तुमचा तो कळला भाव – संत कर्ममेळा
तुमचा तो कळला भाव ।
माझा झाला पारखा ठाव ॥१॥
घेवोनी बैसलासी ठेवणें ।
माझे द्यावें मजकारणें ॥२॥
कायसा करिसी वादावाद ।
मुळींच खुण्टलासे भेद ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरि ।
तुम्हां मज नाहीं उरी ॥४॥
तुमचा तो कळला भाव – संत कर्ममेळा