संत लाडाई जीवनचरित्र

॥ संत लाडाई ॥

संत नामदेवांना चार मुले होती. नारा, महादा, गोंदा, विठा यांच्या आज काही अभंगरचना उपलब्ध आहे. त्यांच्या सुना लाडाई, साखराई, गोडाई, येसाई या होत. यामध्ये थोरल्या नाराची पत्नी संत लाडाई होय. संत लाडाईंचे जन्मस्थळ, काळ •सापडत नाही; पण त्या १४ व्या शतकातील आहेत, हे निश्चित. संत तुकाराममहाराज यांनी त्यांच्या नावावर दीडकोटी अभंग नोंदवले आहेत. कालप्रवाहात ते अभंग नाहीसे झाले असावेत. आज त्यांचे फक्त तीन अभंग उपलब्ध आहेत.

संत नामदेवांच्या समाधीनंतर त्या हयात होत्या. संत नामदेवांच्या समाधी प्रसंगी त्या त्यांच्या माहेरी कल्याण येथे प्रसूतीच्या निमित्ताने गेलेल्या होत्या, तेव्हा त्या पंढरपूर मुक्कामी नव्हत्या. कल्याण हे गाव जिल्हा परभणी येथे आहे. संत लाडाईला संत नामदेवांच्या समाधीचे वृत्त समजले. त्या अतिशय दुःखी कष्टी झाल्या. त्या प्रसंगाचा आत्मगत उल्लेख एका अभंगात त्यांनी केलेला आहे. संत नामदेवांच्या समवेत कुटुंबातील सर्व जण निर्वाणपदी पोहोचले कैलासवासी झाले, अशी समजूत आहे. त्यांच्या अभंगावरून ही घटना सत्य वाटते. त्या म्हणतात-

“प्रसुती लागी मज आणिले कल्याणा अंतरला राणा पंढरीचा मुकू दे मजसी थोर केला गोवा । लोटियले भवनदी माजी ऐकिला वृत्तांत सर्व जाले गुप्त माझेचि संचित खोटे कैसे द्वादशी बाहत्तरी कृष्ण त्रयोदशी । आषाद हे मासी देवद्वारी सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठला मज का ठेविले पापिणीसी वेगळी लाडाई म्हणे देव अर्पित विठ्ठला । म्हणोनि आदरिला प्राणायाम

संत नामदेवाचे सर्व कुटुंबीय शके १२७२ (इ.स. १३८०) आषाढ महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला विठ्ठलचरणी लीन झाले, एकरूप झाले. त्या म्हणतात, “मला एकटीलाच दुःखसागरात का लोटले? मलाच दूर का ठेवले?” त्या स्वतःला पापिणी म्हणवितात. शोक करताना म्हणतात, “मी प्राणायाम करून देहत्याग करीन.” हा निर्वाणीचा निर्धार प्रगट करतात. विठ्ठलाच्या पायी संत नामदेवांचे सर्व कुटुंबीय एकरूप झाल्याने लाडाईला अनाथ झाल्याची तीव्र भावना झाली. कदाचित

पंढरीचा राणा विठ्ठलाकडे करणा स्वरात ‘माझा सांभाळ करावा अशी एकटीच पडलेल्या संत लाडाइने ‘दीनांचा दयाळ बाप’

अशी आर्त हाक मारली आहे. पांडुरंगाच्या भेटीची तळमळ, प्राप्त संसारातील दुःख याची जाणीव संत लाडाईच्या अभंगातून दिसते. संत नामदेवांच्या कुटुंबात सर्वांनीच अभंगरचना केली आहे. आज सर्वांचेच अभंग लुप्त झाले आहेत, असे वाटते, कारण त्यांचा एखादा अभंग वाचल्यानंतर त्या रचनेवरून समजते, यासारखे लाखो अभंग यांनी रचले असावेत. कारण या संदर्भात संत तुकारामांनी त्यांच्या कुटुंबीयांतील सर्वांच्या अभंगसंख्येचा उल्लेख केला आहे. त्याचा त्यांनी निर्देशही केला आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे-

“एक कोटी अभंग लक्षवरती सोळा। प्रेमरस जिव्हाळा आऊबाईचा ।चौऱ्याणव लक्ष रंगाईची बाकी ।प्रेमे चक्रपाणी आळविले।। दोन कोटी अभंग येशा साखराई ।कवित्व पाही दीड दीड कोटी ।। “

आज संत नामदेवांच्या परिवारातील स्त्री संतांचे अभंग दुदैवाने अतिशय कमी संख्येत उपलब्ध आहेत. संत तुकारामांनी जी अभंगसंख्येची नोंद केली ती खरीच असावी. इतके प्रचंड अभंगरचनेची हस्तलिखित बाड़े कालप्रवाहाच्या उदरात गडप व्हावीत, ही केवढी मोठी हानी आहे! स्त्री संतांच्या अवघ्या रचना नष्ट होणं म्हणजे स्त्री संतांच्या रचनेचे वैभवी दालन, त्याची समृद्धी काळाआड जाऊन नाहीशी होणे आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या .

स्त्री संतांच्या उर्वरित रचना उपलब्ध आहेत आणि अनेक स्त्री संतांच्या अभंगरचनांची दखल न घेतल्याने त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. चत्कालीन काही स्त्री संत वारकरी संप्रदायाच्या पटावरून नाहीशा झाल्या आहेत. बहुतेक स्त्री संत अज्ञात असून, बन्याच जणींची नावेसुद्धा कालप्रवाहात लुप्त होऊन गेली असावीत..


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या