व सांसारिकांना अध्यात्माची आवड निर्माण करायला लावतात म्हणूनच संत ज्ञानदेवांनी समस्त संत मांदियाळीला सांगितले असावे. “मागांधारे वतवि। विध है मोहरे लावावे। अलौकिका न व्हावे। लेका प्रती” साधूसंतांनी केवळ आत्म- 1. चिंतनात राहू नये या लौकिक जगात येऊन, कोणी तरी वेगळा आहे, असे भासू न देता, त्यांना मार्गदर्शन करावे, त्यांचे उद्बोधन करावे.
संत सेना हे विठ्ठलाचे निःसीम भक्त, संतांचे विचारदूत, ‘संतांनी सांगितलेला विचार मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. तुम्ही मला काही बोललात तरी चालेल; पण त्यांचा निरोप मी तुमच्यापर्यंत पोहचविणार आहे. संत सेनाजी सांगतात,
‘”संती सांगितले। तेचि तुम्हा निवेदिले॥ १ ॥
मी तो सांगतसे निके। येतील रागे येवो सुखे॥२॥
निरोप सांगता। कासया वागवावी चिंता।॥ ३ ॥
सेना आहे शरणागता। विठोबारायाचा दूत ॥ ४ ॥ ”
(संत सेना अ० क्र०४६)
भी साक्षात परमेश्वराचा दूत आहे, त्यांनी मला जे कथन केले तेच मी तुम्हाला स्पष्टपणे खरे सांगतो.
सेनामहाराजांनी एका अभंगातून प्रामाणिकपणे संसार करणारे, पण ईश्वराचे अष्टौप्रहर चिंतन करणाऱ्या एका आदर्श कुटुंबाचे सुंदर चित्र रेखाटले आहे. खरे म्हणजे एखाद्या परिवाराला सद्गुणी व पतिव्रता बायको लाभणे आणि उद्यमशील व परमार्थी पती असणे हे भाग्याचे लक्षण आहे. उभयतांचे संसारसुख उत्तरोत्तर वाढत जाणे हे क्वचित पाहावयास मिळते. सेनाजींनी अशा कुटुंबाचे पुढीलप्रमाणे चित्र रंगविले आहे.
“प्रपंचामाजी भार्या गुणवंत। असता पातीव्रत्य धन्य येथे ॥
पती हा उद्योगी परमार्थ आवडी। उभयता जोडी सुख वाढी॥”
सेनाजी म्हणतात, “अशा प्रकारचे संसार जे आनंदाने करतील, त्यांना पांडुरंग सतत जवळ करेल, त्यांचे जीवन सार्थकी लागेल; पण अनेक कुटुंबात एखादी अपवित्र भार्या प्रवेश करते आणि घरातील अवदसा होते, घरात अखंड कलह होत राहतात. प्रपंचामध्ये अनेक प्रकारचे स्त्री-पुरुष असतात, त्यांचा स्वभाव व विकृती, अहंकार, औदासिन्य, क्रोध, बढाईखोरपणा, निर्बुद्धपणा, स्त्रीलंपट पुरुष, वेश्यागमन करणारे पुरुष अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावांची माणसे प्रपंचात असतात. तो प्रपंच विस्कटून जातो, असे चित्र सेनाजींनी त्यांच्या अभंगातून ठायी ठायी चित्रित केले आहे. एकत्रित कुटुंबात ‘सासूवर सन गुरगुरे। मुले न ऐकती वडिलांचे। होतील दास बायकांचे’ हे दृश्य म्हणजे प्रपंचाचा खेळखंडोबाच समजा. कधी मी माझा संसार, माझी बायका पोरं, तर ‘स्थावर संपत्ती मिथ्या मारी’ ही वृत्ती तर संसाराला मिठ्या मारता मारता हाव करीत बसणे. ‘श्रृंगार पक्वन्न लोड गिर द्या। स्थावरजंगम धन माझे गाव। करी हाव हाव सुखा लागी’ हा अभिलाषेचा स्वार्थधर्म अनेकदा सोडत नाही. सुखासाठी हपापलेला माणूस सेनाजींनी उभा केला आहे. सेनाजींनी प्रपंचात अनेक ठिकाणी दुष्ट प्रवृत्तीचा अधम माणूस उभा कला आहे. ‘आईबापा छळी, कांतेचा अंकित वचन न मोडी, सासुसासऱ्याचा आदर,
मेव्हणा मेहुणी नमस्कार’, सेनाजी याला एका गाढवीमागे जसे गाढव धावू लागते. “लाथ मारे स्वभावे निर्लज्ज तो” पण त्या निर्लज्ज गाढवास समजत नाही. असे म्हणतात,
चैन मोज मज स्त्रीलंपट, भोगी माणसाबद्दल म्हणतात,
“जगी हलकट दारिद्र भोगील। दुःख पोशील अर्धपोटी॥
सोयरे धायरे बंधू तो धिक्कारी। बायको गुरगुरी तोंड टाकी॥”
किंवा
“घरची ती भार्या रंभेला लाजवी। दुजी ती गाढवी आनंद तो॥
सोयरे धोयरे विनविती पाया। पतिव्रतेची माया रडत असे॥”
प्रपंचात प्रवेश केलेल्या सुंदर पत्नीला डावलून कामांध पुरुष बाहेरच्या गाढवी स्त्रीच्या सहवासात आनंदित होतो. असा निर्लज्ज माणूस आयुष्यभर उकिरडा फुंकत राहतो. तेव्हा प्रत्येकाने ‘कनक आणि कांता न जाऊ आधी॥ हे वर्तन करू नये, नाहीतर स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखे आहे.
अंधश्रद्धेच्या संदर्भात सेनाजी म्हणतात, “आंधळे लोक दगडास शेंदूर फासून चेटूक, मेटूक, जंतर-मंतर देवऋषीपणा करतात. अघोरी साधने वापरून देव पावण्यासाठी प्रयत्न करतात. सेनाजी समाजाला अंधश्रद्धेबद्दल प्रश्न विचारतात की, “घुमती या जागी अंगी देवत खेळे। मरती कां मुले वाचवेना ॥”
अचानक संपत्ती गोळा करणे, विषयसुखाची चटक असणारी माणसे, वेश्या व्यवसाय करीत असलेली स्त्री यासारखी विकृत व्यसने अनेकांना चिकटलेली असतात. संशयाचे व्यसनाचे भूत ज्या माणसाच्या मानगुटीवर बसले तो माणूस, अफू, गांजा, दारूच्या आधीन जाऊन सर्वनाश करवून घेतो. या संदर्भात समाजाचे उद्बोधन व्हावे. समाजात नीतीमूल्याचा जो हास झाला आहे, अशासाठी प्रपंचातील लोकांना सेनाजींनी हर प्रकारे उपदेश केलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी अनेक अभंगरचना केल्या आहेत.
विषयवासनेने अनेक पुरुष स्त्रीलंपट होतात. स्त्रीच्या आधीन होऊन बायकोच्या नादाने आईवडिलांचा अतोनात छळ करणारा मुलगा, अशा मुर्ख पुरुषांचा सेनारजींनी धिक्कार केला आहे. कडाडून हल्ला चढविला आहे. अशा मूढ माणसाचे हुबेहुब चित्र रेखांकित केले आहे. घरची स्त्री टाकून दाराच्या स्त्रीच्या नादी लागून नादान पुरुषाचे वर्तन अभंगात मांडले आहे. बाजारबसवी बाहेरची स्त्री, तिच्याशी पुरुष चाळे करून स्वतःच्या शरीराचा नाश करवून घेतात. किंवा व्यभिचारी स्त्री आपल्या दोन्ही कुळांचा नाश करते. फुकटचे धन मिळविणाऱ्यां बद्दल सेनाजी म्हणतात,
“चोरी करुनिया बांधले वाडे। झाले ते उघडे नांदत नाही। होऊनिया मिळविले धन। असता अवगुण लया गेली॥ मदिरा जुगार करी परदार। दारिद्र बेजार दुःखमोगी। सेना म्हणे त्रासून फिरती ही जनी। मग चक्रपाणी भजू पाहे ॥” है धन दीर्घकाळ टिकत नाही, ते त्वरित आटते. व्यसनी माणूस हा विषय
सुखासाठी भटकतो. “कामतुर साडी सज्जन लक्षण। मंदिरा व्यसन बडबडी॥
गांजा भांग अफू सेवी दृष्टी क्रूर। शरीर मूर्दार कळत नाही॥
आला विनाशकाल विपरीत बुद्धि। जुगारीचे छंद जागविला ॥
सेना म्हणे धन घालविती दुःखी। परिहरि मुखी घेईचना॥”
किंवा
“साधी रंगली रंगल्या संगती। उतरली कांती सुख नाही॥
दोन्ही कुळांचा केलासे नाश। बांधियेला पाश नरका जाया॥
नाही केला विचार खेद वाढी मनी। जवळ न कुणी दुःख पावे ॥
सेना म्हणे करा श्रवण कीर्तन। शुद्ध अंतःकरण होईल.”
अशा स्त्रीच्या बाबतीत सेनाजी म्हणतात, सासर व माहेर या दोन्ही कुळांना काळिमा फासून आपण नरकाकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब त्या सामान्य स्त्रीला करावा लागतो. कोणताही पुरुष जेव्हा व्यसनाच्या आधीन होतो, त्याच्या संसाराला लवकरच अवकळा पोहोचते, वाईट मार्ग धरणाऱ्या कोणाचेही आयुष्य सुखी होत नाही. असा रोकडा उपदेश, उद्बोधन सेनाजी करतात.
“गांजा भांग अफू घेऊ नका सुरा। दारिद्र संसार आणात ते॥
रांडबाजी आणि खेळू नका जुगार। भांडण बाजार दुष्ट वाणी ॥
धनजाय अब्रुहीन होय बल। शरीराचे हाल दुःख भोगील॥
सेना म्हणे करा हरिनामे व्यसन। भगवंताचे गुण आचरावे॥”
सेनार्जींच्या मते ही सर्व व्यसने म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ होय. कोणत्याही विषयाची आसक्ती म्हणजेच व्यसनाधीनता हा माणसाचा मोठा शत्रू, वेगवेगळी व्यसने असणाऱ्या व्यसनी माणसावर सेनाजींनी परखड टीका केली आहे. विविध व्यसनांचा उल्लेख करून त्यांनी स्पष्ट फटकारले आहे की, अशा प्रकारच्या व्यसनात गुंतलेल्या माणसाच्या पदरी अंती दारिद्र्य येते, त्याला अनेक दुःखी गोष्टींना सामारे जावे लागते. अशा माणसाच्या आसपासही कोणी फिरकत । नाही. यासाठी सेनाजी म्हणतात, यासाठी माणसाला एकच व्यसन असावे, ते । म्हणजे हरिनामाचे.
संत सेनामहाराजांच्या अभंगात अनेक विषय आले आहेत. त्यांच्या या सर्वत्र अभंगांचे स्वरूप आणि त्यातील मराठीपण लक्षात घेतले तर सेनाजी हे हिंदी भाषिक असल्याचे पटत नाही. मराठी संतांच्या वचनांचे, रचनांचे बरेचसे साम्य असल्याचे आढळते. ‘प्रेम सुख कीर्तन। आनदे गाऊ हरीचे गुण। असा भक्तिमाव वारकरी पंथातली अनेक संतांच्या रचनातून प्रत्ययास येतो. तसाच तो सेनाजींच्या रचनातून प्रत्ययास येतो. संत सेनार्जींना नामस्मरणाप्रमाणे कीर्तनमहिमाही काही अभंगातून सांगितला आहे. श्रीविठ्ठल आणि श्रीकृष्ण यांच्यातील एकरूपता परमेश्वराचा वत्सलभाव, विठ्ठलाच्या दर्शनाने झालेली आत्मानंद स्थिती, आणि हृदयात उचंबळणार्या आनंदाच्या लहरी, सेनामहाराजांनी अत्यंत प्रत्ययकारीपणे शब्दांमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपूर, आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर यांचे पावित्र्य आणि येथे जमणारा संतमेळा यांची एक चित्रमालिकाच त्यांच्या काही अभंगांमधून पाहावयास मिळते.
संतांच्या अभंगातील व्यवहारपर (उपदेश) अभंग तत्कालीन समाजातील विविध वृत्तीप्रवृत्तीवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. विशेषतः समाजातील विविध वृत्तीची अवलक्षणी स्त्री-पुरुष त्यांची वर्णने बरेच काही सांगून जातात. या स्वरूपाच्या अभंगातून त्यांचे समाजनिरीक्षण, स्पष्ट मत, त्यातील सूक्ष्मता याचा प्रत्यय येतो. त्याला विषयासाठी नेमके, अचूक, अल्पाक्षरी शब्द वापरल्याने अभंग अतिशय परिणामकारक वाटतात. मोलाचे असे आध्यात्मिक व व्यवहारिक उपदेश केले आहेत.
तत्कालीन समाजजीवनातील अंधश्रद्धांचा फोलपणाही सेनाजींनी अभंगातून स्पष्ट केला आहे. अंगात येण्यावर विश्वास न ठेवता हरिभजनावर श्रद्धा ठेवा. ‘चोरी करुनि बांधले वाडे, झाले उघडे नांदत नाही’ संत सेनाजींच्या यासारख्या रचना समाजजीवनाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत.
व्यवसायविषयी अभंग
संत सेनाजी जन्माला कोठे आले याबद्दल मतभिन्नता जरी असली तरी सेनाजी नाभिक समाजाचे आहेत, याबद्दल मात्र एकमत आहे. महाराष्ट्र व उत्तर भारतातील सर्वांनी सेनामहाराज न्हावी होते. याचा निर्वाळा दिला आहे. समाजात पूर्वी नाभिक हा बारा बलुतेदार, अलुतेदारांपैकी एक. आपण एका हीन जाताते जन्माला आलो याचे दुःख चौदाव्या शतकातही बहुजन समाजातील सर्व सताना होते. तसा बलुतेदार-अलुतेदार समाजासाठी समाजोपयोगी कामे करीत, तरीही परंपरेने त्यांच्यावर खालच्या जातीचा शिक्का लावलेला असे.
संत सेनाजी यांच्या चरित्रामध्ये महिपतीबुवा ताहराबादकर या संदर्भात
उल्लेख करतात. वापितवृत्ती नित जाण। त्याहून विशेष मुलाणपण ॥
जन्म देतसे नारायण। दोष पदरी यास्तव॥”
(भक्तविजय अध्याय ३४ वा)
तरीही समाजात काल आणि आज, प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान वाटतो. सेनाजींनी आपल्या जातीबद्दल, व्यवसायाविषयी काही अभंग लिहिले आहेत. आपण ज्या जातीत जन्माला आलो, तो व्यवसाय ईश्वरार्पण बुद्धीने समाजासाठी आपण केला पाहिजे, असे स्पष्ट म्हणले आहे.
आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक।’ या अभंगात त्यांनी आपल्या व्यवसायातील प्रतीके वापरून आध्यात्मिक तत्व स्पष्ट केले आहे. व्यवसायातील आयना, चिमटा, यासारख्या वस्तूंचा नाभिक व्यवसायासाठी केवळ उपयोग करीत नाहीत तर, वैराग्य चिमटा हलवू, विवेक दर्पण आयना दावू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्याच्या बगला झाडू, कामक्रोध नखे काढू, आपल्या जवळ विवेकाचा आरसा आहे. वैराग्याचा चिमटा आहे. शांतीचे उदक आहे. याच्या साहाय्याने आपण लोकांना विवेकाची, वैराग्याची, शांतीची शिकवण देऊ, अहंकाराची शेंडी पिळून त्यांना योग्य मार्गाला लावू. भावार्थाच्या बगला झाडू, कामक्रोधाची नखे काढू, या प्रकारे समाजातील चारही वर्णाला आध्यात्मिक पायऱ्या चढण्यास आपण हात देऊ, त्यांना मदत करू. नाभिकाचा धंदा करताना काय करू शकतो, हे त्यांनी सांगितले आहे. ही सेवा करताना मी निरामय अशा आनंदात एकरूप राहीन.
सेनार्जींचे व्यवसायाबद्दल, ज्ञातिबांधवांबद्दल एक मत आहे की, जे न्हाव्याच्या कुळात जन्माला आले, त्यांनी आपला कुळधर्म पाळावा. जे खरोखर पाळणार नाहीत. ‘येर अवघे बटकीचे’ असे ते स्पष्ट म्हणतात. नाभिक बनून धंदा करावा, पण तो ‘धंदा दोन प्रहर नेमस्त’ व ‘सत्य पाळा, रे स्वधर्मासी’ अशी ते आज्ञा करतात.
ईश्वराने मला न्हावी जातीमध्ये जन्म दिला आहे, त्या कुळाचा आचार धर्म, पाळावा, दुपार नंतर हरीचे नामस्मरण करावे. यानंतर ‘मागुती न जाण। शिवू नये घोकटी।’ ऐसे जे काम न मानती। ते जातील नरकाप्रती।”
ज्ञातिबांधवांना असा स्पष्ट इशारा सेनाजींनी दिला आहे. हा एक शास्त्राने मान्य केलेला कुळाचार आहे, त्यावर विश्वास ठेवावा. सेनाजी व्यवसाय धर्माबद्दल विठ्ठलासी संवाद करतात की, हे ईश्वरा, मला तू ज्या जातीत कुळात जन्माला घातले आहे, ‘केलीसे जतन। धोकटी आरसाचि जाण। करितो व्यवसाय। माझ्या
जातीचा स्वभाव।’ हे सर्व जतन करून धमानुसार माझ्या जातीचा धंदा करणार आहे. सेनाजींनी आपल्या अवघ्या ज्ञातिबांधवांना व्यवसाय करताना विठ्ठलाची सतत भक्ती करावी; असे जणू निर्देश दिले आहेत.
सेनार्जींच्या आयुष्यामध्ये घडलेला एक मोठा चमत्कार ते एका अभंगामध्ये। सांगतात. न्हावी म्हणला, की व्यवसायाची साधने त्याच्याजवळ धोकटीत सेवेसाठी सज्ज असतात. त्यामध्ये आरसा, कातरी, वाटी, तेल, हजामतीचा वस्तरा, चिमटा, साबण यांसारख्या अनेक वस्तू असतात. वीरसिंह राजाकडे जाण्यास उशीर झाला. भक्तांवर आलेले संकट विठ्लास समजले, सेनारूपी विठ्ठल (व्यवसाय) हजामत करण्यासाठी गेला.
“करिता नित्यनेम। राये बोलाविले जाण॥
पांडुरंगे कृपा केली। राया उपरती झाली॥
मुख पाहता दर्पणी। आत दिसे चक्रपाणी॥
कैसी झाली नवलपरी। वाटमाजी दिसे हरी ॥
रखुमादेवीवर। सेना म्हण मी पामर॥”
(सेना अ० क्र०९४)
सेनाजींच्या धोकटीतील वाटीत राजाला प्रत्यक्ष ईश्वर पाहावयास मिळणे, ही घटना सेनाजींच्या व्यवसायातील अतिशय महत्त्वाची आहे. राजाच्या मस्तकास विठ्ठलाने हात लावणे, राजाची चित्तवृत्ती हरपून जाणे, व्यवसायातील सेवा प्रत्यक्ष परब्रह्म करीत आहे. नाभिकाची सर्व भूमिका ईश्वराने राजाच्या दरबारी कराव्यात ही गोष्ट नाभिक व्यवसायाच्या दृष्टीने पर्यायाने विठ्ठलभक्त सेनाज्जींसाठी हा प्रसंग असामान्य आहे. ‘सेना म्हणे हृषीकेसी। मजकारणे शिणलासी।’ सेनाजींची प्रतिक्रिया या प्रसंगातून जनाबाई म्हणतात, ‘केवळ ईश्वराला मनोभावे शरण जाणे इतकी आहे.
“सेना न्हावी भक्त भला। तेणे देव भुलाविला ।”
तीर्थमाहात्म्य वर्णनपर अभंग
संत सेनामहाराज १४व्या शतकांच्या सुरुवातीस महाराष्ट्रात विठ्ठल भेटीसाठी बांधवगडवरून पंढरपूरास आले. तत्पूर्वी ज्ञानदेवादी भावंडांचे अलौकिकत्व सेनाजींना ज्ञात होते. स्वामी रामानंदांचे शिष्य म्हणून सेनाजी मध्यप्रदेशात माहीत होते. ज्ञानदेवादी भावंडे गुरुबंधूची मुले. त्यामुळे या मुलांना भेटण्याची सेनाजीना अनिवार इच्छा होती. पण पंढरपूरात आल्यानंतर त्यांना समजले या सर्व मुलांनी संजीवन समाधी घेतली. संत सेनाजी ज्या ज्या ठिकाणी समाधिस्थाने आहेत तेथे
मेटीसाठी गेले. श्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड यांसारख्या तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. तीर्थक्षेत्राचे महत्त्व त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केले. सेनाजीनी तीर्थस्थानांवर आधारित त्र्यंबक माहात्म्य ५ अभंग, आळंदी अभंग आणि सासवड माहात्म्य ५ अभंग असे एकूण २२ अभंग
माहात्म्य १२ लिहिले आहेत.
श्री निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली. या संदर्भात सेनाजी म्हणतात, “पुण्यभूमी गंगातीरी। धरी अवतार त्रिपुरारी॥
नाम त्रिंबक निर्धारी। मागे ब्रह्मगिरीशोभत ॥ १ ॥
तो हा निवृत्तीनाथ निर्धारी। स्मरता तरती नरनारी ॥
सेना म्हणे श्रीशंकरी। ऐसे निर्धारी सांगितले॥ ४ ॥”
(सेना अ० क्र० ११२)
हे ठिकाण कैलासपर्वतापेक्षा पवित्र आहे. कारण येथे सर्व स्त्री-पुरुष निवृत्तीनाथांच्या स्मरणाने आपला उद्धार करून घेतात. सेनाजी सांगतात निवृत्तीनाथांचे स्मरण करतात, मनातले सारे संभ्रम दूर झाले. इतकेच नव्हे तर “शुतलो होतो मोह आशा। स्मरता पावली नाशा” असे आदराने त्याचे महत्व सांगतात.
हा अनन्यसाधारण अनुभव निवृत्तीनाथांबद्दल सेनार्जीना आला.
आळंदी तीर्थक्षेत्रातील ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीबद्दल सेनाजी अत्यंत आदराने बोलतात. हे केवळ समाधिस्थळ नाही तर तेथे प्रत्यक्ष सिद्धेश्वर वास्तव्यात आहे. ‘धन्य अलंकापुरी धन्य सिद्धेश्वर। धन्य ते तरुवर पशुपक्षी।’ अशी अलौकिक महती सेनाजींनी सांगितली. या पुण्यभूमीत शंकर वास्तव्य करीत आहे. सिद्ध- साधकाची भूमी असून तीन भावंडांनी त्रिमूर्तीचे (ब्रह्मा, विष्णू, महेश) अवतार धारण केले आहेत. मुक्ताई ही तर प्रत्यक्ष आदिमाया- भावंडांच्या स्मरणाने सर्व पापाचे क्षालन होते. संत नामदेवांनी तर या भूमीचे वर्णन शब्दांमध्ये करणे अशक्य आहे. असे म्हणले म्हणून सेनाजी म्हणतात, म्हणून मी या तीर्थक्षेत्रापुढे लोटांगण घालीत आहे. या संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या चरणी वंदन करीत आहे.
पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रे अलंकापुरीतील इंद्रायणीस येऊन मिळतात. अशा या पवित्र इंद्रायणी नदीमध्ये जे स्नान करतील त्यांना निश्चित वैकुंठप्राप्ती होईल. प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग म्हणत आहे की, जो या आळंदीत ज्ञानदेवांची नित्यनियमाने पूजा करील ‘तो माझा प्राणविसावा’ बनेल. असे बोलून पांडुरंगाने ज्ञानदेवास वर दिला. हे पाहून संत नामदेवांना अत्यानंद झाला आणि मी त्यांच्या चरणी नतमस्तक झालो असे सेनामहाराज म्हणतात.
सासवड येथे सोपानदेवांची जेथे समाधी होती. तेथे पूर्वी ही स्मशानभूमी होती या समाधिस्थानाचे वर्णन करताना संत सेनाजी म्हणतात, “या समाधीच्या समोर भागिरथी नदी वाहत असून तिच्यापुढे कैलासनाथाची मूर्ती आहे. या ठिकाणी ज्याचा वास राहील, ‘चुके जन्म मरण चौऱ्यांशी। फेरा चुकेल चारी मुक्ती’ आपण होऊन चरणी लागतात. अशा या सोपानदेवांचे स्मरण करताच सर्व महादोष नाहीसे होतात.” असे महत्त्व सांगून संत सेनाजी सांगतात,
“वाचे सोपान म्हणता। चुके जन्ममरण चिंता।
वस्ती केली काहे तीरी। पुढे शोभे त्रिपुरारी।
सोपानदेव सोपानदेव। नाही भय काळाचे।
सोपान चरणी ठेऊनि माया। सेना होय विनविता।”
सासवड माहात्म्य सांगताना सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घेतल्यास काळाचे भय वाटणार नाही. हे मोठेपण सेनाजी स्पष्ट करतात.
संत सोपान हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे. केवळ मुखाने सोपानदेवांचे नाव घेताच सर्व श्रमांचा परिहार होतो. समाधीपासून जवळच कहा (भागिरथी) नदी वाहते. या नदीमध्ये १०८ तीर्थांचा समावेश झालेला आहे. अशा पवित्र तीर्थी कित्येक जण स्नानासाठी येतात. या स्नानाला येणाऱ्या सर्व वैष्णवजनांचा मी दास आहे, अशी नम्रतेची भूमिका सेनाजी घेतात. त्यांनी समकालीन संतांच्यापेक्षा तीर्थस्थळांचे अतिशय नेमकेपणाने अचूक व विस्ताराने वर्णन केले आहे.
संत सेनाजींनी तीर्थ माहात्म्यांबरोबर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या पूर्णब्रह्मत्वास पावलेल्या योग्यांबद्दल ते अवतारी संत होते, अशी भक्तिभावना व्यक्त करतात. ‘सेना म्हणे पूर्णब्रह्म अवतरले।’ रेड्याच्या मुखातून वेद, चांगदेवाचा गर्व उतरवणे, स्वर्गातून पितर बोलावणे. यासारखे त्यांच्या चरित्रातील दाखले देत १३ व्या शतकातील कर्मठपणा, वेदप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य याने किती बैमान घातले होते. धर्मकर्त्यांच्या पुढे प्रचंड अनुनय करावा लागत होता. याची उदाहरणे सेनाजींनी ‘वैकुंठवासिनी’ ‘कृपावंत माउली’ अभंगांमधून स्पष्ट केले आहे.
पाखंडविषयी अभंगरचना
संत सेनामहाराजांनी समाजातील जे दांभिक पाखंडी लोक आहेत. ते सर्वसामान्य लोकांची फसवणूक करायचे, या विकृत लोकांवर त्यांनी चांगलेच कोरडे ओढले आहेत. सेनाजींच्या काळात अनेक पंथीय लोक समाजाला नाडायचे, ईश्वरप्राप्तीच्या किंवा परमार्थाच्या नावाने आपली व्यसनाची भूक भागवीत. गांजा, धूम्रपान यांसारखी व्यसने मठ-मंदिरात उघडपणे करीत असत. विविध पंथात
मतभेद होऊन भांडण करीत. देवाघमाच्या नावाखाली अनेक अंधश्रद्धा जपल्या जायच्या. मंत्र, तंत्र, भूतबाधा, अंगात येणे, चेटूक करणे हा सगळा आंधळेपणा आहे. डोंग आहे. या सर्व विकृतीला सेनार्जींचा कडाडून विरोध असे.
शेंद्रीहेंद्री देवांची पूजा बांधणे, दगड-गोट्यांना शेंदूर लावून त्यांच्या नावाने नवस करणे, हे सर्व चाललेले थोतांड थांबविले पाहिजे, हे सेनाजींनी ठरविले होते. या संपूर्ण जगाचा नियंत्रक सर्वांच्या पलीकडे असणारा नारायण आहे. ‘कोणी ना कोणाचे एका देवाविण। म्हणा नारायण सद्बुद्धिने॥’ प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे, तो सदबुद्धी देतो.
सेनाजी म्हणतात, “पैसे घेऊन धर्माचा उपदेश करणारे आज समाजात अनेक बुवा आहेत. बुवाबाजी करून समाजाला फसविणारे, धर्माचे थोतांड मांडून कुटुंब पोसणारे ढोंगी, धर्ममार्तंड खूप आहेत, शिष्याला गुरुमंत्र देऊन, उपदेश करणारे अनेक ढोंगी गुरू अफाट गुरुदक्षिणा उकळतात. एखादा मध्यस्थ तयार करून त्याच्या मदतीने हजारो भोळ्या-भाबड्या भाविकांना फसवून धर्माचे अवडंबर माजवतात.”
संत सेनाजी ढोंगी बुवा व महाराजांबद्दल म्हणतात, “देवळात रसाळ पुराण सांगणे! सोवळे नेसून भस्म कपाळी लावून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणे, श्रद्धाळू श्रोत्यांकडून दक्षिणा घेऊन मठात प्रपंच थाटणे, अशा ढोंगी बगळ्यापासून सावध राहिले पाहिजे. जो निरपेक्ष वृत्तीने समाजात जगतो, समाजाला उपदेश करतो, तो निश्चित भवतारक असतो.”
सेनाजी म्हणतात, गुरू कोणाला करावे तर जो,
न मागे कोणासी तोचि करा गुरू। उपदेश तारू होईल गा॥१॥
ऐसियाचे बोले जोडे नारायण। असता अज्ञान जाईल गा॥ २॥
घन मान तुच्छ वागतसे जगी। तोच हा त्यागी अच्युत॥ ३॥
सेना म्हणे ऐसियासी शरण जावे। शुद्ध मनोभावे करोनी गा॥ ४॥
सेनाजींनी भोंदू साधूबद्दल अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. धर्माचे योतांड माजवून त्या भांडवलावर आपल्या पोटाचे खळगे भरतात. अशा पाकला जे भजतात ते लोक व तो साधु दोघेही अधोगतीस जातात. सेनाजी म्हणतात,
“धर्माचे थोतांड करून भरी पोट। भार्या मुले मठ मजा करी॥१॥
पुराण सांगत नागावाणी डोले। अविर्भाव फोल करीतसे॥ २॥
गळा माळा भस्म नेसे पितांबर। साधूचा आचार दाखवितो॥ ३॥
सेना म्हणे ऐशा दांभिका भजती। दोघेही जाताती अधोगती ॥ ४॥
समाजात ढोंगी बुवा किती दांभिक प्रवृत्तीचे होते, याचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे. गळ्यात माळ, कपाळाला भस्म, पीतांबर नेसलेला, नागासारखा फुल्कार करून डोलणारा, त्याचे पाय धरणारे असंख्य भाविक आहेत; पण साधूचे वागणे कसे याकडे लक्ष न देता, त्यांच्या उपदेशाचे शब्दब्रह्म ऐकण्यात अज्ञानी माणसे एकरूप होतात.
समाजातील अतिशय वास्तव, दांभिकपणा, धर्माचे थोतांड, त्यांनी शब्दांचे केलेले भांडवल हे सर्व सहजपणे सेनाजी सांगतात. हा विचार आजही आत्म परीक्षण करायला लावणारा आहे.
आपले कर्म चांगले की वाईट यावर आपली भविष्यकालीन वाटचाल अवलंबून आहे. हा विचार प्रत्येकाला आत्मभान निर्माण करणारा वाटतो.
“करिता परोपकार। त्याच्या पुण्या नाही पार॥१ ॥
करिता परपीडा। त्याच्या पाया नाही जोडा। ॥२॥
आपले परावे समान। दुजा चरफडे देखून॥ ३॥
आवडे जगाजे काही। तैसे पाही करावे ॥ ४ ॥
उघडा घात आणि हित। सेना म्हणे आहे निश्चित॥५ ॥”
जे खरोखर परोपकार करतील ते अनंत पुण्य जोडतील. आणि जे इतरांना पीडा देतील ते पापी, त्यांना पायातही जोडा मिळणार नाही. त्यासाठी हा आपला आणि तो परका हा दुजाभाव करू नये. सर्वांना समान मानावे जगाला जे आवडते तेच करावे. एखाद्याचा घात करावा का हित करावे, हे आपणच ठरवावे.
यासारख्या अनेक रचनांमधून सेनाजी सतत दूरदृष्टी ठेवून स्वच्छपणे सन्मार्गाची शिकवण देतात. अंधश्रद्धेतुन होत असणाऱ्या कर्मकांडाविषयी स्पष्ट प्रबोधन करतात. भक्तीवाचून शेवटी कशाचीही चाड नाही, हे चिंतन सेनामहाराज वारंवार सांगतात. सत्संग, नामस्मरण, कीर्तन यांच्या साहाय्याने संसारी जिवाला आपला उद्धार करून घेता येतो. असे स्पष्ट मत सेनाजींचे होते.
संत सेनामहाराज यांचे अन्य भाषेतील अभंग
इसवी सन १४ व्या शतकात संत सेनामहाराजांनी मराठी भाषेत शेकडो अभग लिहिले. आज २५३ अभंग वेगवेगळ्या अभ्यासकांनी संपादित करून एकत्र करून उपलब्ध केले आहेत. अभंगाच्या रचनेवरून ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील कवी म्हणून ओळखले जातात. संत नामदेवांप्रमाणे महाराष्ट्रातून तीर्थयात्रेच्या निमित्ताने उत्तर भारतात त्यांनी अनेक वर्षे प्रवास केला आहे, कदाचित त्यामुळे हिंदी साहित्याच्या इतिहासात स्वामी रामानंद, रविदास, संत कबीर यांसारख्य
अनेक संतांच्या सोबत सेनार्जींचे नाव घेतले जाते. ते एक विठ्ठलभक्त संत म्हणून, परंतु त्यांची आज हिंदी वा अन्य भाषेतील रचना फारशी उपलब्ध नाही. जी उपलब्ध आहे, ती अतिशय अल्प स्वरूपात आहे. हिंदी भाषेत दोन पदे, राजस्थानी (मारवाडी) भाषेत एक पद उपलब्ध आहे.
सेनाजींनी हिंदी भाषेत पुढील रचना केली आहे. “राम नाम मैं नायी जन तेरा॥
चामकी छुरहरी चामको बाधी चामै लागो डारा।
चामै मुंडे चा मैं मुंडावे। समुई देखि मन मारा।
तब कंधा टूटो तेल बढोवो, हुइगो साँझ सबेरा ।
देता हो सो दे मेरे भाई, आई घरकी बेरा।
तब चिमटा नहरन, और कतरनी दरपन साहेब तेरा ।
सेना भगत मुजरे को आये, आदि वन्तके चेरा ॥”
संत सेनाजी म्हणतात, ‘रामनाम घेणारा मी तुमचा न्हावी आहे. कातड्याचा वस्तरा चामड्यात बांधून चामड्यावर चालविला आहे. कातडेच कातड्याकडून मुंडन करविते. हे रहस्य माझ्या मनाने ओळखले आहे. यानंतर मान (खांदा) मोडला, तेल चोळले. या सर्व कामातच संध्याकाळ झाली. बाबारे, जे द्यायचे असेल ते दे. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. तेव्हा चिमटा, नराणी, कातर व तुझा आरसा घेऊन सेना भक्त आदि-अंती तुझा दास मुजरा करावयास आला आहे.
या हिंदी पदाखेरीज राजस्थानी (मारवाडी) भाषेतील अतिशय सहजसुंदर पदरचना संत सेना महाराजांनी केली आहे, ती पुढील राजस्थानी पद (मारवाडी) “सेन जो ऐसीर खिजमत की जे, जिद मारो श्याम पतीजे।
रेणी राचोंडी करणीरी, केंची समज समज खडीजे॥ मन कटोरी खन्या जलभीतर सत को पलीयी डलीजे॥१॥ गुरू गम साबण सिमरण, कूची गोष्ट फरीजे॥ ज्ञानपाचीणो काबू पकडो, दुविधा का बाल कटीजे ॥ २॥ सीली सुरत शब्दी चमोटा विरती ने निरमल कीजे । निरणा नेरणी निजकर झेलो, करमा नखली रीजे ३॥ अलख पुरुष घर विरत हमारी, हरदम फेरी कीजे। गुरु प्रताप सेनजी गावे, पल पल चरण में लीजे ॥ ४ ॥”
संत सेना महाराज म्हणतात, “सेवा अशी करावी की, माझा श्याम (प्रम) गहिवरावा. हजामत (श्मथ) सुंदर करावी. कातर मधून मधून वापरावी. मनरूपी
वाटीमध्ये सत्यरूपी जलात गुरुज्ञानरूपी साबण मिसळून कुंचलीने सर्व बाजूने फिरवावा. ज्ञानाच्या कंगव्यात संशयरूपी केस पकडून कापावे. चेहऱ्यावरील खुंट शब्दरूप चिमट्यात धरून विरक्तीने निर्मळ करावे. निर्णयरूपी नराणी हाती घेऊन कर्मरूपी नखे नीट करावीत. अलख (अलक्ष्य) पुरुषाचे स्थान हे आमचे ध्येय, तेथे निरंतर फेरी करावी. सेनाजी गुरुकृपेने गातात. प्रत्येक क्षणाक्षणाला (पळाला) चरणी नम्र व्हावे.
वरील अभंगातून सेनाजी आपल्या व्यवसायातून समाजाला आध्यात्मिक संदेश देत आहेत. मन, ज्ञान, शब्द, निर्णय, कर्म या संकल्पना पारमार्थिक क्षेत्रात स्पष्ट करताना व्यवसायातील हत्याराचा प्रतिकात्मक स्वरूपात सेनाजींनी उपयोग केला आहे.
संत सेनामहाराजांनी एक पद पंजाबी भाषेत लिहिले आहे. संत नामदेव पंजाबमध्ये अनेक वर्षे मुक्कामास होते. पंजाबी भाषेत अनेक पदे लिहिली. त्यातील काही पदे पंजाब-शिखांच्या पवित्र ‘गुरु ग्रंथसाहेब’ या ग्रंथात समाविष्ट झाली आहेत. संत नामदेवांना अतिशय मोठे मानाचे स्थान मिळाले आहे. याच ग्रंथात संत सेनामहाराजांच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यामुळे सेनाजी पंजाबमध्ये चिरंतन झाले आहेत. ही महाराष्ट्रातील वारकरीसंप्रदायासाठी असाधारण घटना आहे.
संत सेनामहाराजांच्या पंजाबी भाषेमध्ये (गुरुमुखी) गुरुग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात पदाचा (रचना) समावेश केला आहे.
“धूप दीप घृत साज आरती, वारणे जाऊ कमलापती।
मंगलाहर मंगला नित्य मंगल राजा राम राव को॥
कूतम दियरा बिमल बाती, तू ही निरंजन कमलापती।
रामा भक्त रामानंद जाणे, पूरण परमानंद बरवाने।
मदन मूर्त मम तार गुविन्दे, संत म्हणे भज परमानदे॥”
“धूप दीप घृतपूर्ण आरती। कुरवंडी करू कमलापती।
मंगलकर मंगल नित्यमंगल। राजारामचंद्राचे।
कर्तव्याचा दिवा विशुद्ध वाती।
तूचं निरंजन कमलापती।
रामभक्त रामानंद ज्ञानी। पूर्ण परमानंद वाखाणी।
मदनमूर्ति माझा तारक गोविंदा। सेन म्हणे भज परमानंद ॥” संत सेनामहाराज म्हणतात, ‘धूप, दीप तुपाची आरती करून आम्ही आमचे प्राण है कमलापती। तुमच्यावरून ओवाळून टाकतो. मंगल करणारे, सदा पवित्र राजा रामचंद्रांचे चला पूजन करू या.
कर्तव्याच्या दिव्यात विशुद्धतेच्या वाती जाळून हे कमलापती तू प्रत्यक्ष निरंजन म्हणजेच डाग नसलेला तुला निरांजनाने ओवाळून रामभक्त असे रामानंद हे ज्ञानी पूर्ण परमानंद स्वरूप आहेत. मदनमूर्ती गोविंद हा मला तारणारा आहे; शेवटी सेनाजी म्हणतात त्या परमानंदांचे सदोदित भजन करा.
वारकरी संप्रदायाचा एक विठ्ठलभक्त असलेला बहुजनांचा सर्वमान्य संत सेनाजींनी मराठी भाषेतील कवितांइतक्याच प्रभावी कविता इतर भाषेत केल्या आहेत. हे सर्व मान्य असे भगवद्भक्त आहेत, यामध्ये, तिळमात्र शंका नाही.
गवळणी, विराण्या व भारूडविषयक रचना
अभंग या छंदाप्रमाणेच सेनामहाराजांनी गवळणी, विराणी, काला, भारूड,
आरती, पाळणा अशा स्वरूपाच्या काही रचना केल्या आहेत. या रचनांवरून
त्यांच्या पूर्वकालीन व समकालीन संतांच्या रचना कोणत्या प्रकारच्या होत्या, याची माहिती त्यांना होती. हे गवळणी वाचल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या गवळणी बहारदार झाल्या आहेत. सेनार्जींच्या गवळणरचनांमध्ये कृष्णाबद्दल वाटणारी रती म्हणजेच प्रेम सर्व गोपिकांना होते. प्रेममय भक्तीची उत्कटता दाखविण्यासाठी त्यांनी मानवी शृंगार- रसाचा वापर केला आहे. श्रीकृष्ण व गोपिका यांच्यामधील मधुराभक्ती, त्यातून
त्यांच्या प्रेमातील उत्कटतेचा परमोत्कर्ष गोपींच्या भक्तीमध्ये दृष्टीस पडतो. सेनाजींनी एकूण अकरा गवळणी रचना केल्या आहेत. संत निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंत वेगवेगळ्या संतांनी गवळणी लिहिल्या आहेत. त्या संतांच्या मानाने सेनाजींच्या रचना कमी असल्या तरी वाङ्मयीन सौंदर्याच्या दृष्टीने त्या उत्तमच आहेत. सेनार्जींच्या एका गवळण रचनेमध्ये एक प्रसंग वर्णन केला आहे. भागवतातील दशमस्कंधाच्या २९व्या अध्यायात कृष्णाचे गाणे ऐकून सर्व गोपिका आपल्या जवळील सर्व कामे टाकून, आहे त्या अवस्थेत कृष्णाला भेटायला घावल्या, असे वर्णन आहे.
यातील प्रसंग असा आहे की, शरद ऋतुमुळे, वृंदावनातील वृक्षवेली प्रफुल्लित झालेल्या पाहून कृष्णाने योगमायेने, कृष्णक्रीडा करण्याचे ठरविले. ही वेळ गोपींचे मन हरण करण्यास योग्य आहे. असे समजून कान्हाने चित्तवेधक असे गाणे म्हणण्यास सुरुवात केली. कृष्णाचे हे गाणे ऐकून गोकुळातील गोपींच्या चित्तवृत्ती कृष्णमय झाल्या. आपापली कामे सोडून गोपी वृंदावनातील कृष्णाकडे धावू लागल्या. श्रीहरीच्या मुखदर्शनाने भुलून गेल्या, त्यामुळे त्यातील काहींनी काजळ तोंडाला लावले. नेसलेले वस्त्र डोक्याला बांधले, अलंकार पायाला बांधले, दयाचे
मडके कडेवर घेऊन बाळास शिंक्यावर ठेवले. सर्व जणी आत्मसुखात दंग झाल्या होत्या. या प्रसंगावर आधारित सेनाजींची रचना-
“कृष्ण सुखा मीनल्या अवघ्या सुंदरी। लाज मोहमय शंका दवडिलया दुरी॥”
सेनाजींची ही संपूर्ण गवळण हास्यरसात अडकल्याने ती अतिशय अतिशयोक्तीपूर्ण असून मनोरंजक वाटते.
सेनाजींनी गवळणी विराण्या लिहिताना कृष्णाचे गोपिकांच्या सहवासातील प्रसंग विविध घटना याचे सहजसुंदर वर्णन केले आहे. कृष्णदर्शनासाठी आकर्षित झालेल्या, बावरलेल्या गवळणींची अवस्था, गोपीना कृष्णाचा जाणवणारा विरह, हा विरहणींमध्ये दिसतो. मथुरेच्या बाजारात निघालेल्या गोपिका, त्यांची वाट आढवणारा खट्याळ कृष्ण, गवळणींनी कृष्णाबद्दल यशोदेसमोर मांडलेले गाहाणे, कृष्णाचा आपल्या मित्रमंडळींबरोबर घालवलेला दिनक्रम, श्रीकृष्णाचे गोपिकांना दर्शन होताचक्षणी, त्यांची बेभान अवस्था, यमुनेच्या तीरावर आलेल्या गवळणींची केलेली थट्टा-मस्करी, श्रीकृष्ण सर्वात असून, सर्वात नाही, त्रिभुवनाला मोहून ठकाणारा परिपूर्ण श्रीकृष्ण, अशा अनेक घटना प्रसंगांवर आधारित गवळणींच्या रचना सेनाजींनी केल्या आहेत.
कृष्णाने राधिकेची छेडछाड केली, त्यावर आधारित एक गवळण – “कान्हा मनगट माझे सोड।
तू जगज्जीवना। तुला शोभेना, वाईट तुझी ही खोड ॥
मी गरिबाची, तू थोराचा, तुझी माझी नाही जोड।
सेना म्हणे अरे नंदलाला करिसी अब्रुमोड॥”
कृष्णाच्या भेटीसाठी उतावीळ झालेल्या गोपीजवळ आल्यावर कृष्ण त्याचे मनगट धरतो. ‘तू अजोड आहेस, जगाचा पालनकर्ता आहेस, मी गरीब घरातील हे एका गोपिकेचे मनोगत या रचनेमध्ये सेनाजींनी व्यक्त केले आहे.
सेनाजींच्या प्रत्येक गवळणीमध्ये वेगवेगळ्या चित्रमालिका तयार केल्या आहेत. गवळणांच्या मनाची अवस्था, त्यांचे वर्तन सेनामहाराजांनी अतिशय चित्रवेधकपणे वर्णिले आहे. गोपिका दही दूघ घेऊन मथुरेच्या बाजारास निघतात, त्यांची अडवलेली वाट, गोकुळातील कृष्णाच्या खोड्या, श्रीकृष्णाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेली राधा, गायी चारणारा कृष्ण, सोबती असणारा गोपाळगड्यांचा मेळा, एखाद्या चलतधिवासारखे अत्यंत मनोवेधक वर्णन त्यांनी केले आहे.
गोपाळाचा कालाही असाच अपूर्व आहे. सेनार्जीचा वासुदेवही असाच आगळावेगळा असून, अध्यात्मविचार सांगणारा आहे. लोकांना, समाजाला तो
प्रपंच निद्रेतून जागा होण्याचा उपदेश करतो. गवळण, भारूड याबरोबरच सेनाजींच्या अन्य रचना अंगाई गीत, आरती, काला, पाळणा हे सर्व त्यांच्या कल्पकतेची कवित्वाची साक्ष देतात.
संत सेनामहाराजांच्या अभंगातील वाङ्मयीन सौंदर्य
इसवी सन १३व्या १४ व्या शतकातील ज्ञानदेव-नामदेव यांच्या समकालीन संतांच्या कवितेला अपूर्व असे वैभव प्राप्त झाले होते. त्यांची काव्यनिर्मिती म्हणजे अमृताबरोबर पैजा जिंकू शकेल’ इतके समृद्ध शब्दांचे मराठी भाषेला मोठे देणे होय. मूळात त्या काळातील संतांचे विषय वेगळेच. बहुजन समाजात जन्म झाल्याने संस्कृत भाषेचे ज्ञान अगम्य. केवळ भक्तीची उत्कटता लोककल्याणाची तळमळ, उपदेशातून समाजप्रबोधन, यासारख्या वेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असे मराठीत काव्य पहिल्यांदा जन्माला येत होते.
बहुतेक संत फारसे विद्याव्यासंगी नव्हते. त्यामुळे त्यांचे मक्तिकाव्य हे प्रयत्न पूर्वक, हेतुपुरस्सर करीत नव्हते. तर त्यांच्या भक्तीच्या उमाळ्यातून ईश्वरभावनेचा सहज आविष्कार होत असे. कोणताही ‘संत’ मी कवी आहे, असा कोठेही त्यांच्या अभंगरचनेत उल्लेख नाही. केवळ विठ्ठलाप्रती व्यक्त झालेला भक्तीचा आविष्कार पाहावयास मिळतो. त्यामुळे संत नामदेव समकालीन किंवा उत्तरकालीन संतांच्या कवितेत कोठेही शब्दांचे सौंदर्य हेतुपुरस्सर अलंकार आविष्कारापेक्षा भक्तिभावनेचे सौंदर्य अधिक तेजःपूंज खुललेले दिसते.
संत सेनाजींच्या चरित्रात चरित्रकारांनी सेनाजी बालवयात शाळेत जात होते, असा उल्लेख केला आहे. वाचन लेखनापेक्षा ते बालवयापासून बहुश्रुत होते. तत्कालीन समाजात न्हावी समाजातील मुलाला संस्कृत शिक्षण तर मिळालेले नसेलच; परंतु त्यांच्या अनेक अभंगरचनांमधून पुराणकथांचा, वेदांचा, दैवतकथांचा लोककथांचा नामनिर्देश झालेला दिसतो. अर्थात सेनाजी वडिलांच्या सोबत संस्कारक्षम वयात मठ-मंदिरात हरीचिंतन, कीर्तन, प्रवचन ऐकण्यास जात होते. त्याचा हा परिणाम असावा, असे वाटते. लहानवयात, संत-महंतांच्या समागमात, संगतीत एकरूप होत असावेत. ज्येष्ठ अभ्यासक विचारवंतांच्या सोबत चर्चा, संवाद होत असावेत. वेदकाळातील उपनिषदांविषयी, पुराणकथांचे पुष्कळसे श्रवण, मनन, चिंतन झालेले असावे. त्यामुळे सेनाजर्जींची कविता अनेक पुराणकथांच्या
प्रसंग, घटना व्यक्तिनामाने भरलेली, मारलेली दिसते. विठ्ठलभक्तीमध्ये ‘नाम’ किती समर्थशील, प्रभावी, परिणामकारक आहे. याविषयीची उदाहरणे देताना सेनाजींनी वेदांपेक्षा ‘नाम” किती मोठे आहे. ‘वाल्या
कोळी ब्रह्महत्यारी। नामे तारिला निर्धारी।’, या अभंगातून नामाचे महत्त्व काय करू शकते याचे उदाहरण दिले आहे. सेनाजींनी एखाद्या गोष्टीचे विशेष महत्त्व विशद करण्यासाठी जे पौराणिक दाखले दिले आहेत, हे दाखले सेनाजी बहुश्रुत असल्याचे गमक आहे. रामायण
लिहिणारे वाल्मीकी ऋषी त्यांचे पूर्वायुष्यातील नाव ‘वाल्याकोळी’ पापी माणूस हा
त्याच्यावरील शिक्का, नामस्मरणाने त्याचा ऋषी झाला. हे नामस्मरणाचे महत्त्व ते सांगतात.
“रामे अहिल्या उद्धरिली। रामे गणिका तारिली।
म्हणा राम श्रीराम। भवसिंधु तारक नाम।॥
रामे जटायु तारिले। रामे वानरा उद्धरिले ॥
ऐसा अयोध्येचा राजा। सेना म्हणे बाप माझा ॥”
(सेनामहाराज अ० क्र० २४)
विचार सामान्य आहे; पण तो मनावर बिंबविण्यासाठी पुराण कथांचा आधार कसा घ्यावा, याचे उत्तम उदाहरण सेनार्जींनी वरील अभंगातून दिले आहे. पतीच्या शापाने गौतमी पत्नी अहल्या पाषाण होऊन पडलेली, केवळ प्रभुरामाच्या पदस्पशनि तिचा उद्धार झाला. गायिका वेश्येने पोपट पाळून त्याचे नाव ‘राम ठेवले. मरणसमयी ‘राम’ ‘राम’ अशी पोपटास हाक मारू लागली. रामाने तिला दर्शन देऊन तिचा उद्धार केला. ही पुराण कथा आहे. रावणाकडून जटायूस मारले गेले. रामाने त्याला तारून मोक्ष दिला. रामाला मदत करणाऱ्या सर्व वानरजातीचा उद्धार केला. केवळ रामाच्या उच्चाराने भवसागर तरून जाता येते, असा अयोध्येचा राजा माझा सर्वस्व आहे.
सेनामहाराज हे कीर्तन, प्रवचन ज्येष्ठ साधूसंतांशी चर्चा, यामधून त्यांना मिळालेले ज्ञान, माहिती, ही केवळ बहुश्रुतेमुळे मिळाली. सगुण, निर्गुण, सहा शास्त्रे, गीता, उपनिषदे, वेद हे शब्द ते अभंगरचनेत अनेकदा वापरतात. तसेच पुराणकथातील अभिमन्यु, शृंगीकषी अजामेळ, भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, विभांडक, गजेंद्रमोक्ष कथा, सत्यभामेने सांगितलेल्या श्रीकृष्णाच्या दान कथा, भगवान शंकराने प्राशन केलेले विष, रावण वधानंतर लंकाधिपती झालेला बिभीषण, पूतना राक्षसी, यांसारख्या व्यक्ती, प्रसंग, घटनांचा वापर नाममाहात्म्य या सदरात सेनाजी अभंगातून सतत करताना दिसतात.
हे संदर्भ, उदाहरणे देताना वाचकांना मूळ कथेचा सहज बोध होतो. नामसाधना हा शिवपार्वतीचा अत्यंत आवडीचा असा गड्यमंत्र – या मंत्रापुढे इतर मंत्रांचा कधीही टिकाव लागत नाही. जसे –
“नाम साधनाचे सार। भवसिंधु उतरी पार।॥
तिन्ही लोकी श्रेष्ठ। नाम वरिष्ठ सेवी हे॥
शिव भवानीचा। गुप्त मंत्र आवडीचा॥
सेना म्हणे इरांचा। पाड कैसा मग तेथे॥”
किंवा
(सेनामहाराज अ० क्र० १०३)
“करिता योगयोग। सिद्धी न पवेचि सांग॥
देव एक भावाविण। नाही नाही व्यर्थ शीण॥
केल्या तपाचिया राशी। तरि न मिळेचि त्यासी॥
करिता धुम्रपान। न भेटे नारायण॥
सेना म्हणे नको काही एका विण तुजे नाही॥”
(सेनामहाराज अ० क्र० ५१) ईश्वरप्राप्ती, जप, तप, यज्ञयाग यासारख्या साधनाने कधी होत नाही. ईश्वर आराधना केल्याने होते. तपाचे मोठे डोंगर उभे करून होमहवन करून नारायण भेटत नाही, केवळ ईश्वर प्राप्तीसाठी भक्तीची साधना महत्त्वाची.
सेनाजींच्या अभंगात, सोपेपणा, सहजता उदाहरणाने विषय प्रवेश आणि प्रासादिकता हे कवितेच्या मांडणीचे महत्त्वाचे गुण पाहावयास मिळतात. अनेकदा संस्कृत भाषा, मांडणी अभिव्यक्तीचा प्रभाव नसल्याने त्यांच्या अभंगांची भाषा अतिशय अकृत्रिम व पारदर्शी वाटते. शिवाय मांडणीत सहजसुंदरता सतत जाणवते. अगदी साधे उदाहरण –
“मुखी नाम नाही। त्याची संगती नको पाही॥”
किंवा
“करिता धुम्रपान। न भेटे नारायण॥” किंवा
“गुण गाईन अभंगी। घैर्यबल देई अंगी॥”
यासारख्या कोठेही संस्कृतपासून तयार झालेले शब्द, मांडणीत पाहावयास मिळत नाही.
“भान हरपले देहाचे। सेना पदोपदी नाचे॥”
मन रंगले हर्षले। विठ्ठलरूपी तन्मय झाले॥”
“देव दीनांचा दयाळ। शरणागत पाळी लळा॥”
यासारख्या असंख्य सहजसुंदर अभंगरचना असल्याने त्या सतत वाचाव्या वाटतात, मनातील सहज भक्तिभाव व्यक्त केल्याने अभंगरचना आनंद देतात.
संत सेनाजींच्या काव्याचे समालोचन करताना, श्रीधर गुळवणे व रामचंद्र शिंदे म्हणतात, “सेनाजींच्या साहित्यधारेत जाणवणारे त्यांचे एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे विषयाची निवड, विविधता त्यांची कौशल्यपूर्ण हाताळणी आणि भिन्न भिन्न विषयांमधून प्रगट होणारी त्यांची समाजप्रबोधनाची तळमळ,… त्यांची शब्दयोजना व कल्पनांची योजकता, अचूक, समर्पक चपखल व ज्ञानदेव-तुकारामांच्या तोडीस- तोड़ असल्याचे ठिकठिकाणी आपणास आढळून येते. हे शब्दसौंदर्य, शब्दचातर्यं अभ्यासपूर्वक व परिश्रमपूर्वक त्यांनी साध्य केले होते. हे निर्विवाद, मायमराठीत स्वतः पूर्णत्वाने एकजीव करून आपले परप्रांतीयत्व त्यांनी साफ पुसून टाकल्याचा दाखला त्यांच्या उचित शब्दप्रयोगातून मिळतो.”(संत सेनामहाराज : अभंगगाथा पूर्वानुसंधान पृ० क्र० १६)
संत सेनांच्या कवितेवर नामदेवादी संतांच्या काव्याचा प्रभाव आहे. त्यांच्या काव्यातील उपमा, रूपके, दृष्टांत इत्यादी अलंकारसौंदर्य जाणवते. परंतु हे सारे त्यांनी जाणीवपूर्वक लिहिलेले नाही. त्यामुळे सुंदर व अकृत्रिम वाटते. सेनाजींच्या अंतःकरणात साठलेली निव्याज भक्ती, त्यांच्या स्वच्छ पारदर्शी अशा निर्मळमनातून सहजसुंदर शब्द बाहेर पडतात. ते अक्षरशः अलंकाराचे रूप घेऊनच. स्वच्छ अंतःकरण असलेल्या कवीच्या मनाची अभिव्यक्ती सुंदर असते.
सेनाजी बालपणापासून मठमंदिरातून कीर्तन प्रवचनातून ईश्वर चिंतनातून संत संगतीत रमलेले होते. तीर्थक्षेत्र पंढरीची निष्ठेने वारी करणारे होते. श्रीनिवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, श्रीनामदेव या संतांविषयी हृदयात अत्यंतिक पूज्यभाव बाळगणारे होते. त्यामुळे सेनाजींच्या अभंगांमध्ये त्यांच्या स्वच्छ मनाचे व निर्मळ वाणीचे रसपूर्ण अकृत्रिमभाव प्रतिबिंबीत झालेले दिसतात. संत सेनार्जीना अलंकारशास्त्र माहीत नाही; पण त्यांच्या कवितेतून ठिकठिकाणी अलंकारयुक्त शब्द पेरलेले दिसतात.
साक्षात विठ्ठलरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात,
“विटेवरी उभा। जैसा लावण्याचा गाभा।”
“नाम साराचेही सार। शरणागत यमकिंकर॥” “नाम हे अमृत भक्तांसी दिधले।”
यांसारख्या चरणांमधून विठ्ठलाच्या नामाचे सामर्थ्य नाम वापर करून अलंकृत केले आहे. अमृत शब्दांचा
संतांनी स्वतःला कवी म्हणवून घेतले आणि काव्य केले, असे कोणत्याही संताच्या बाबतीत दिसत नाही, त्यांनी स्वतःला प्रतिभावंत कवी म्हणून कविता लिहिलेली नाही. तर कवीच्या मनातील अकृत्रिम शुद्ध भाव असल्याने त्यांची
साधी रचना काव्यमय झालेली दिसते. त्यांच्या रचनेतून सहज अलंकार तयार होतात. सेनाजींच्या अनेक अभंगांमधून अनुप्रास, यमक यासारखे शब्दालंकार पाहावयास मिळतात.
“नामे तारिले अपार। महापापी दूराचार।
घेता नाम विठोबाचे। पर्वत जळती पापाचे॥
जैसे मातेपाशी बाळ। सांगे जीवाचे सकळ || ”
वरील चरणामध्ये ‘र’ ‘र’, ‘प’ ‘प’, ‘पा’ ‘पा’ एकाच वर्गाची पुनरुक्ती होऊन अनुप्रास अलंकार किंवा ‘बाळ’ ‘सकळ’ अंत्य यमक जसा योजलेला आहे.
“हंबरोनी येती। वत्सा धेनु पान्हा देती। तु
म्ही करावा सांभाळ। माझा अवघा सकळ।”
‘ती’, ‘ळ’ हे वरील अभंगातील चरणाच्या शेवटी आलेल्या सारख्या वर्णातून यमक अलंकार झालेला दिसतो.
संत सेनामहाराजांनी स्वधर्माबद्दल स्वाभिमान व्यक्त केला आहे ते म्हणतात, “स्वधर्म सांडून परधर्म जाय। त्याचे गुण गाय वर्णी सदा॥ कुरुपती आई मुलासी जीवन। दुजी रंभा जाय व्यर्थ आहे। पाण्यातुनी माझा तुपी डोही गेला। प्राणासी मुकला कुःख पावे। 1. सेना म्हणे नका भुलू मोहशब्दा। असेल प्रारब्ध तैसे होय।” (सेना अ००१७८०
स्वतःचा धर्म तो स्वतःचा, जशी स्वतःची आई ही कुरूप असली तरी, तीच मुलाचे जीवन असते. पाण्यामधला मासा, पाणी हेच त्याचे जीवन, तूप हे किती चांगले असले तरी, त्यात मासा पडला तर त्याचा मृत्यू निश्चित, स्वधमाचे । स्पष्टीकरण करताना सेनाजींनी रूपक अलंकार वापरला आहे. आई -रभा (सुंदर स्वी) पाणी तूप यांची तुलना केली आहे. निवृत्ती हा शिव, ज्ञानदेव विष्णु, मुकताई आदिमाया, सोपान ब्रह्मा ही रूपे सेनाजींनी स्पष्ट केली आहेत.
ईश्वराचे रूप पाहिल्यावर तहान-भूक हरपून जाते. याबद्दल सेनाजानी सुपर अशा रूपकातून स्पष्ट केले आहे.
“हंबरोनि बेती। वत्सा धेन पान्हा देती।
तुम्ही करावा सांभाळ। माझा अवघा सकळ॥
विसरली भूक तहान। तुमच्या देखिल्या चरण ।।
सेना म्हणे प्रेम भातुके। धावे आता है कौतुके।।”
किंवा
“तुम्ही करा कृपादान। येइन धावून पाया पे ॥
घेईन संताचे भेटी। सांगेन सुखचिये गोष्टी॥
जैसे माते पाशी बाळ। सांगे जीवीचे सकळ ॥
सेना म्हणे हरे ताप। मायबाप देखुनि।” (सेनामहाराज अ० क्र० ८०)
हे विठ्ठला मी सतत तुमच्या चरणाशी धाव घेईन. कृपा करून माझी साधु संतांशी गाठ-भेट घालून द्या. मी त्याची भेट घेईन. जसे लहानगे आपल्या मातेपाशी मनातले सारे सांगून टाकते. त्यांच्याशी सुखाच्या गोष्टी करीन. संत हेच खरे माझे मायबाप. त्यांच्या दर्शनाने सारे दुःख हलके होईल.
सेनाजींनी संतांना माउलीची उपमा देऊन तिचे हृदय हे रूपक मानून ‘सांगे जिवीचे सकळ’ ही भक्तिभावना व्यक्त केली आहे. ईश्वर प्रत्येक प्राण्याचे पालन पोषण करीत असतो, हे सोदाहरण सेनाजी स्पष्ट करताना म्हणतात.
त्रैलोक्य पाळता। नाही उबग तुमच्या चित्ता॥
तया आमुची चिंता। नसे काय रुक्मिणी कांता
॥ दुर्दर राहे पाषाणात। तया चारा कोण देत॥
पक्षी अजगर। तया पाळी सर्वेश्वर॥
सेना म्हणे पाळुनि भार। राहिलो निर्धार उगाची॥” (सेनामहाराज अ० क्र० १०४)
ईश्वराचे सामर्थ्य किती मोठे आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही ठिकाणी
प्राण्यांचे पालन करतो; पण मनाला चित्ताला कधी कंटाळा नाही. याचे उदाहरण देताना सेनाजी खडकाच्या गाभ्यात राहणारा बेडुक, पशुपक्षी, जमिनीत राहणारा अजगर, यांना अन्न कोण पुरवितो. या प्राण्यांची काळजी कोण घेतो ? त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मी सुद्धा त्यामुळे निश्चित आहे असे म्हणतात. संत सेनामहाराजांच्या एकूण अभंगात त्यांचा व्यवसायावर आधारलेला एक सुंदर अभंग महत्त्वाचा मानला जातो. नाभिक व्यवसायाच्या अनुषंगाने या अभंगात
त्यांना आध्यात्मिक विकासाचे एक सुंदर रूपक रचलेले आहे. ते म्हणतात, “आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक॥ १ ॥ विवेक दर्पण आयना दावू। वैराग्य चिमटा हालवू॥२॥ उदकशांती डोई घोळू। अहंकाराची शेंडी पिळून।॥ ३ ॥ भावार्याच्या बगला झाडू। काम क्रोध नखे काढू ॥४ ॥ चौवर्णी देवुनि हात। सेना राहिला निर्वांत ॥ ५ ॥ ”
(सेना अ० क्र० १०६)
वरील अभंगात आम्ही वारीक, हजामत बारीक, विवेक दर्पण, वैराग्यचिमटा, उदकशांती डोई घोळू। अहकाराची शेडी, भावार्थयांच्या बगला झाडू, कामक्रोध नखे, ही सर्व पारमार्थिक रूपके सेनाजींनी आपल्या अभंगांतून वापरली आहेत. आम्ही जातीने न्हावी, हजामत बारकाईने करू म्हणजे तुमच्या आत्म्याची मशागत निगा काळजीपूर्वक करू. विवेकरूपी आरसा दाखवून तुम्हास जागृत करू, वैराग्यरूपी चिमटा हालवून वैराग्यवृत्तीचा संचार घडवू, तुमचे डोके व्यवस्थित घोळवू म्हणजेच विचारशक्तीला चालना देऊ. तुमच्या कमकुवत मनावर भावभक्तीच्या मंत्राचे पाणी त्याचे शिंपण करू. अहंकाररूपी ताठर शैंडी पिळून अहंकारभाव निपटून टाकू. समाजातल्या सर्वांची सर्वभावे सेवा करून निरामयतेचा आनंद उपभोग
याप्रमाणे सेनाजींनी वरील अभंगातून एक सहजसुंदर रूपक तयार करून व्यावसायिक अभंगांमधून आध्यात्मिक विकासाचा जणू आलेखच मांडला आहे. संत सेनाजींनी सर्वसामान्य समाजाचे प्रबोधन करण्यासाठी नीतिबोध देण्यासाठी रूपकातून अभंग रचले आहेत जसे.
“हलकटासंगे तो हलकट बनला। कोळसे नासिला शुभ्रवर्णे॥
किंवा
“बोलू जाता संगे ब्रह्मज्ञान गोष्टी। अंतरी कपटी बक जैसा”
किंवा
“कोळशासी अग्री वर्ण झाला शुभ्र। अज्ञानाचा अभ्र निवळी गा॥”
किंवा
सेनाजींनी बायकांचा दास (गुलाम) बनलेल्या बाईलवेड्या पुरुषाचे वागणे कसे असते याचे वास्तव वर्णन केले आहे.
“कामाचा लोभी बाईल सेवेसी । म्हणे आज्ञा मशी करा तुम्ही॥ घर झाडझुड उटीतसे भांडी। लागे चरणा तोंडी दिन झाला॥ श्वानासारिखा लोंडा घोळी पुढे। बोले लाडेलाडे कीलवाणी॥ सेना म्हणे अशांचे तोंड पाहू नये। वीरश्री जाये जळोनिया ॥”
अशी कितीतरी उदाहरणे ज्यामध्ये अलंकारांचा सहज वापर केलेला सापडतो. सेनाजींच्या अनेक अभंगांमधून रसांचा वापर केलेला दिसतो. त्यांच्या गवळणी या कविता प्रकारात शृंगारिक भावनेला जास्त महत्त्व दिसते. त्यांच्या अनेक अभंगां मधून विठ्ठल भक्तीमध्ये आर्तता जाणवते, कारुण्य जाणवते, तेथे करूण रसाचा विशेष दिसतो. भक्तावर ईश्वराचे प्रेम तेथे वत्सलभाव, वात्सल्य प्रकर्षाने दिसते. कधी कधी संयत भावनेने केलेली अभिव्यक्ती तो हा शांतरस, राग व्यक्त करताना रौद्र रसाची परिसीमा गाठलेली दिसते. लौकिक जीवनात संसार मोहपाशात पूर्ण अडकून घेतात. तर काही ईश्वरी सात्निघ्यात आल्याने संसारप्रपंचाचा तिटकारा
वाटतो, नकोसा होतो, अशा समयी बीभत्स रस केव्हा येऊन टपकतो, हे समजत नाही.
असे अनेक रस सेनानींनी कविता करताना अकृत्रिमपणे वापरलेले आहेत, त्यांची गवळण रचना करताना गोपिका, राधिका, यशोदा संवाद – “कृष्ण आला ऐकुनि गोपिका सुरी। विव्हळ झाल्या पहाक्या हरी ॥
किंवा
भोग भोगितो शहाणा गे, आगी लागो दर्शना गे॥
हा दिसतो भोळा गे। येऊनि घालीतो डोळा गे ॥ ”
किंवा
“याचा लागला मज चटका। सासू सासरे येती रागास॥
कान्हा, मनगट माझे सोड (राधा-कृष्ण संवाद) तू जगज्जीवना।
तुला शोभेना। वाईट तुझी ही खोड। मी गरीबाची। तू थोरांचा। तुझी माजी नाही जोड।”
मथुरेस निघालेल्या गवळणीच्या वाटेत कृष्णाने केलेली अडवणूक, त्याचे वागणे, कृष्णाचे गोपीना आकर्षण, कृष्णाने भरलेला हात, दोघांमधील अंतर. असे प्रसंग, अशा अनेक गवळणी संत सेनाजीनी शृंगारपूर्ण रसामध्ये रचना केल्या आहेत. संत नामदेव सहवासातील समकालीन संतांमध्ये बहुजन समाजातील सेना नहावी असे एकमेव संत आहेत की, ज्यांनी अतिशय सुरेख मनोहारी व लावण्यपूर्ण गवळणींच्या मनविभोर रचना केल्या आहेत.
‘संत सेना यांच्या काव्याचे दर्शन’ या लेखात रामचंद्र माधवराव शिंदे सेनाजीच्या काव्याचे मोठेपण व उंची सांगताना स्पष्ट करतात, “त्यांची शब्द योजना व कल्पनांची योजकता अचूक, समर्पक व चपखल व ज्ञानदेव तुकारामांच्या तोडीस तोड असल्याचे ठिकठिकाणी आढळून येते. हे शब्दसौंदर्य व शब्दचातुर्य अभ्यासपूर्वक व परिश्रमपूर्वक त्यांनी साध्य केले होते. हे निर्विवाद, मायमराठीशी स्वतः पूर्णत्वाने एकजीव होऊन परप्रांतीयत्व त्यांनी साफ पुसून टाकल्यांचा दाखला त्यांच्या उचित शब्दप्रयोगातून मिळतो. याची काही उदाहरणे पाहा. लेकुराची आळी, देहुडे ठाण सुकुमार आणि सोनियाचा दिवस, ही माझा मिराशी, शिणसी भरोवरी, विनंती सकळिकां, सांडोनि कीर्तन, हाचि माझा शकून व्यर्थ कासयासि, करी जतन ब्रीदावली, ऐसे वैष्णव डिंगर, जुनाट जुगादीचे, भावे । रिचा विठ्ठला शरण, भावनांचा लाहो, लौकिकाची चाड, सरता केला, चढधीचा उद्धार, दुजियाचा शाप, गोपिका वेल्हाळ कर्मचांडाळ, धर्माचं थोतांड इत्यादी अशा
प्रकारचे मार्मिक शब्दप्रयोग मराठी भाषेशी अल्पपरिचित असणाऱ्या परप्रांतीयाला अध्ययनाशिवाय सुचणे केवळ अशक्य आहे.” (भालचंद्र खंड ५६, अ० क्र० १ १९९४)
अमराठी मानल्या गेलेल्या संत सेनामहाराज यांनी मराठी कविता त्यांच्या मराठीपणाचा पुरावा देत, साक्ष देते, असे त्यांच्या विविधस्वरूपी काव्याच्या आधारे म्हणता येते. सेनामहाराज यांची कविता अस्सल मराठी भाषेत आहे. मराठी लोक जीवनातील दैनंदिन व्यवहारातील वापरलेले शब्द त्यांच्या कवितेत स्वाभाविकपणे आलेले आहेत. त्यांच्या कवितेची भाषा साधी, सोपी व सुबोध आहे. प्रासादिकता हा त्यांच्या काव्याचा एक लाक्षणिक गुण आहे. त्यांची संपूर्ण कविता अंतरीच्या जिव्हाळ्याचा, भक्तिभावाचा व अज्ञानी लोकांविषयीच्या वाटणाऱ्या तळमळीचा प्रत्यय देते.
जीवन चरित्र, जन्मस्थळ
संत सेनामहाराज हे वारकरी संप्रदायातील संत मेळ्यातील एक संत असून, त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले
जाते. श्रीसंत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत. जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेनाज्जींचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. (संत जनाबाई) शिखांचा धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात संत सेनाजींच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.
संत सेनारजींच्या जन्मस्थळाबाबत, जन्मकाळाबाबत, अनेक अभ्यासक, संशोधकांमध्ये एकमत नाही. आजही त्याबद्दल अनिश्चितता आहे. शिवाय ते महाराष्ट्रीय की अमहाराष्ट्रीय या बाबतीतही अनेक मतभेद आहेत. पूर्वीपासून वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमवेत त्यांचे नाव घेतले जाते. मराठी धाटणीची, वळणाची, संस्कारांची मराठी कविता (रचना) आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच उत्तर भारतातील प्रांतात विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजराथ, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे, परंतु मराठीच्या मानाने त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय स्वामी रामानंदांचे शिष्यत्व त्यांना लाभल्याने त्यांच्या जन्मठिकाणाबाबत एकमत व्यक्त करणे अवघड वाटते.
महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील अनेक संशोधक अभ्यासकांच्या मते संत सेनामहाराज हे महाराष्ट्रीय संत होते, याचा ते आवर्जून उल्लेख करतात. त्या संदर्भात काही मते पुढीलप्रमाणे आहेत.

या राजाच्या पदरी देविदास नावाचा एक न्हावी होता. तो राजाच्या सेवेत राहून केस-दाढी करणे, अंगमर्दन करणे यांसारखी कामे राजसेवा म्हणून करीत होता. तो ईश्वराची भक्ती करीत असे. तो स्वभावाने धार्मिक व सात्त्विक होता. राजांचे नित्यकर्म करताना, उरकताना राजांसमवेत धार्मिक विषयांवर त्यांची सखोल चर्चा होत असे. त्यामुळे राजाच्या मनात देविदासाविषयी अतिशय अभिमान होता. देविदास व त्याची पत्नी घरी आलेल्या प्रत्येक साधुसंतांचे आदरातिथ्य करीत असत.
स्वामी रामानंद हे देविदासाचे गुरू होते. स्वामींच्या आशीर्वादाने या दापत्याच्या पोटी इसवी सन १२७८ (इसवी सन १३०१) मध्ये सेनाज्जींचा जन्म झाला.

सेनाजींनी योगी चांगदेवांचा उल्लेख केवळ मुक्ताबाईंच्या संदर्भात केलेला विसतो. स्वतंत्र असा संदर्भ चांगदेवांचा दिसत नाही. संत नामदेवांबद्दल त्यांनी एकच पद लिहिले आहे; परंतु नामदेवांच्या समकालीन संतांमध्ये गोरा कुंभार, जनाबाई, चोखामेळा यांचा कोठेही अभंगात उल्लेख दिसत नाही. तसेच उत्तर भारतीय संतांचा सुद्धा त्यांच्या मराठी अभंगरचनेत नामनिर्देश केलेला आढळत
नाही.

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
संदर्भ: नामदेवरायांची प्रभावळ
लेखक: डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते