संत मुकुंद महाराज
श्री संत मुकुंद महाराज (१८-१९) चा कालखंड आटके गांवामध्ये श्री संत मुकुंद महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या आटके गावात त्यांचे वास्तव होते. वारकरी सांप्रदायिक गाव म्हणून प्रसिध्द आहे. आपल्या गांवची भक्ती परंपरा अनेक थोर संत वारकऱ्यांनी चांगली जोपासली आहे. श्री संत मुकुंद महाराजांच्या भक्तीसामर्थ्यामुळे आटके गावच्या परंपरेस व वारकरी सांप्रदायास अलौकिक मोठेपण लाभले आहे.
आटके गांव श्री संत मुकुंद महाराजांना आपले दैवत मानते. गेल्या ५/७ पिढ्यापूर्वी श्री मुकुंद महाराजांच्या पदस्पर्शाने आणि कायमच्या वास्तव्याने आटके गांव पुनीत झाले. ते बोलत नसत म्हणून त्यांना ‘मुके बाबा’ असे संबोधले गेले. मात्र त्यांच्या मुखावाटे अखंड विठ्ठलाचे नामस्मरण, भजन अस्पष्टपणे चालू असे. त्यांचे वास्तव्य कृष्णाघाटावर महादेवाच्या परिसरात असे आजच्या समाधी मंदीराच्या ठिकाणी त्यावेळी एक वटलेला लिंब होता. त्याखाली बसून ते दगडाच्या टाळानी भजन करीत असत. श्री मुकुंदबाबांच्या भक्तीसामर्थ्याच्या सानिध्याने त्या वटलेल्या लिंबास पालवी फुटली होती असे जुन्या पिढीतील लोक सांगतात.
श्री संत मुकुंद महाराजांची भक्ती व पंढरपूरामध्ये घडलेला चमत्कार-
श्री संत मुकुंद महाराज विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. पंढरीचे वारकरी होते. ते दर शुद्ध व वध् एकादशीला पायी पंढरपूरीची वारी करत. पंढरपूरात श्री विठ्ठलाच्या राऊळात गरुडखांबाजवळ विणा घेऊन नामस्मरण भजन करीत बसलेले असत, देहभान विसरुन विठ्ठलभक्तीत रमलेले असल्याने त्यांना काळ, वेळ, तहान, भूक, झोप याचे भान नसे. एके दिवशी मंदीर बंद होण्याची वेळी सेवेकऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने बाहेर काढले व मंदीर कुलूपबंद केले. दुसऱ्या दिवशी पहाटे सेवेकऱ्यांनी पाहिले की दरवाजाचे कुलूप बंद आहे पण श्री संत मुकुंद महाराज राऊळात गरुडखांबाजवळ भजन करीत आहेत. सेवक-यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना त्यांची चूक उमगली त्यांनी श्री मुकुंदबाबांना दंडवत
घातला आणि श्री विठ्ठलाची क्षमायाचना केली व आम्ही तुमच्या आवडीच्या भक्ताशी असे चुकीचे वागणार नाही. असे वचन दिले. त्यांचाच महिमा म्हणून आटकेकर वारकरी पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात महिन्याच्या प्रत्येक शुध्दी व वधू एकादशीस हरीनामाचा जागर (विणा) करु शकतो.
श्री संत मुकुंद महाराजांचा पंढरपूरातील राऊळातील अधिकार ( श्री संत मुकुंद महाराज व श्री संत भाऊसाहेब महाराज यांची भेट )
श्री संत मुकुंद महाराजांची भक्ती व निष्ठा तो अधिकार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पाचवे वंशज श्री भाऊसाहेब महाराज त्यांनी हा अधिकार पाहिल्यावर त्यांनी देहुतील काही सेवा पंढरपुरामध्ये होत्या काही देहुमध्ये होत्या त्यातील पंढरपुरामधील गुरुडखांबापाशी असणारा विणाचा जागर ही सेवा त्यांनी श्री संत मुकुंद महाराजांना दिली. ही नोंद पंढरपूरामध्ये केली गेली. व हा जागराचा अधिकार श्री संत मुकुंद महाराजांच्या भक्तीसामर्थ्याने मिळाला. आपण हा कृपाशिर्वाद मानून निष्ठेने विठ्ठलभक्तीत रममान व्हावे.
गुरुवर्य, संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे वंशज, वैकुंठवासी आपल्या या वीणा परंपरेला देहूकर फडाचे तत्कालीन श्री संत भाऊसाहेब महाराज देहूकर यांचा वरदहस्त होता. आजही देहूकर फडाचे प्रमुख वंशज गुरुवर्य ह.भ.प.बाळासाहेब महाराज देहूकर (भाऊ) यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन असते. आपण आटकेंकर जगदगुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या भक्तीपरंपरेशी जोडलेले आहोत. हे आपले भाग्य होय!
( अजानवृक्षाची बाग )
श्री संत मुकुंद महाराजांच्या पवित्र वास्तव्यामुळे आपल्या आटके गांवामध्ये आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीजवळ असणारा अजानवृक्ष आळंदीनंतर श्री मुकुंद महाराजांच्या समाधी जवळच बहरला आहे. हीच श्री संत मुकुंद महाराजांच्या दिव्यत्वाची व जागृत समाधीची साक्ष होय.
श्री मुकुंद महाराजांची महती कळाल्यानंतर ह.भ.प. म्हैसूरकर महाराज आटके गावात आले.
१) ह.भ.प म्हैसूरकर महाराज हे एका थोर राजाचे पुत्र होते
२) (ISA) अधिकारी होते. त्यांनी जर्मनी मधून शिक्षण घेतले होते. त्यांना अष्टसिध्दी प्राप्त होत्या, आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त होते.
३) ते गायनामध्ये पारंगत होते. संपूर्ण गायनाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते व ते विठ्ठलाचे भक्त होते.
४) त्यांना श्री संत मुकुंद महाराजांची ख्याती, महती कळण्यानंतर ते आटके गावात बरेच दिवस येत असत.
५) त्याच वेळेस श्री मुकुंद महाराजांच्या कृपेमुळे त्यांनी ग्रामस्थांना भरपूर चमत्कार दाखवले होते व तसेच भजनाची परंपरा सुरु केली.
महत्त्वपूर्ण काही प्रसंग, घटना
६) ‘ श्री संत मुकुंद महाराजांच्या दर्शनास ‘
गानकोकिळा लता मंगेशकर व गानहिरा हिराबाई बडोदेकर या जगप्रसिध्द गायिका म्हैसूरकर महाराजांनकडे एका रागाचे शिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या. व श्री मुकुंद महाराजांच्या समाधीच्या आवारातच त्यांची गायनाची बैठक होत होती.
( काही घटना लिखित नाहीत परंतु आजही गावातील जुने वारकरी मंडळी या घटना सांगतात. व तसेच लता दीदींनी या प्रसंगाचे वर्णन त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते.)
श्री संत दत्तुबुवा महाराजांचे श्री संत मुकुंद महाराजांवरील प्रेम, भक्ती –
१) श्री दत्तुबुवा महाराज हे बालवयाचे असताना श्री मुकुंद महाराजांनी त्यांना स्वप्नातमध्ये येऊन दृष्टांत दिला.
२) ते श्री संत मुकुंद महाराजांचा शोध घेत-घेत आटके या गावास आले. त्यांनी श्री संत मुकुंद महाराजांची एक निष्ठेने सेवा केली.
३) जसे श्री संत मुकुंद महाराज पंढरपूरला दोन्ही एकादशीला पायी जात होते. तिच परंपरा श्री दत्तुबुवा महाराजांनी सुरू ठेवली होती.
४) श्री मुकुंद महाराजांच्या सेवेच्या बळावर भक्तांना बरेच चमत्कार दाखवले होते.
५) श्री दत्तुबुवा महाराजांनी आपले जीवन आपला देह श्री मुकुंद महाराजांच्या चरणी अर्पण केला होता.
६) श्री दत्तुबुवा महाराजांची समाधी श्री संत मुकुंद महाराजांच्या शेजारी आहे.
आषाढी पायी दिंडी सोहळा प्रस्थान
( श्री मुकुंद महाराजांनी १८ शे च्या कालखंडात १५ दिवसांची वारी करत होते. व त्यानंतर श्री दत्तुबुवा महाराजांनी वारी परंपरा पुढे चालु ठेवली, काही काळानंतर गावातील सेवेक-यांनी सुरु ठेवली व तसेच पायी न जाता विविध सुविधांच्या मार्फत जाऊन दोन्ही एकादशीला पंढरपूरच्या राऊळामध्ये हरीजागर अजूनही केला जातो.)
आषाढी वारीची सुरुवात दि. ०२-०७-२००८ रोजी चालू करण्यात आली. श्री क्षेत्र आटके ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी वारी सर्व सेवेकरी व वारकरी संताच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आली. वारकरी सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्व सेवा अजुनही केल्या जातात.
• सर्वसामान्य जीवांवर श्री संत मुकुंद महाराजांच किती प्रेम आहे याची एक दिव्य अनुभुती – ही माहिती संपूर्ण वाचा ( सद्गरू कृपा )
भगवान श्री दत्तात्रय महाराज श्री संत मुकुंद महाराजांच्या समाधीत प्रकट झाले.
१) गुरुपरंपरेचा विचार करता, गुरुपरंपरेची सखोल माहिती जरी नसली तरी इ.स.वी सन २०१६ मध्ये काही अदभूत चमत्कार बघण्यास मिळाले.
२) याच कलियुगामध्ये संताच्या ठिकाणी भगवताचा वास्तव्य आहे. यागोष्टी प्रमाण बध्द आहेत.
३) याची प्रत्यक्ष अनुभुती इ.स.वी सन २०१६ मध्ये एकादशीच्या दिवशी भजन चालु असताना (भगवान श्री दत्तात्रय महाराज) प्रगट झाले.
• त्याच्या दुसऱ्या क्षणाला (श्री नृसिंह सरस्वती महाराज) प्रगट झाले व दर्शन दिले या पृथ्वीतलावरील अदभूतपूर्ण, चैतन्यस्वरुप, सच्चिदानंदमय अनुभुती श्री मुकुंद महाराजांच्या समाधीमध्ये आली.
४) भगवान श्री दत्तात्रयांचे प्रकटीकरण साधारण रात्री १० च्या सुमारास झाले होते.
भगवान परमात्म्याचे श्री संत मुकुंद महाराजांवरील असणारे प्रेम
१) कोरोनाच्या महामारीमध्ये इ.स.वी सन २०१९ मध्ये सगळीकडे आहाकार झाला होता. त्यावेळी सर्व मंदिरे बंद होती.
२) त्यावेळी आषाढी वारीचे प्रस्थान झाले. त्याचवेळी सभागृहात दरवाजे बंद असताना अखंडपणे वीण्याचा जागर व श्री मुकुंद महाराजांच्या नामाचा जागर चालू असताना.
३) जिथे श्री मुकुंद महाराजांची पालखी ठेवली होती त्या पालखीला प्रत्यक्ष भगवान श्री पांडुरंगाचे बालरुप प्रगट झाले. व पालखीला हात लावला व स्मित हास्य केले व लुप्त झाले.
श्री संत मुकुंद महाराजांचे सामर्थ्य
श्री क्षेत्र हरिहार (ऋषिकेश) मध्ये घडलेला एक अद्भूत प्रसंग – आटके गावाचे सुपुत्र श्री. शंकरराव पाटील (AIRFORCE) मध्ये देशसेवेत असताना ते त्यांच्या टीम सोबत श्री क्षेत्र ऋषीकेश येथे गीताआश्रम मठामध्ये एका साधुंच्या दर्शनास गेले असता ते साधु शंकररावांना म्हणाले तुम्ही इथे येण्याची गरज नाही, ‘ तुम्ही तुमच्या गावातील संतांच्या समाधीची सेवा करा तुमच्या गावात खुप मोठ्या संताची समाधी आहे. त्यांचे रोज दर्शन घ्या असा उपदेश दिला.’
(ही घटना इ.स.वी सन १९६४ साली घडली होती.)
श्री मुकुंद महाराज व औदुंबराचा महिमा – पूर्वी ज्या ठिकाणी श्री मुकुंद महाराजांच्या चरण पादुका ठेवल्या होत्या त्या स्थळी दिव्य असे औदुंबराचे वृक्ष प्रकट झाले होते.
➤ श्री संत मुकुंद महाराजांचा संजीवन समाधी सोहळा
श्री संत मुकुंद महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा तिथी गोकुळजन्माअष्टमीला असतो व त्या दिवशी पंचकृषीतील सर्व वारकरी भक्तगण व सेवेकरी एकत्र येऊन फार मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करतात.
• श्री संत मुकुंद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार
( श्री संत मुकुंद महाराजांचे ४ ते ५ कोटींचे भव्य, दिव्य असे कोरीव दगडांचे बांधकाम सर्व ग्रामस्थ, वैष्णवगण, सेवेकरी व पंचकृषीतील वारकरी संत यांच्या आशिर्वादाने व योगदानाने सुरु आहे.)
श्री संत मुकुंद बाबांच्या समाधीजवळ करुणा भाकणाऱ्या भक्तांना त्यांच्या इच्छा फलद्रुप झाल्याची अनुभूती अनेकांना आली आहे. अशी दिव्यशक्ती आणि भक्ती वैराग्याचे बळ धारण केलेले श्री संत मुकुंद महाराज संजीवन समाधीच्या रुपाने आपल्यात आहेत.
आपण सामान्यजन पामर आहोत त्यांची सत्यनिष्ठेने भक्ती करुन जीवनाचे सार्थक करुया..
शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या