संत आऊबाई जीवनचरित्र

॥ संत आऊबाई ॥

संत नामदेव कुटुंबातील सर्वच स्त्री संतांचा जन्मकाळ, ठिकाण उपलब्ध नाही. संत नामदेवांच्या पारमार्थिक जीवनाचा आणि अभंगवाणीतील विचारांचा प्रभाव त्यांच्या कुटुंबातील सर्व संतमंडळींवर पडलेला दिसतो. तो त्यांच्या परिवारातील स्त्री संतांच्या अभंगरचनेवरून जाणवतो. आई संत गोणाई, पत्नी संत राजाईप्रमाणेच संत नामदेवांची बहीण संत आऊबाई, मुलगी संत लिंबाई, सून संत लाडाई, साखराई आणि पुतणी नागी (संत नागरी) यांच्या अनेक अभंगरचना असाव्यात. मात्र, त्या काळाच्या प्रवाहात नष्ट झालेल्या आहेत.

अर्थात आज प्रत्येक स्त्री संताच्या रचना (संत नामदेव परिवार) संख्येने अतिशय कमी आहेत. संत तुकाराममहाराज सांगतात, ‘संत नामदेवांची बहीण यांनी एक कोटी सोळा लक्ष अभंग केले आहेत.’ अर्थात त्यांच्या अनेक रचना बाळबोध वळणाच्या व स्वरूपाच्या आहेत. संत आऊबाई यांनी एका रचनेत विठ्ठलाच्या दर्शनाचे वर्णन केले आहे. दर्शनाने चित्तवृत्ती कशी झाली, त्याचे स्वरूप पुढच्या अभंगातून दिसते.

“शून्य साकारले साध्यांत दिसे आकार नासे तेथे शून्याकार दिसे । शून्य ते सार शून्य ते सार शून्यी चराचर सामावली ।। विठ्ठल राहिली चित्तवृत्ती ।।”

संत आऊबाईची ही रचना काहीशी गूढ आहे. तरी या विश्वाला व्यापणान्या महाशून्याचे या शून्यातच सामावण्याचे वर्णन त्यांनी व्यापक अर्थ सांगणान्या शब्दांत व्यक्त केले आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या