|| राम कृष्ण हरी ||
माऊली,
संत साहित्यामध्ये करण्यासारखं बरेच काही आहे. या निस्वार्थ सेवेत अनेक अडचणींना सामोरं जाव लागत ज्यात आर्थिक अडचण खूप मोठी आहे. हे कार्य अविरत चालत राहावे ही आमची अतोनात इच्छा आहे.
यात आपल्या मदतीची गरज आहे. आपण अथवा आपली संस्था किंवा आपले कुणी परिचित जर या कार्याचे पालकत्व स्वीकारत असेल तर मोठा आनंद होईल.
संत साहित्य वेबसाईट आणि अॅप आपल्या सेवेत सन 2018 पासून कार्यरत आहे. आम्ही संपूर्ण संत साहित्य सोबत 20 हून अधिक संतांच्या अॅप व संलग्न सेवेत कार्यरत आहोत. जर आपण वेबसाइट व अॅप बनवणे व ते चालवणे यास किती खर्च येतो याचा अंदाज असेल तर तर आपण समजू शकता की हे किती खर्चीक काम आहे. नसल्यास याचा अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.
संत साहित्य वेबसाईट आणि अॅप तसेच संलग्न सेवेसाठी लागणारे सगळे डेवलपमेंट चे काम झाले आहे त्यामुळे तो हिशोब यात नाही. आपण फक्त मेंटेनन्स व नवीन गोष्टी ॲप व वेबसाईट मध्ये जोडणे. ती व्यवस्थित चालवणे व आपली संकल्पना पुढे घेऊन जाणे याबद्दलच बोलणार आहोत.
- संत साहित्य वेबसाईट आणि ॲप यामध्ये नवीन साहित्य वेबसाईट मध्ये जोडणे. (ग्रंथ, गाथा, अभंग, तीर्थक्षेत्रांची माहिती, ह. भ. प. नोंदणी झालेल्या कीर्तनकार तसेच प्रवचनकार यांची माहिती)
- संतांचे सार्थ अभंग मिळवणे ते तपासणे. संत साहित्य वेबसाईट आणि ॲप यामध्ये उपलब्ध करून देणे.
- संतांचे अभंग सार्थ करणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणे. उपलब्धता पाहणे. याकरता होणारा प्रवास व दळणवळण.
- सार्थ अभंगांचे व्हिडिओ बनवणे व ते सर्वांना उपलब्ध करून देणे. व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारी साधन सामग्री जसे की कम्प्युटर, लॅपटॉप, माईक इ. अभंग श्रवणीय असावा याकरता योग्य आर्टिस्ट मिळवणे, अभंग रेकॉर्ड करण्यासाठीचा सर्व सेटअप, व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर.
- संतांचे साहित्य ग्रंथ, गाथा, चरित्र, याची पुस्तके उपलब्ध करणे व ते मागणीनुसार देशभर shop.santsahitya.in च्या माध्यमातून सगळ्यांना पोहोचवणे. हे साहित्य आपण छापील किमतीमध्ये सर्वांपर्यंत पोहोचवतो त्यामुळे या करता लागणारा डिलेवरी चा खर्च आपण उचलतो.
- वेबसाईट साठी लागणारे क्लाऊड सर्वर विकत घेणे व त्याची व्यवस्थित देखभाल करणे मेंटेनन्स करणे.
- वेळोवेळी टेक्नॉलॉजी मध्ये होणाऱ्या बदलामुळे ॲप मध्ये देखील बदल करत राहावे लागतात याकरता चालू असलेले ॲप बऱ्याचदा पुन्हा नव्याने बनवावे लागते.
- सर्व ॲप आणि वेबसाईट अपडेट ठेवणे व त्याचा वेळोवेळी मेंटेनन्स करणे.
- हे सर्व काम एका जागेवरनं चालते. यासाठी ऑफिस, इंटरनेट व हा सगळा सेटअप व्यवस्थित चालण्यासाठी लागणारी इतर सामग्री.
हे सर्व काम के के टीम (सॉफ्टवेअर कंपनी जी मोबाईल ॲप व वेबसाईट बनवून देणे, ही सेवा सर्वांना पुरवते) मार्फत पाहिले जाते व यासाठी आत्तापर्यंत आलेला सर्व खर्च बनवण्यापासून तर मेंटेनन्स पर्यंतचा व वरती नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांचा खर्च हा के के टीम मार्फत केला जात आहे.
संत साहित्य वेबसाईट व ॲप सोबत इतर ॲप व संबंधित सेवा याचा मासिक खर्च तपशील :
अ. क्र. | विश्लेषण | मासिक खर्च. |
1 | 2 सॉफ्टवेअर इंजिनियर (25000 ₹ x 2 ) (पूर्ण वेळ) | 50,000 ₹ |
2 | 1 ऑडिओ व्हिडिओ ग्राफिक्स डेव्हलपमेंट इंजिनियर | 15,000 ₹ |
3 | क्लाऊड सर्वर | 3,000 ₹ |
4 | ऑफिस इंटरनेट व तत्सम इतर खर्च | 6,000 ₹ |
5 | दळणवळण व इतर प्रवास खर्च | 4,000 ₹ |
6 | सॉफ्टवेअर व हार्डवेअर संदर्भातील खर्च (वार्षिक) | 1,000 ₹ |
एकूण खर्च | 79,000 ₹ |
संत साहित्य हे आमच्यासाठी काही उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे यास आम्ही व्यवसाय म्हणून पाहत नाही किंवा तसे करणे हे कोणत्याही पद्धतीने योग्य नाही परंतु खर्चाचा तपशील नोंदविला आहे हे भागवणे खूप कठीण आहे. त्यामुळे इच्छा नसताना देखील वेबसाईट वरती गूगल जाहिराती लावाव्या लागतात. तसेच संत साहित्यातील ग्रंथ, गाथा व पुस्तके याची ऑनलाइन पद्धतीने विक्री केल्यानंतर जे थोडे पैसे उरतात व वेबसाईटवर जाहिरात दाखवल्यानंतर जे पैसे येतात त्याचा तपशील देत आहे .
संत साहित्य वेबसाईट व ॲप सोबत इतर ॲप व संबंधित सेवा याचा मासिक आवक:
अ. क्र. | विश्लेषण | मासिक आवक. |
1 | गुगल जाहिरातीतून संत साहित्य वेबसाईटला येणारे पैसे.
oct 2024 -147 $ Nov 2024- 134 $ Dec 2024- 118 $ सरासरी 134 $ जे की 10,988 ₹ |
11,000 ₹ |
2 | गुगल जाहिरातीतून संत साहित्य ॲप इतर ॲप मधून येणारे पैसे.
oct 2024 -22 $ Nov 2024- 20 $ Dec 2024- 21 $ सरासरी 21 $ जे की 1722 ₹ |
1 ,800 ₹ |
3 | ग्रंथ,गाथा, पुस्तके व इतर संत साहित्य याची ऑनलाइन विक्री केल्यानंतर दर महिन्याचा खर्च (डिलिव्हरी चार्जेस व इतर) वगळता शिल्लक राहणारे पैसे
मागील एक वर्षात विक्री केले साहित्य 184,087.00 ₹ मागील एक वर्षात खरीदी केले साहित्य 159,908.00 ₹ वार्षिक शिल्लक रक्कम 24,179.00 ₹ जी मासिक 2000 ₹ राहते |
2,000 ₹ |
एकूण | 14800 ₹ |
तसेच संत साहित्य सुरू झाल्यापासून 2018 पासून आलेलल्या देणगीची रक्कम 79,526 ₹
संत साहित्य चालवण्यासाठी येणार मासिक खर्च 79,000 ₹ आहे.
तर संत साहित्य मधून मासिक येणारे पैसे 14,800 ₹ आहे.
थोडक्यात 64,200 ₹ दर महा आवश्यकता आहे.
संत साहित्य डिजिटल स्वरूपात आणणे तसेच हा अनमोल ठेवा पुढील पिढी पर्यंत घेऊन जाणे खूप गरजेचे आहे.या करता मदत हवी आहे…
आपला,
प्रा. किरण साधना अरुण सुपेकर
+91 8087167770
मु पो बाबुडी घुमट ता.जि. अ.नगर
KK Team– Bank Detail
A/C Name:KK TEAM
A/C NO: 50200025601785
IFSC : HDFC0001783
Mobile: 8087167770
देणगीदार
दिनांक | नाव | पत्ता | देणगी |
17/12/2024 | नितीन तानाजी काळे | कोथरुड, पुणे | 501 |
15/12/2024 | सुभाष करंदीकर | बोरीवली ईस्ट | 1000 |
14/12/2024 | श्रेयस संतोष तवाटे | बोरीवली ईस्ट | 111 |
13/12/2024 | विजय वसंत देशपांडे | दादर, मुंबई | 25000 |
24/11/2024 | राजेश श्रीकृष्ण जोशी | —- | 2001 |
10/11/2024 | मयुरेश दत्तात्रय आपटे | 501 | |
08/11/2024 | श्री. प्रतीक बागल | —- | 5000 |
06/11/2024 | श्री .दादासाहेब पाटील | पो. उंडाळे.ता. कराड जि.सातारा | 301 |
3/11/2024 | श्री .रोहन नितीन ढेरे | —- | 521 |
5/7/2024 | श्री. भरत केसकर | (मॉडेल कॉलनी, पुणे) | 11,111 |
19/6/2024 | सौ. मधुरा मंगेश बाचल | पूणे | 3,000 |
30/12/2023 | श्री.वरदराज बापट | ठाणे | 11,011 |
26/12/2023 | श्री.लक्ष्मणराव भुजंगराव सरनाईक | समर्थ नगर रिसोड ता. रिसोड जि.वाशिम | 5,555 |
21/12/23 | श्री.प्रकाश वामन नातु | —- | 111 |
16/11/2023 | श्री.अमोल गोरे | —- | 4000 |
29/9/2023 | श्री.धनंजय बेल्हेकर | —- | 501 |
10/06/2023 | श्री.संजय दत्तात्रय वायाळ | पुणे,नांदूर (कळंब),मंचर | 2,100 |
23/12/2022 | श्री.आडे सदाशिव वामनराव | पूणे | 1100 |
18/12/2022 | श्री.वरदराज बापट | ठाणे | 5001 |
14/2/2022 | ह. भ. प. राजश्री चौधरी | डोंबिवली | 1100 |